खवा-मावा-खोया बर्फी: खवा किंवा खोया बर्फी ही सर्वांना आवडते. घरच्या घरी आपल्याला छान खव्याची बर्फी बनवता येते. बर्फी हा पदार्थ असा आहे की सणावाराला, पार्टीला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवता येतो. खवा बर्फी घरी कशी बनवायची हे मी अगदी सोप्या पद्धतीने लिहिले आहे व बनवले सुद्धा आहे. घरी खवा असला की आपल्याला वेगवगळ्या प्रकारची बर्फी बनवता येते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ८ वड्या बनतात
साहित्य:
१ कप खवा
१/२ कप साखर
१ टे स्पून पिठीसाखर
२ टे स्पून मिल्क पावडर
१ टी स्पून वेलची पूड
ड्राय फ्रुट सजावटीसाठी
१ टी स्पून तूप (प्लेटला लावण्यासाठी)
कृती:
कढईमधे खवा घालून मंद विस्तवावर चार-पाच मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून मिक्स करून ३-४ मिनिट मंद विस्तवावर परतत रहा. मग विस्तव बंद करून कढई खाली उतरवून त्यामध्ये पिठीसाखर, मिल्क पावडर, वेलचीपूड घालून ५-७ मिनिट हलवत रहा.
एका स्टीलच्या प्लेटला तूप लाऊन बाजूला ठेवा. मिश्रण थंड व्हायला आले की स्टीलच्या प्लेटमध्ये काढून एक सारखे थापून घेऊन वरतून ड्रायफ्रुटने सजवा. मग एक सारख्या वड्या कापून घ्या.