Crispy Golden Fried Chicken Recipe in Marathi

गोल्डन फ्राईड चिकन: गोल्डन फ्राईड चिकन ही एक छान तोंडी लावणारी किंवा स्टारटर म्हणून बनवता येईल. गोल्डन फ्राईड चिकन हे बनवतांना फार काही मसाले वापरले नाहीत. त्यामध्ये आवरणासाठी मैदा व मक्याचे पीठ वापरले आहे, चवीसाठी अजिनोमोटो व मिरे पावडर वापरली आहे. तसेच बाईंडिंगसाठी अंडे मिक्स केले आहे. गोल्डन फ्राईड चिकन हे चवीला स्वादिस्ट लागते. बिर्याणी बरोबर हे छान लागते.

The English language version of this Golden Fried Chicken recipe and preparation method can be seen here – typical Indian Golden Fried Chicken

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ८ पिसेस

साहित्य:
८ चिकनचे छातीचे तुकडे
१ कप मैदा
१/२ कप कॉर्न फ्लोर
१/२ टी स्पून अजिनोमोटो
१ टी स्पून मिरे पावडर
१ टी स्पून बेकीग पावडर
२ टे स्पून तेल
२ अंडी (फेटून)
मीठ चवीने
१/२ कप तेल

 Golden Fried Chicken

Crispy Golden Fried Chicken

कृती:
चिकनचे तुकडे धुऊन बाजूला ठेवा. अंडी फेटून घ्या.
मैदा, कॉर्न फ्लोर , अजिनोमोटो, मिरे पावडर, बेकीग पावडर, २ टे स्पून तेल, फेटलेली अंडी व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.
तयार केलेल्या मिश्रणात चिकनचे तुकडे घालून ढवळून पाच मिनिट तसेच ठेवा.
कढईमधे तेल गरम करून चिकनचे तुकडे मंद वास्तवावर छान कुरकुरीत होई परंत तळून घ्या.
गरम गरम सर्व्ह करा.

About Sujata Nerurkar (1928 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*