Bottle Gourd Kofta Curry Recipe in Marathi

दुधी भोपळ्याची कोफ्ता करी: दुधीभोपळ्याची कोफ्ता करी ही छान टेस्टी लागते. दुधीभोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. दुधीभोपळ्याची भाजी आपण बनवतो पण दुधीची कोफ्ता करी छान लागते. हे कोफ्ता करी बनवतांना दुधी किसून घेऊन त्याचे पकोडे बनवले आहेत व ते ग्रेव्ही मध्ये सोडले आहेत.

The English language version of this Koft Curry recipe and preparation method can be seen here – Dudhi Bhopla Kofta Curry

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
कोफ्ते बनवण्यासाठी:
१/४ किलोग्राम दुधी भोपळा (लॉकी)
१ कप बेसन
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
१ टी स्पून गरम मसाला
तेल कोफ्ते तळण्याकरिता

ग्रेवी करीता:
मसाला वाटण्यासाठी:
२ मोठे कांदे (चिरून)
८ लसूण पाकळ्या
१” आले तुकडा
१ टे स्पून खसखस
२ टे स्पून सुके खोबरे (किसलेले)
१ टे स्पून तेल

सुका मसाला:
२ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टी स्पून गरम मसाला
१/२ टी स्पून हळद
२ टे स्पून दही
१ मध्यम आकाराचा टोमाटो (चिरून)
मीठ चवीने

फोडणी साठी:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग

Dudhi Bhopla Kofta

Bottle Gourd Kofta

कृती:
कोफ्ते बनवण्याकरीता:
दुधी भोपळा धुवून, सोलून, किसून घ्या. मग त्यामध्ये बेसन, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, मीठ घालून मिक्स करून त्याचे छोटे छोटे चपटे गोळे बनवा. कढईमधे तेल गरम करून घ्या. गरम तेलात गोळे छान गुलाबी रंगावर तळून घेऊन बाजूला ठेवा.ग्रेवी करीता:
कांदा, टोमाटो, कोथंबीर बारीक चिरून घ्या. सुके खोबरे किसून घ्या.
कढईमधे एक टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा, आले-लसूण पेट घालून २-३ मिनिट परतून घेऊन त्यामध्ये खसखस, सुके खोबरे घालून दोन मिनिट परतून घ्या. विस्तव बंद करून थंड झाल्यावर मसाला बारीक वाटून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, हिंग घालून वाटलेला मसाला घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर मसाला परतून घेऊन त्यामध्ये टोमाटो घालून २-३ मिनिट परत परतून घ्या. त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ, गरम मसाला हळद, दही घालून २ मिनिट परतून घ्या. मग एक कप पाणी घालून कोफ्ते घाला व २-३ मिनिट शिजू द्या. चांगली उकळी आली की खाली उतरवून घ्या.

गरम गरम दुधीभोपळ्याची कोफ्ता करी पराठ्या बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा. सर्व्ह करतांना कोथंबीरीने सजवा.

About Sujata Nerurkar (1968 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*