Bael Fruit Burfi Recipe in Marathi

कवठाची बर्फी: कवठाची बर्फी ही श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारच्या दिवशी बनवायला छान आहे. ही बर्फी चवीला उत्कृष्ट लागते. बनवायला सोपी आहे. श्रावणामध्ये कवठ ह्या फळाला फार महत्व आहे. तसेच महाशिवरात्रीला सुद्धा ह्या फळाचे फार महत्व आहे.कवठ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण फायद्याचे आहे.

The English language version of this Bael Fruit Burfi can be seen here – Bael Fruit Vadi

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: २५ वड्या बनतात

साहित्य:
१ कप कवठाचा गर
१ १/२ कप साखर
१ टी स्पून वेलची पूड
१ टे स्पून पिठीसाखर
१ टी स्पून तूप

कृती: कवठ फोडून त्यातील गर काढून त्यातील जाड बिया काढून घ्या. मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
एका कढईमध्ये कवठाचा गर, साखर मेक्स करून मिश्रण घट्ट होई परंत मंद विस्तवावर परतून घ्या. मिश्रण थोडे कोरडे वाहयला आलेकी पिठीसाखर घालून मिक्स करून घ्या.
स्टीलच्या प्लेटला तूप लाऊन मिश्रण प्लेटमध्ये ओतुन एक सारखे थापून घ्या. थंड झाल्यावर वड्या कापा.

About Sujata Nerurkar (1850 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*