Maharashtrian Style Paneer Makhani Recipe in Marathi

पनीर मखनी: पनीर मखनी ही एक महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे. पनीरची ही डिश जेवणामध्ये किंवा पार्टीला बनवायला पण छान आहे. आपण पनीरचे पालक पनीर, कढाई पनीर बनवतो तसेच पनीर मखानी ही एक चांगली चवीस्ट डीश आहे. ह्या पद्धतीने बनवलेली पनीर मखनी अगदी हॉटेल प्रमाणे बनते.

The English language version of the preparation method of this Paneer dish can be seen here- Tasty Paneer Makhni

बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी

साहित्य:
२५० ग्राम पनीर (पनीर रेसीपी बघा)

ग्रेव्ही साठी
एक मोठा कांदा (चिरून)
तीन मोठे टोमाटो (चिरून)
१ १/२” आले तुकडा (चिरून)
पाच लसूण पाकळ्या (चिरून)
एक टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ कप टोमाटो प्युरी
मीठ चवीने

फोडणीसाठी
१/४ कप बटर
एक टी स्पून शहाजिरे

सजावटीसाठी
एक कप फ्रेश क्रीम’
एक टी स्पून काळी मिरी पावडर
दोन टे स्पून कसुरी मेथी (कसुरीमेथी गरम करून हातानी चुरून घ्या)

कृती:
एका कढईमधे चिरलेला कांदा, टोमाटो, आले, लसूण व तीन कप पाणी घेऊन मंद विस्तवावर पंधरा मिनिट शिजवून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

कढईमधे बटर गरम करून शहाजिरे घालून वाटलेले मिश्रण घालून पंधरा मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ, टोमाटो प्युरी घालून तीन-चार मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून एक उकळी आणा.

पनीर मखानी सर्व्ह करतांना फ्रेश क्रीम, मिरे पावडर व कसुरी मेथी घालून पराठ्या बरोबर सर्व्ह करा.

About Sujata Nerurkar (1850 Articles)
I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published.


*