Vaikuntha Chaturdashi 2026: Heaven’s Gates Open Only Once a Year! Hari-Har Puja Vidhi, Powerful Mantras & 5 Remedies
वैकुंठ चतुर्दशी 2026 कधी आहे? 23 नोव्हेंबरला उघडतो स्वर्गाचा मार्ग! हरि-हर पूजा विधी व 5 महाउपाय
हिंदू पंचांग अनुसार, कार्तिक शुल्क पक्ष चतुर्दशी 23 नोव्हेंबर 2026 पहाटे 02:36 मिनिट ला सुरू होत असून रात्री 11:42 मिनिट पर्यन्त आहे. अश्या मध्ये वैकुंठ चतुर्दशी व्रत 23 नोव्हेंबर 2026 सोमवार ह्या दिवशी करायचे आहे. असे म्हणतात की वर्षात फक्त एकदाच वैकुंठ चतुर्दशी ह्या दिवशी स्वर्ग चा रस्ता उघडतो.
कार्तिक शुक्ल चतुर्दशी ला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात. हा दिवस भगवान विष्णु व भगवान शिव ह्यांची संयुक्त आराधना करण्याचे विशेष महत्व आहे. ह्या तिथीला हरी-हर मिलन ह्या रूपात सुद्धा पाहिले जाते. ह्या दिवशी भगवान शिव व भगवान विष्णु ह्यांची भक्तांनी पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. ह्या तिथीला मोक्ष व स्वर्ग ची प्राप्ती ची मनोकामनासही जोडले गेले आहे. वर्षात फक्त एकदाच वैकुंठ चतुर्दशी ह्या दिवशी स्वर्गचा रस्ता उघडतो त्यामुळे ह्या दिवशी व्रत, पूजा-पाठ व मंत्र जाप करण्याचे विशेष महत्व आहे.
वैकुंठ चतुर्दशी 2026 कधी आहे?
हिंदू पंचांग अनुसार, कार्तिक शुक्ल चतुर्दशी 23 नोव्हेंबर पहाटे 02:36 मिनिट सुरू होत असून रात्री 11:42 मिनिट पर्यन्त आहे. म्हणून वैकुंठ चतुर्दशी व्रत 23 नोव्हेंबर 2026 सोमवार ह्या दिवशी करायचे आहे.
वैकुंठ चतुर्दशी दिवशी विष्णु-शिव ह्याचीच पूजा का करावे?
वैकुंठ चतुर्दशी नाव हेच धार्मिक महव आहे. वैकुंठ ही नाव भगवान विष्णु ह्यांच्या धामचे नाव आहे. चतुर्दशी तिथी भगवान शिव ह्यांची आराधना करणे उत्तम मानले जाते. ह्या दिवशी भगवान विष्णु व भगवान शिव ह्या दोघांची पूजा करण्याची परंपरा आहे. म्हणूनच ह्याला हरि-हर मिलन चे पर्व संबोधले जाते. ह्या दिवशी स्वर्ग व मोक्ष ची प्राप्तीची कामना केल्याने शिवजी व भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा विधी पूर्वक केली जाते.
वर्षात फक्त एकच दिवशी स्वर्गचा रस्ता का उघडतो?
वैकुंठ चतुर्दशी ला घेऊन अशी मान्यता प्रचलित आहे की ह्या दिवशी स्वर्गचा रस्ता उघडतो म्हणून ह्या दिवशी जीपान व्यक्ति पूर्ण श्रद्धेने भगवान विष्णु व भगवान शिव ह्याची भक्ति करेल त्यालाच मोक्षची प्राप्ती होईल.
वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी व्रत व पूजा कशी करावी?
वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णु व भगवान शिव ह्या दोघांची पूजा करण्याची पद्धत आहे. ह्या दिवशी श्रद्धालु व्रत करून मंत्र जाप करतात.
वैकुंठ चतुर्दशी सरल पूजा विधि:
वैकुंठ चतुर्दशी २०२६ सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा करण्याची परंपरा आहे.
तिथी व वेळ (२३ नोव्हेंबर २०२६)
• चतुर्दशी प्रारंभ: सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी पहाटे २:३६ मिनिट
• चतुर्दशी समाप्ती: सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११:४२ मिनिट
वैकुंठ चतुर्दशी ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची पूजा निशीथ काळ म्हणजे मध्य रात्री करतात व भगवान शिव ह्यांची पूजा सूर्योदय च्या वेळी केली जाते.
स्नान व संकल्प:
सकाळी लवकर उठून स्नान करून साफ वस्त्र परिधान करावे, हातात जल घेऊन व्रत संकल्प करून हरि-हर पूजा संकल्प करावा.
चौरंग व दिप पूजन:
पूजेची जागा साफ करून घ्या तिथे चौकी ठेवून त्यावर भगवान विष्णु व भगवान शिव ह्यांची प्रतिमा किंवा फोटो ठेवा व तुपाचा दिवा लावावा.

भगवान शिव पूजा:
शिवलिंगची प्रतिमा वर जल किंवा गंगाजल, दूध, बेलपत्र व फूल अर्पित करा व ॐ नम: शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जाप करा.
भगवान विष्णु पूजा:
श्री हरी ह्यांना पिवळी फुले किंवा कमळ, चंदन, अक्षता, फळ व तुळशी पत्र अर्पित करा व ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्र जाप किंवा विष्णु सहस्रनाम म्हणा.
आरती व दान:
नेवेद्य अर्पित करून आरती करा व आपल्या आयपती नुसार दान करा.
सर्व पापा पासून मुक्ती मिळण्यासाठी पुढे दिलेल्या मंत्राचा जंप करा:
वैकुंठ चतुर्दशी ह्या दिवशी भगवान विष्णु व भगवान शिव ह्याचा मंत्र जाप करणे फलदायी आहे. धार्मिक मान्यता अनुसार, ह्या दिवशी श्रद्धा पूर्वक मंत्र जाप केल्यास नाकारात्मकता दूर होते व व्यक्तीला आध्यात्मिक शांती प्राप्त होते.
भगवान शिव का मंत्र: ॐ नमो भगवते रुद्राय।
भगवान विष्णु का मंत्र: ॐ नमो भगवते वासुदेवाय।
जर काही भक्तांना वरील दिलेला मंत्र जाप करणे शक्य नसेलतर पुढे दिलेला मंत्र जाप करावा.
मंत्र: ‘ॐ नमः शिवाय’ और ‘ॐ विष्णवे नमः’
