Amla Navami 2026 | Akshaya Navami & Kushmanda Navami – Puja Vidhi, Shubh Muhurat, Significance & 5 Powerful Remedies

Amla Navami 2026
Amla Navami 2026 | Akshaya Navami & Kushmanda Navami – Puja Vidhi, Shubh Muhurat, Significance & 5 Powerful Remedies

Amla Navami 2026 | Akshaya Navami & Kushmanda Navami – Puja Vidhi, Shubh Muhurat, Significance & 5 Powerful Remedies

आवळा नवमी 2026 | अक्षय नवमीला करा हे 5 महाउपाय! कूष्मांड नवमी पूजा मुहूर्त, विधी व महत्त्व

कूष्मांड नवमी, आवळा नवमी, अक्षय नवमी तिथी, शुभ मुहूर्त, पूजाविधी व उपाय
आता 10 नोव्हेंबर 2026 मंगळवार ह्या दिवसा पासून कार्तिक महिना आरंभ झाला आहे. 18 नोव्हेंबर 2026 बुधवार ह्या दिवशी कूष्मांड नवमी आहे, कूष्मांड नवमीलाच आवळा नवमी किंवा अक्षय नवमी असे संबोधले जाते.

कूष्मांड नवमी तिथी कधी आहे?
18 नोव्हेंबर 2026 बुधवार, कार्तिक शुक्ल पक्ष नवमी ह्या दिवशी कूष्मांड नवमी आहे.

कूष्मांड नवमी शुभ मुहूर्त:
सकाळी 6:19 मिनिट ते दुपारी 12:05 मिनिट
कूष्मांड नवमी, अक्षय नवमी, आंवला नवमी 2026 कधी आहे?
कूष्मांड नवमी, अक्षय नवमी, आंवला नवमी 2026 18 नोव्हेंबर 2026 बुधवार ह्या दिवशी आहे.
तिथी: कार्तिक शुक्ल पक्ष नवमी
शुभ मुहूर्त: सकाळी 6:19 मिनिट ते 12:05 मिनिट

कूष्मांड नवमी, अक्षय नवमी, आंवला नवमी 2026 चे महत्व काय आहे:
* नवमी तिथी आरंभ: 18 नोव्हेंबर, सकाळी 6:06 मिनिट
* नवमी तिथी समाप्ती: 19 नोव्हेंबर, सकाळी 7:06 मिनिट
* पूजा मुहूर्त: सकाळी 6:19 मिनिट ते दुपारी 12:05 मिनिट पर्यन्त

अक्षय नवमीचे महत्व काय आहे:
अक्षय नवमी ह्या दिवशी दान-पुण्य व धार्मिक कार्य करणे विशेष मानले जाते. “अक्षय” ह्या शब्दाचा अर्थ कधी सुद्धा समाप्त न होणार असा होतो. असे म्हणतात की ह्या दिवशी पूजा, जप, तप व दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. ह्या दिवशी आवळा ह्या वृक्षाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. व त्याच बरोबर भगवान विष्णु ह्यांचे स्मरण केले जाते. बऱ्याच ठिकाणी ह्या वृक्षाच्या खाली भोजन बनवले जाते व ते भोजन प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची परंपरा आहे.

आवळा नवमी व कूष्मांड नवमीचे महत्व काय आहे:
आवळा नवमी ह्या दिवशी आवळा ह्या वृक्षाला मान असतो व ह्यादिवशी आवळा ह्या वृक्षाची पूजा केली जाते. आवळा ह्या वृक्षामध्ये भगवान विष्णु ह्यांचा वास असतो, कूष्मांड नवमी ह्या दिवशी पांढरे पेठे दान करण्याची परंपरा आहे. ह्या दिवशी अन्न, फळ व वस्त्र दान करणे शुभ मानले जाते.

अक्षय नवमी ह्या दिवशी काय करावे व काय करू नये?
अक्षय नवमी ह्या दिवशी काय करावे:
1. भगवान विष्णु व आवळा वृक्षाची पूजा करावी.
2. आवळा नवमी ह्या दिवशी जरूरत मंद लोकांना भोजन व वस्त्र दान करावे.
3. आपल्या श्रद्धा नुसार व्रत व पूजा करावी.
4. प्रकृती व वृक्षांचा सन्मान करावा.

अक्षय नवमी ह्या दिवशी काय करू नये?
1. कोणत्या सुद्धा जरूरतमंद चा अपमान करू नये.
2. वृक्ष- झाडे रोपे ह्यांचे नुकसान करू नये.
3. दान-पुण्य चा दिखावा करू नये.

कूष्मांड नवमी, अक्षय नवमी, आवळा नवमी 2026 पूजा विधी:
* भक्तांनी सकाळी लवकर उठून, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून संकल्प करावा.
* आवळा ह्या वृक्षाच्या मुळाशी जल व दूध अर्पित करावे.
* रोली, अक्षता, फुल व धूप-दीप लाऊन वृक्षाची पूजा करावी.
* आवळा वृक्षाला कच्चा धागा बांधून श्रद्धा पूर्वक प्रदक्षिणा मारावी.
* भगवान विष्णु ह्यांना फळ व नेवेद्य अर्पित करावा.
*अक्षय नवमीची कथा आइकावी व जरूरतमंद लोकांना भोजन द्यावे.
* संभव असेलतर परिवारा सोबत आवळा वृक्षा खाली बसून भोजन करावे.

Amla Navami 2026
Amla Navami 2026 | Akshaya Navami & Kushmanda Navami – Puja Vidhi, Shubh Muhurat, Significance & 5 Powerful Remedies

कूष्मांड नवमी, अक्षय नवमी, आंवला नवमी 2026 शुभ उपाय:
1. आवळा वृक्षाची पूजा करा, ह्या दिवश वृक्षाच्या मुळाशी जल अर्पित करा व तुपाचा दिवा लावावा, भगवान विष्णुचे स्मरण करून परिवारातिल लोकांच्या खुशालीसाठी प्रार्थना करा.

2. आवळाचे दान करा: जरूरतमंद लोकांना आवळा किंवा आवळ्या पासून बनवलेल्या वस्तु दान करा, असे करणे धार्मिक दृष्टीने शुभ मानले जाते .

3. कूष्मांड दान करावे: कूष्मांड म्हणजे कोहळा असे म्हणतात. ह्या दिवशी कोहळा पासून बनवलेला पांढरा पेठा दान करण्याची परंपरा आहे. आपल्या श्रद्धा अनुसार अन्न व दक्षिणा दान करू शकता.

4. विष्णु मंत्र जाप करा: ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करा.

5. अन्न व वस्त्र दान करा: जरूरतमंद लोकांना भोजन, अन्न धान्य व गरम कपडे दान करा, ह्यामध्ये सेवा व परोपकारचा भाव वाढतो.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.