Dhanteras 2026 Puja Muhurat & Vidhi | Yamadeep Daan, 13 Diyas, Auspicious Shopping Time & Lakshmi Remedies In Marathi

Dhanteras 2026 Puja Muhurat & Vidhi
Dhanteras 2026 Puja Muhurat & Vidhi | Yamadeep Daan, 13 Diyas, Auspicious Shopping Time & Lakshmi Remedies

Dhanteras 2026 Puja Muhurat & Vidhi | Yamadeep Daan, 13 Diyas, Auspicious Shopping Time & Lakshmi Remedies

धनत्रयोदशी 2026 पूजा मुहूर्त | यमदीपदान कसे करावे? 13 दिवे, खरेदी शुभवेळ व लक्ष्मीप्राप्ती उपाय

6 नोव्हेंबर धनत्रयोदशी पूजा मुहूर्त, सोपी पद्धत पूजाविधी, महत्व, यमदीपदान,खरेदी शुभवेळ, लक्ष्मीप्राप्ती उपाय

6 नोव्हेंबर 2026 शुक्रवार धनत्रयोदशी हा शुभ दिवस आहे. मोठी दिवाळी सुरू होण्याच्या अगोदर धनत्रयोदशी हा शुभ दिवस असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी ( स्वास्थ व आयुर्वेदचे देवता) ही प्रकट होण्याचा दिवस आहे. ह्या दिवशी माता लक्ष्मी व भगवान कुबेर (धनाचे देवता) ह्यांचे घरात स्वागत केले जाते. हा दिवस त्यांना समर्पित आहे.

धन त्रयोदशी 2026 पूजा शुभ मुहूर्त व वेळ:
धन त्रयोदशी ह्या दिवशी पूजा करण्याची सर्वात शुभ वेळ म्हणजे प्रदोष काल आहे. कारणकी ह्यावेळेत आलेले धन स्थायी रूपात टिकण्याच्या संयोग बनतो.
त्रयोदशी तिथी आरंभ: 6 नोव्हेंबर 2026 सकाळी 10:30 मिनिट पासून
त्रयोदशी तिथी समाप्ती: 7 नोव्हेंबर 2026 सकाळी 10:47 मिनिट
प्रतेक शहरात संध्याकाळी पूजेची वेळ (6 नोव्हेंबर) थोडीशी वेगवेगळी आहे:
महाराष्ट्रमध्ये पुणे: (पिंपरी-चिंचवड भाग) संध्याकाळी 6:32 ते 8:31 मिनिट पर्यन्त
मुंबई: संध्याकाळी 6:35 मिनिट ते रात्री 8:35 मिनिट पर्यन्त
दिल्ली: संध्याकाळी 6:02 मिनिट ते 7:57 मिनिट पर्यन्त
बेंगलोर: संध्याकाळी 6:25 मिनिट ते 8:20 मिनिट पर्यन्त
कलकत्ता: संध्यायकाळी: 5:28 मिनिट ते 7:26 मिनिट पर्यन्त

धन त्रयोदशी ह्या दिवसाचे महत्व:
धार्मिक मान्यता अनुसार धनत्रयोदशी कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथी ला समुद्र मंथनच्या वेळी भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. म्हणूनच ह्या तिथीला धनत्रयोदशी तिथी म्हणून संबोधले जाते. असे म्हणतात की भगवान धन्वंतरी हयाना भगवान विष्णु ह्यांचा अवतार मानले जाते. धनत्रयोदशी ह्या दिवशी भगवान धन्वंतरी ह्यांच्या बरोबर विष्णु प्रिया माता लक्ष्मी, धनाचे देवता भगवान कुबेर व मृत्यूचे देवता यमराज ह्यांची पूजा केली जाते. भगवान धन्वंतरी जेव्हा समुद्र मंथनच्या वेळी हातात कलश घेऊन प्रकट झाले होते म्हणून भांडी खरेदी करण्याची सुद्धा प्रथा आहे.

धन त्रयोदशी पूजा साहित्य:
* भगवान गणेश, माता लक्ष्मी व भगवान कुबेर (कुबेर यंत्र) ह्यांचे फोटो किंवा मूर्ती
* पूजा आसन व पात्र: एक लाकडी चौरंग, लाल किंवा पिवळे कापड त्यावर घालण्यासाठी व एक पितळ किंवा तांब्याचा कलश
* प्रसाद: धने, गूळ, बत्तासे, मिठाई, फळ, विडयाची पाने व सुपारी
* पूजेसाठी: हळद-कुंकू, अक्षता (तांदूळ), कलवा, झेंडूचे फूल किंवा कमळचे ताजे फूल
* दिवा व अगरबत्ती: 13 छोटे मातीचे दिवे म्हणजे पणत्या, कापसाची वात तूप, तेल (मोहरीचे किंवा तिळाचे तेल) व अगरबत्ती
* नवीन वस्तु: दिवास खरेदी केलेले सोने, चांदी किंवा स्वयंपाक घरातील भांडी

धनत्रयोदशी पूजाविधी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची:
1. सर्वात पहिले घराची साफ-सफाई व सजावट करून घ्या, मग घरच्या मुख्य दरवाजा समोर झाडून, सडा रंगोली काढून लक्ष्मीची पावल व स्वस्तिक काढा. लक्ष्मीची पावल काढताना लक्ष्मी घरात प्रवेश करीत आहे अश्या पद्धतीने काढा.

2. आपण घरात जेथे पूजा मांडणार आहोत टी जागा साफ करून तेथे चौरंग ठेवा त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड अंथरूण ठेवा. चौरंगाच्या बाजूनी छान रांगोळी काढून त्यामध्ये रंग भरा. मग त्यावर भगवान गणेश, माता लक्ष्मी व भगवान कुबेर ह्यांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवा. त्याचा शेजारी पानी भरून एक कलश ठेवा, कलश मधील पाण्यात थोडेसे गंगाजल, हळद-कुंकू, अक्षता, फूल व कॉईन टाका मग आंब्याची 5 पाने व नारळ ठेवा. नारळा हळद-कुंकू, अक्षता, फूल अप्रीत करा. आपण 5 प्रकारची धान्य सुद्धा पूजेमद्धे ठेवू शकता.

3. पूजा करताना सर्वात पहिले भगवान गणेश ह्यांची पूजा करा कारणकी सर्व विघ्न गणेश भगवान दूर करीत असतात, तेव्हा प्रथम चौरंगाच्या बाजूला दिवा लावावा मग गणेश भगवान ह्यांना हळद-कुंकू, अक्षता, फूल अर्पित करा, मिठाई ठेवा.

4. धन्वंतरी भगवान, माता लक्ष्मी व कुबेर भगवान ह्यांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर पाणी शिंपडून त्यांना हळद-कुंकू, फूल अर्पित करा, नवीन सोने-चांदी ची वस्तु किंवा पितळी भांडी घेतली असतील तर ते सुद्धा पूजेमद्धे ठेवा व देवाचा आशीर्वाद घ्या.

5. देवाच्या समोर फळ, पान-सुपारी, मिठाई, धने-गूळ प्रसाद म्हणून अर्पित करा. मग मंत्र जाप करा.

6. देवांची (गणेश, लक्ष्मी) आरती म्हणून भोग दाखवा मंत्र जाप करा व सुख-शांती, समृद्धीसाथी प्रार्थना करा व आपली व आपल्या घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहुदे म्हणून प्रार्थना करा.

7. मंत्र: • भगवान धन्वंतरि: “ॐ धन्वन्तरये नमः”
• भगवान कुबेर: “ॐ कुबेराय नमः”

Dhanteras 2026 Puja Muhurat & Vidhi
Dhanteras 2026 Puja Muhurat & Vidhi | Yamadeep Daan, 13 Diyas, Auspicious Shopping Time & Lakshmi Remedies

यम दीप अनुष्ठान कसे करायचे:
अकाल मृत्यूचे भय व नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी धनत्रयोदशी ह्या दिवशी हा उपाय नक्की करावा, धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी 6:30 नंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक कणकेचा चौमुखी दिवा (चार वाती) , दिव्यामद्धे मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल घालावे ह्यालाच यमदीप असे म्हणतात, दिवा लावताना दिव्याच्या खाली थोडे तांदूळ ठेवावे. दिवा लावताना दिव्याची वात दक्षिण दिशेला पाहिजे कारणकी दक्षिण दिशा ही यम देवाची आहे, दिवा लावताना घरातील सर्वजण पाहिजेत दिवा लावून भगवान यम ह्यांना प्रार्थना करावी. दुसऱ्या दिवशी यम दीप बाहेर झाडाच्या खाली ठेवावा म्हणजे पक्षी किंवा मुंग्या दिवा खातात व आपल्याला आशीर्वाद देतात.

टीप: कणकेचा दिवा बनवताना एका बाऊलमद्धे एक वाटी गव्हाचे पीठ, चिमूटभर हळद घालून भिजवून मग चौमुखी दिवा बनवावा. हा दिवा लावावा.

आपल्याला जर धनत्रयोदशी च्या दिवशी 13 दिवे लावायचे असतील तर उत्तम आपण लाऊ शकता, त्यामधील एक दिवा यमदीप (चौमुखी) म्हणून लाऊ शकता दूसरा दिवा तुपाचा करा तो दिवा आपल्या घरातील देवाला लावा. बाकीचे दिवे कसे व कुठे ठेवायचे ह्याची सविस्तर माहिती ह्या अगोदरच्या विडियो मध्ये दिलेली आहे किंवा रॉयल शेफ सुजाता ह्या वेबसाइटवर टेक्स्ट आर्टिकल मध्ये सुद्धा वाचू शकता त्याची लिंक description बॉक्समध्ये दिलेली आहे.

आपल्याला खरेदी करेचीयआहे त्यासाठी शुभ वेळ (मुहूर्त):
6 नोव्हेंबर 2026 शुक्रवार ह्या दिवशी त्रयोदशी तिथी आरंभ झाली की आपण त्यावेळेत खरेदी करू शकता. आपण सोने-चांदी खरेदी करू शकता किंवा खरेदी करू शकत नसाल तर स्वयंपाक घरातील पितळी किंवा तांब्याची भांडी किंवा भांडे खरेदी करू शकता ही खरेदी अत्यंत शुभ मानली जाते.

लक्ष्मी प्राप्ती उपाय:
1. माता लक्ष्मीला धने व गूळ ह्याचा नेवेद्य दाखवा.
2. धनत्रयोदशी च्या दिवशी माता लक्ष्मी मंत्र 108 वेळा म्हणा.
मंत्र: “ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः
3. पूजा करताना लाल कापडात एक चांदीचे कॉईन, धने,दालचीनी माता लक्ष्मीला अर्पित करा मग आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवा.
4. धनत्रयोदशी ह्या दिवशी नवीन झाडू, भांडी (तांबे किंवा पितळ) खरेदी करणे शुभ मानले जाते तसेच जरुरतमंद लोकांना दान व भोजन द्या.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.