Hartalika Teej 2026: 13 का 14 सप्टेंबर, हरतालिका तीज व्रत कधी? शुभ मुहूर्त, पूजा सोपी पद्धत व सटीक उपाय
Hartalika Teej 2026: 13 or 14 September? Correct Date, Puja Muhurat, Vrat Vidhi & Remedies
हिंदू पंचांग अनुसार ह्या वर्षी शुक्ल पक्ष तृतीया तिथी 13 सप्टेंबर रविवार सकाळी 7 वाजून 08 मिनिट पासून सुरू होत असून 14 सप्टेंबर सोमवार सकाळी 7 वाजून 06 मिनिट ला समाप्ती होत आहे. उदय तिथी अनुसार हरतालिका तीज व्रत 14 सप्टेंबर 2026 सोमवार ह्या दिवशी करायचे आहे.
हरतालिका तिथीचे व्रत भाद्रपद महिना शुक्ल पक्ष तृतीया तिथीला ठेवले जाते. ह्या दिवशी महिला भगवान शिव व माता पार्वतीची पूजा करतात. काही महिला ह्या दिवशी निर्जल व्रत सुद्धा करतात. हे व्रत अखंड सौभाग्य व सुखी विवाहित जीवन होण्यासाठी करतात. ह्या वर्षी हरतालिका तीज व्रत वरून बरेच कन्फ्यूजन आहे. काहीजण 13 सप्टेंबर 2026 रविवार तर काही जण 14 सप्टेंबर सोमवार ह्या दिवशी हरतालिका व्रत आहे असे म्हणतात. आता आपण पाहू या नक्की कोणती तारीख आहे.
हरतालिका तीज 2026 तिथि:
हिंदू पंचांग अनुसार ह्या वर्षी भाद्रपद शुल्क पक्ष तृतीया तिथी 13 सप्टेंबर 2026 रविवार सकाळी 7 वाजून 08 मिनिट ला सुरू होत असून 14 सप्टेंबर 2026 सोमवार सकाळी 7 वाजून 06 मिनिट ला समाप्ती होत आहे. उदय तिथी अनुसार हरतालिका तीज व्रत 14 सप्टेंबर 2026 सोमवार ह्या दिवशी करायचे आहे.
हरतालिका तीज पूजा शुभ वेळ:
14 सप्टेंबर 2026 सोमवार ह्या दिवशी सकाळी 06 वाजून 05 मिनिट पासून 7 वाजून 06 मिनिट पर्यन्त आहे. ह्या वेळेत शिव-पार्वतीची पूजा करू शकतात. ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 4 वाजून 32 मिनिट पासून 5 वाजून 19 मिनिट पर्यन्त आहे. अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 52 मिनिट पासून 12 वाजून 41 मिनिट पर्यन्त आहे. पूजा व दान-पुण्य कार्य साठी ही वेळ उत्तम आहे.
हरतालिका तीज साहित्य व पूजा विधि:
साहित्य: सखी व पार्वती अश्या दोंन मूर्ती, गणपतीची मूर्ती किंवा सुपारी गणपती म्हणून, पत्री 5 प्रकारची, हार फूल, 5 प्रकारची फळ, कापसाची माळ, ओटी साठी (हिरव्या बांगड्या, टिकली, छोटा आरसा, पान सुपारी, हळकुंड, खारीक, खोबर) समई व तेलाचा दिवा, तुपाचे निरंजन, कापुर, अगरबती
हरतालिका तीज व्रत करणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे किंवा नवीन कपडे घालून व्रत संकल्प करावा. ह्या दिवशी हिरवे वस्त्र घालून पूजा करावी. पूजेसाठी वाळू किंवा शुद्ध माती घेऊन भगवान शिव, माता पार्वती व श्री गणेश ह्यांची प्रतिमा बनवा किंवा हे शक्य नसेल किंवा वेळ नसेलतर बाजारातून आयती प्रतिमा आणावी. मग विधी पूर्वक पूजा करावी. पूजा करताना गंगाजल व पंचामृत वापरावे. भगवान शिव ह्यांच्यासाठी बेलपत्र, शमीपत्र, धतुरा व मंदारची फूल, फुलांचा हार व पाच प्रकारची विविध पान अर्पित करावी. मग समई लावावी व तुपाचा दिवा व अगरबत्ती लावावी.
पूजा करताना माता पार्वती ह्यांना सुहाग सामग्री, अर्पित करावी. त्यामध्ये मेहंदी, बांगड्या, बिंदी, व सिंदूर घ्यावे. पूजा झाल्यावर सुहागण साहित्य कोणत्या सुद्धा ब्राह्मण व विवाहित महिलेला दान करावे. हरतालिका तीज ला रात्री जागरण करणे विशेष महत्वाचे मानले जाते. रात्री झोपण्याच्या आयवजी जागरण करून शिव-पार्वतीची पूजा, आरती व भजन-कीर्तन करण्याची परंपरा आहे.
हरतालिका तीज व्रत पारण मुहूर्त:
हरतालिका तीज व्रत पारण दुसऱ्या दिवशी सूर्योदय च्या वेळी करणे सर्वात उत्तम मानले जाते. म्हणून तीज व्रत पारण ह्या दिवशी सुद्धा भद्रा विद्यमान आहे. व्रत पारण करण्यासाठी भद्रा समाप्त होई पर्यन्त थांबावे लागेल. तीज व्रतचे पारण 15 सप्टेंबर 2026 सकाळी 7 वाजून 44 मिनिट च्या नंतर करावे.
हरतालिका तीज हे नाव कसे पडले:
ह्या व्रताला हरतालिक व्रत असे म्हणतात कारणकी पार्वती माताची सखी पार्वतीला तिच्या वडिलांच्या घरून जंगलात घेऊन गेली. पार्वती ने भगवान शंकर ह्यांना मनोमन आपले पती म्हणून मानले होते व ती सारखी भगवान शंकर ह्यांची तपस्या करायची हे तिची सखी पार्वतीच्या मनात काय आहे ते जाणत होती. म्हणून ती पार्वती ला जंगलात घेऊन आली.
पौराणिक कथा अनुसार भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी ला माता पार्वती जंगलात माती वापरुन शिवलिंग बनऊन पूजा केली होती, त्यांची भक्ति बघून भगवान शिव प्रसन्न झाले व त्यांनी माता पार्वतीचा पत्नीच्या रूपात स्वीकार केला.
भगवान गणेशची पूजा महत्व:
प्रतेक शुभ कार्यमध्ये प्रथम भगवान गणेश ह्यांची पूजा केली जाते. हरतालिका व्रत ह्यादिवशी सुद्धा भगवान गणेश ह्यांची पूजा केली पाहिजे त्याशिवाय आपले व्रत पूर्ण होणार नाही. धार्मिक मान्यता अनुसार गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. कोणत्या सुद्धा पूजा किंवा व्रतमध्ये येणाऱ्या बाधा भगवान गणेश दूर करतात. म्हणूनच हरतालिका पूजेच्या वेळी महिला प्रथम भगवान गणेश ह्यांची पूजा करतात मग आपले व्रत सुरू करतात. असे केल्याने पूजा सफल होऊन निर्विघ्न होऊन संपन्न होते. त्याच बरोबर घरात सुख-समृद्धी व शांतीचे आगमन होते.

हरतालिका तीज शुभ रंग व महत्व:
हिरवा रंग: हिरवा रंग हा प्रकृती, हरियाली व सुहागचे प्रतीक आहे. माता पार्वती ला हिरवा रंग खूप प्रिय आहे.
लाल रंग: लाल रंग हा प्रेम, ऊर्जा व अखंड सौभाग्यचे प्रतीक मानले जाते.
अजून काही शुभ रंग: आपण लाल साडी किंवा हिरवी साडीच्या आयवजी पिवळी, गुलाबी, नारंगी, किंवा मारून रंगाची साडी घालू शकता.
कोणते रंग घळण्या पासून वाचावे:
धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी काले, निळे किंवा ग्रे रंग चे कपडे घालू नयेत, कारणकी हे रंग शुभ मानले जात नाहीत.
हरतालिका तीज कोणते उपाय करावे?
आपल्या विवाहित जीवनात आनंद येण्यासाठी ह्या दिवशी भोळेनाथ ना पंचामृत नी अभिषेक करून माता पार्वतीचा श्रृंगार करा.
विवाहात विलंभ किंवा विवाहित जीवनात समस्या पासून मुक्ती मिळण्यासाठी हरतालिका तीज च्या दिवशी शिव पार्वतीची विधिवत पूजा करा व शक्य असेलतर संपूर्ण दिवस व्रत करा.
तीज च्या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र घालणे शुभ आहे.
हरतालिका तीजची व्रत कथा आईकणे फलदायी मानले जाते.
