दीप अमावस्या 2026 | 11 की 12 ऑगस्ट? नेमकी कधी पूजा करावी? दीपदानाचे महत्व व पितृदोष उपाय
Deep Amavasya 2026 | 11 or 12 August? Exact Puja Date, Timing, Rituals, Deep Daan & Pitru Dosha Remedies
हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूप महत्व आहे त्यात दीप अमावस्या ह्या दिवसाला खूप महत्व आहे. दीप अमावस्या ही 11 तारखेला आहे की 12 तारखेला आहे असा संभ्रम आहे कारणकी अमावस्या तिथी 2 दिवस आहे. तर मग आपण कोणत्या दिवशी दीप अमावस्या साजरी करायची आहे.
अमावस्या तिथी प्रारंभ: 11 ऑगस्ट 2026 मंगळवार रात्री 1:53 मिनिट
अमावस्या तिथी समाप्ती: 12 ऑगस्ट 2026 बुधवार रात्री 11:06 मिनिट
प्रदोश काळ: संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर
आषाढ अमावस्या झाली की दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण महिन्यात अत्यंत पवित्र महिना मानला जातो श्रावण महिना हा भगवान शिव ह्यांना समर्पित आहे. श्रावण महिन्यात पूजा पाठ व्रत वैकल्या केली जातात तेव्हा प्रतेक दिवसाचे महत्व असते. त्यासाठी आपल्याला दिवे पाहिजे असतात, म्हणून दीप अमावस्याच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वछ करून त्याची पूजा केली जाते. त्यामुळे घरात सकारात्मकता येऊन सुख-समृद्धी येते व नाकारात्मकता दूर होऊन घरात आनंदी आनंद येतो.
आमवस्या 11 तारखेला मंगळवारी रात्री सुरू होऊन 12 तारखेला बुधवारी समाप्ती होत आहे. त्यामुळे आपण 12 तारखेला म्हणजेच बुधवारी पूजा करायची आहे. आपण सकाळी उदय तिथीला पूजा करू शकता पण शक्यतो संध्याकाळी च दिवे लावावे. आपण सकाळी सर्व दिवे साफ करून वाती घालून तयार करून ठेवू शकता.
धार्मिक मान्यता अनुसार सूर्योदय झाल्यावर प्रदोश काळा मध्ये पूजा करणे फलदायी आहे. कारणकी संध्याकाळी आपण घरात दिवे लावतो व संध्याकाळ म्हणजे अंधकारा पासून प्रकशाकडे जाणार आहे. तेव्हा आपण देवघरात दिवा लाऊन आपल्या घरात जेव्हडे दिवे आहेत तेव्हडे दिवे लावावे. त्यामध्ये वाती घालून तेल घालावे तिळाचे तेल असेलतर उत्तम नाहीतर आपण जे नेहमी वापरता ते तेल घालावे.
मग सर्व दिव्याना हळद-कुंकू व फूल अर्पित करावी. त्यामध्ये एक तुपाचा दिवा लावावा. मग ह्या दिव्याना ओवाळण्यासाठी कणकेचे दिवे बनवावे. कणकेचे दिवे बनवतात त्यामध्ये मीठ वापरू नये चिमूटभर हळद वापरावी. कणकेचे दिवे बनवून झालेकी त्यामधील दोन दिवे बाजूला ठेवावे. त्या दिव्यानि मुलांना ओवाळावे.पूजा झालीकी गोड पदार्थ ठेवावा. मग प्रार्थना करावी की आमच्या घरात सुख-समृद्धी व शांती येवूदे व नाकारात्मकता जाऊन सकारात्मकता येऊ दे.
कणकेचा एक दिवा मुख्य दरवाजा जवळ ठेवावा, दूसरा दिवा पितरांचासाठी दक्षिण दिशेला ठेवावा व एक दिवा तुळशी जवळ ठेवावा.
मग दुसऱ्या दिवशी पूजेतील देवे उचलून ठेवावे. कणकेचे दिवे आपण खाऊ शकता किंवा गाईला खायला ठेवू शकता.
पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी उपाय:
आषाढ महिन्यातील अमावस्या ही महत्वपुर्ण मानली जाते. कारणकी ह्यादिवशी पितरांना तर्पण देवून त्यांची क्षमा मागितली जाते म्हणजे आपल्या कडून कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा मागितली जाते. तसेच ह्यादिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पितरांना शांती मिळते. त्यासाठी काही सोपे उपाय सुद्धा पुढे दिलेले आहेत.
कणकेचे गोड दिवे कसे बनवावे त्याच्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे: कणकेचे गोड दिवे
आषाढ अमावस्या ह्यादिवशी दीपदान का करावे? त्याचे महत्व काय आहे.
* आपल्या घरातील कोणाचा अकाली मृत्यू होऊ नये म्हणून दीपदान करावे.
* आपल्या घरातील ज्या व्यक्ति मृत झालेल्या आहेत त्यांच्या उद्धारा करिता दीप दान करावे.
* भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांना प्रसन्न करण्यासाठी दीप दान करावे.
* राहू, केतू, शनि व यम ह्यांच्या अशुभ प्रभाव आपल्यावर किंवा आपल्या घरातील व्यक्तींवर होऊ नये म्हणजेच त्यांच्या प्रभावा पासून वाचण्यासाठी दीपदान करावे.
* आपल्या घरातील वाद विवाद भांडण तंटे मिटवेत किंवा होऊ नयेत व त्यापासून वाचण्यासाठी दीप दान करावे.
* आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा म्हणून दीपदान करावे.
* आपण मोक्ष प्राप्तीसाठी सुद्धा दीपदान करू शकता.
* आपल्या घरातील मंगलकार्य यशस्वी पणे पार पडण्यासाठी दीपदान करावे.
* आपल्या घरात नेहमी धन समृद्धी राहावी व सुख शांती राहावी म्हणून दीपदान करावे.
* दीप लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा, दान केल्याचे फळ प्राप्त होते.

आता आपण अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी काय करावे.
* आषाढी अमावस्याच्या दिवशी गंगा नदीत किंवा पवित्र नदीत स्नान करावे त्यामुळे पितृ देवतांच्या आत्म्याला शांती मिळते.
* धार्मिक मान्यता अनुसार आपल्या कुटुंबात मृत व्यक्तीचे विधिवत अंत्य संस्कार केले नसल्यास पितृ दोष होतो. ज्यांनी आपल्या आई-वडिलांचा अपमान केला आहे त्यांना सुद्धा ह्यांचा सामना करावा लागतो. मृत्यू नंतर पिंड पूजा केली नसेलतर पितृदोष असे म्हणतात. तसेच कडुलीमच्या झाडाची कतल करणे म्हणजे सुद्धा पितृदोष आहे असे म्हणतात.
* पितृदोषा मुळे सुद्धा आपल्या जीवनातील अडचणी वाढतात. म्हणून आषाढी अमावस्याच्या दिवशी कुटुंबातिल प्रतेक व्यक्तिने दान करावे. त्यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत होतील कावळे पक्षी, कुत्रे, गाई ह्यांना खावू घालावे पाणी द्यावे त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतील.
* अमावस्याच्या दिवशी पितृ देवताना धूप दाखवले तर मुलांना आशीर्वाद मिळतात. अमावस्याच्या दिवशी दुपारी पितरांना धूप आगरबत्ती अर्पण करावी. व त्यांचे स्मरण करावे.
