Chaturmas 2026 Begins on 25 July | 4 Sacred Months Explained | Do’s, Don’ts & Zodiac Remedies

Chaturmas 2026
Chaturmas 2026 Full Guide | 25 July – 20 November | Powerful Rules, Rituals & Spiritual Benefits

Chaturmas 2026 Begins on 25 July | 4 Sacred Months Explained | Do’s, Don’ts & Zodiac Remedies

25 जुलै 2026 पासून चातुर्मास सुरू! 4 पवित्र महिन्यांचे रहस्य | काय करावे-काय करू नये | राशीनुसार अचूक उपाय

चातुर्मास मध्ये भगवान विष्णु योग निद्रामध्ये जातात त्यामुळे भौतिक जीवनाशी जोडले गेलेले कोणते सुद्धा मंगल कार्य करण्यास विराम लागतो. पण खरम्हणजे पूजा, साधना, जप-तप व ईश्वर आराधना करण्यासाठी सर्वात फलदायी हा काळ मानला जातो.

चातुर्मासचे धार्मिक महत्व:
चातुर्मास मध्ये आध्यात्मिक प्रगती व साधना केली जाते. हे चार ही महीने जप, तप, ध्यान, करणे आत्म संयमासाठी विशेष महत्वाचे मानले जाते. स्कंद पुराणात सांगितल्या प्रमाणे ह्या काळात व्रत, दान व पूजा केल्याने दुपटीने पुण्य व फळ प्राप्त होते.

चातुर्मास मध्ये पाऊस अधिक प्रमाणात पडतो त्यामुळे ऋतुचक्र प्रमाणे आपला आहार करावा ह्या काळात पचनशक्ति मंदावते व वातावरणात आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवास करणे, कांदा-लसूण, मांसाहार करणे किंवा मसालेदार जेवण करणे टाळावे सात्विक आहार घ्यावा म्हणूनच धार्मिक नियम ह्या महिन्यात मानले जातात.

चातुर्मास मध्ये चारही महिन्यात येणारे सण विशेष महत्वाचे मानले जातात तेव्हा त्या त्या देवांची आराधना केली जाते. चातुर्मास 25 जुलै 2026 पासून सुरू होत असून 20 नोव्हेंबर 2026 पर्यन्त आहे. ह्या मध्ये श्रावण, भाद्रपद, आश्विन व कार्तिक महीने शमिल आहेत.
चातुर्मास मध्ये चार शुभ महीने आहेत:

श्रावण महिन्यात शिव आराधना:
चातुर्मासचा पहिला महिना श्रावण हा महिना भगवान शिव ह्यांना समर्पित आहे. ह्या महिन्यात शिवलिंग वर जलअभिषेक, रुद्रभिषेक,बेलपत्र अर्पित करणे व शिव सहस्त्रनाम चे पठन करणे विशेष फलदायी मानले जाते. धार्मिक मान्यता अनुसार श्रावण महिन्यात भगवान शिव ह्याची उपासना केल्याने वैवाहिक जीवन, स्वास्थ, ग्रहदोष व मनोकामना पूर्ण करण्यासाठी चांगला महिना आहे.

भाद्रपद महिन्यात भगवान गणेश व भगवान श्री कृष्णची कृपा:
चातुर्मास चा हा दूसरा महिना भगवान श्रीकृष्ण ह्यांची आराधना करण्यासाठी महत्वाचा महिना मानला जातो. ह्याच महिन्यात श्री कृष्ण जन्माष्टमी येते, असे म्हणातात की श्रीकृष्ण भगवान ह्यांची उपासना, श्रीमद्धभागवत गीताचे पठन केल्याने प्रेम, सुख-शांती व संतानशी जोडले गेलेली शुभ फळ प्राप्त होतात. ह्याच महिन्यात गणेश उत्सव सुद्धा धुमधडाक्यात साजरा करतात.

आश्विन महिन्यात शक्ति साधना:
चातुर्मास मास मधील तिसरा महिना म्हणजे आश्विन महिना, ह्या महिन्यात देवीची उपासना व पितृ तर्पण करणे विशेष महत्वाचे मानले जाते. ह्याच महिन्यात शारदीय नवरात्री येते धार्मिक मान्यता अनुसार ह्या महिन्यात दुर्गा देवीची उपासना व दुर्गा सप्तशती चे पठन केलेजाते तसेच पितरांना स्मरण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे जीवनात विजय, सौभाग्य व मानसिक शक्ति प्राप्त करण्यासाठी विशेष महत्वाचे मानले जाते.

कार्तिक महिन्या पासून सुरू होतात शुभ कार्य:
चातुर्मास चा शेवटचा महिना म्हणजे कार्तिक महिना आहे. ह्या महिन्यात दिवाळी, तुलसी विवाह व देवउठनी एकादशी सारखे प्रमुख सण येतात. धार्मिक मान्यता अनुसार देवउठनी एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णु योगनिद्रा मधून जागे होतात व मंगलकार्य करण्यास सुरुवात होते. कार्तिक महिन्यात भगवान विष्णु व माता लक्ष्मीची उपासना विशेष महत्वाची मानली जाते.

चातुर्मास मध्ये काय करावे व काय करू नये:
चातुर्मास मध्ये काय करावे?
चातुर्मासमध्ये सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा व आराधना करावी.
ॐ नमो भगवते वासुदेवाय किंवा ॐ विष्णवे नमः ह्या मंत्राचा जाप नियमित करावा.
रोज विष्णु सहस्त्रनाम, श्रीमद्भगवद्गीता गीताचे पठन जरूर करावे.
तुळशीच्या रोपाला रोज जल अर्पित करून रोज संध्याकाळी दिवा लावावा.
गरीब व जरूरत मंद लोकांना अन्न, वस्त्र व दक्षिणा दान करावे.
सात्विक भोजन करावे.
ब्रह्मचर्यचे पालन करावे पण संतान प्राप्तीसाठी काही मेडिकल ट्रीटमेंट घेत असालतर हा नियम लागू होत नाही.
एकादशीचे व्रत जरूर करावे त्याचे विशेष महत्व आहे.

Chaturmas 2026
Chaturmas 2026 Full Guide | 25 July – 20 November | Powerful Rules, Rituals & Spiritual Benefits

चातुर्मासमध्ये काय करू नये?
चातुर्मास मध्ये मंगलकार्य जसे की विवाह, गृह प्रवेश, जावळ विधी केले जात नाहीत.
मांस, मदिरा किंवा तामसी भोजन करू नये.
क्रोध, खोट बोलणे, निंदा किंवा हिंसा करण्या पासून दूर राहावे.
अनावश्यक विवाद किंवा अपबद्ध बोलू नयेत.

चातुर्मास मध्ये राशी नुसार सुख-समृद्धीसाठी कोणते उपाय करावे:
मेष राशि: प्रतेक मंगळवारच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र किंवा मसुरडाळ दान करावी.
वृषभ व तुला राशि: शुक्रवारच्या दिवशी पांढरे वस्त्र, भात किंवा सुगंधित अत्तर दान करावे.
मिथुन व कन्या राशि: बुधवारच्या दिवशी हिरवी फळ किंवा मुंगडाळ दान करावी.
कर्क राशि: सोमवारच्या दिवशी दूध व भात दान करावा.
सिंह राशि: रोज सूर्य भगवान ह्यांना जल अर्पित करावे व जरूरत मंद लोकांना गूळ व गहू खाण्यास द्यावे.
वृश्चिक राशि: मंगलवारच्या दिवशी काळे तीळ दान करावे व हनुमान चालीसाचे नियमित वाचन करावे.
धनु व मीन राशि: गुरुवारच्या दिवशी चनाडाळ किंवा केळी दान करावी.
मकर व कुंभ राशि: शनिवारच्या दिवशी काळे वस्त्र , मोहरीचे तेल व काळे उडीद दान करावे.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.