25 जुलै 2026 देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) तिथी काय करावे-काय करू नये व सटीक उपाय
Devshayani (Ashadhi) Ekadashi 2026 | Date, Puja Vidhi, Do’s & Don’ts, Chaturmas & Powerful Remedies
25 जुलै 2026 शनिवार ह्या दिवशी देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी दिवसभर व्रत म्हणजेच उपवास करून दुसऱ्या दिवशी पारण करायचे आहे. तसेच 26 जुलै 2026 रविवार ह्या दिवशी पासून चातुर्मास सुरुवात होत आहे चातुर्मास 120 दिवसांचा असून 21 नोव्हेंबर 2026 देवउठनी एकादशीच्या दिवशी समाप्ती होत आहे. म्हणजेच 4 महिन्यांचा आहे, ह्या मध्ये विवाह, गृह प्रवेश किंवा कोणते सुद्धा मंगलकार्य करीत नाहीत. ह्या चार महिन्यात फक्त धार्मिक कार्य केले जातात. असे म्हणतात की हे 4 महीने भगवान विष्णु योगनिद्रा मध्ये जातात. म्हणून कोणतेसुद्धा शुभ कार्य करीत नाहीत.
महाराष्ट्रमध्ये देवशयनी एकादशीलाच आषाढी एकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशी ही सर्वात महत्वाची एकादशी मनाली जाते. ह्या दिवशी तुकाराम महाराजांची पालखी देहू ह्या गावातून 15 दिवस अगोदर निघते व आषाढी एकादशीच्या आधल्या दिवशी पंढरपूर येते पाई पोचते, तसेच आळंदी ह्या गावातून द्याननेश्वर महाराजांची पालखी 15 दीवस अगोदर पायी निघून पंढरपूर येथे एकादशीच्या आधल्या दिवशी पोचते. ह्या दोन्ही पालखी मध्ये लाखों वारकरी चालते नामस्मरण करीत पायी जातात, किती ही ऊन पासून असू दे ते विठलाच्या भेटीच्या ओढीने जातात. खूप प्रसन्न वातावरण असते.
देवशयनी एकादशी तिथि:
एकादशी तिथि प्रारंभ: 24 जुलै 2026, सकाळी 9:12
एकादशी तिथि समाप्त: 25 जुलै2026, सकाळी 11:34 पर्यन्त
उदया तिथि अनुसार व्रत: 25 जुलै 2026
एकादशीच्या दिवशी भात सेवन करणे वर्ज:
एकादशीच्या दिवशी भात सेवन करणे वर्ज आहे कारणकी भाता मध्ये जल तत्व अधिक मात्रा मध्ये आहे त्यावर चंद्रचा प्रभाव आहे. एकादशीच्या दिवशी भात सेवन केल्याने मन अधिक चंचल होते त्यामुळे त्याचा प्रभाव व्रतावर व साधनावर होतो त्यामुळे मनाची एकाग्रता होत नाही.
देवशयनी एकादशी व्रत महत्व:
पद्म पुराणा नुसार भक्त देवशयनी एकादशी चे व्रत श्रद्धा पूर्वक व नियम पूर्वक करतात. त्यांना भगवान विष्णु ह्यांची विशेष कृपा प्राप्त होते. ह्या दिवशी दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
देवशयनी एकादशी काय करावे काय करू नये?
आता आपण पाहू या देवशयनी एकादशीच्या दिवशी काय करावे:
1. देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळण्यासाठी अत्यंत चांगला दिवस आहे. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करून व्रत संकल्प करावा.
2. भगवान विष्णु ह्यांच्या मूर्तीला गंगाजल अभिषेक करावा. पिवळी फूल, वस्त्र, चंदन, मिठाई , धूप व दीप अर्पित करावे. असे केल्याने भगवान विष्णु ह्यांची कृपा प्राप्त होऊन त्यांचा आशीर्वाद मिळतो.
3. भगवान विष्णु ह्यांना भोग दाखवताना तुळशी पत्र ठेवायला विसरू नका. तुळशी पत्र एकादशीच्या दिवशी कधी सुद्धा तोडू नये. आढल्या दिवशीच तोडून ठेवावे.
4. भगवान विष्णु ह्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी ॐ नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करावा व आपल्या आयपती नुसार दान-धर्म करावा.
5. देवशयनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपा जवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.
आता आपण पाहू या देवशयनी एकादशीच्या दिवशी काय करू नये:
1. देवशयनी एकादशीच्या दिवशी मांस मदिरा किंवा तामसी भोजन करू नये असे केल्याने भगवान विष्णु नाराज होतात.
2. एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र तोडू नये. कारणकी हिंदू धर्मामध्ये माता तुळशी ला माता लक्ष्मी चे रूप मानले जाते. असे म्हणतात की एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी एकादशी व्रत करते त्यामुळे ह्या दिवशी तुळशीच्या रोपाला शिवू नये त्यामुळे तिचे व्रत खंडित होऊ शकते. म्हणजेच ह्यादिवशी तुळशीच्या रोपाला शिवू नये.
3. एकादशीच्या दिवशी भात सेवन करू नये. त्यामुळे दोष लागून माता लक्ष्मी व भगवान विष्णु नाराज होऊ शकतात.
4. एकादशीच्या दिवशी वादविवाद करू नये. कोणाला सुद्धा अपशब्द बोलू नये. कोणाचा सुद्धा अपमान करू नये किंवा कोणाची चेष्टा करू नये.
5. हिंदू धर्मामध्ये काळा रंग नाकारात्मकता चे प्रतीक मानतात त्यामुळे ह्यादिवशी काळे वस्त्र परिधान करू नये. असे म्हणतात की ह्या दिवशी पूजा करताना काळे कपडे परिधान करून पूजा केल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते.

देवशयनी एकादशीच्या दिवशी करायचे अचूक उपाय:
1. आर्थिक लाभ किंवा पैशाची तंगी: एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपा जवळ गाईच्या तुपाचा चौमुखी दिवा लावावा, दिव्यामध्ये कुंकू व अक्षता घालाव्या व लांबूनच 11 प्रदक्षिणा घालाव्या.
2. मनोकामना पूर्ति होण्यासाठी: संध्याकाळी शिवलिंग वर शमीची 2 पाने व 11 काळे तीळ व 2 लवंग हातात घेऊन आपली मनोकामना बोलावी मग शमीची पाने, काळे तीळ व लवंग शिवलिंगवर अर्पित करावे.
3. भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळण्यासाठी: ह्या दिवशी “ॐ नमो भगवते वासुदेवाय” मंत्र जाप करावा व मंत्र जाप करताना भगवान विष्णु ह्यांना पिवळी फुले अर्पित करून बेसन लाडू भोग म्हणून दाखवावे.
4. दान-धर्म करावे: एकादशीच्या दिवशी आपल्या आयपती नुसार तांदूळ, आटा, तूप, गूळ, मीठ किंवा फळ दान केल्याने पुण्य मिळते.
