Guru Purnima 2026 | No Time for 21-Day Seva? Do This 10-Minute Shri Swami Samarth Seva Daily

Guru Purnima 2026
Guru Purnima 2026 | No Time for 21 Days? Do This 10-Minute Shri Swami Samarth Seva Daily

Guru Purnima 2026 | No Time for 21-Day Seva? Do This 10-Minute Shri Swami Samarth Seva Daily

गुरुपौर्णिमा 2026 | 21 दिवसांची सेवा शक्य नाही? मग रोज फक्त 10 मिनिटे करा श्री स्वामी समर्थांची प्रभावी सेवा

21 दिवसांची स्वामी सेवा करायला वेळ नाही? मग रोज फक्त 10 मिनिटे द्या!

29 जुलै 2026 बुधवार ह्या दिवशी गुरु पूर्णिमा आहे. आपण आपल्या गुरूंसाठी म्हणजेच श्री स्वामी समर्थ ह्यांच्यासाठी 21 दिवसाची सेवा (9 जुलै 2026 ते 29 जुलै 2026) कशी करायची ते ह्या अगोदर पाहिले. 21 दिवसांची सेवा करताना रोज सकाळी किंवा संध्याकाळी 1 ते 21 श्री स्वामी समर्थ ह्यांचे श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करायचे किंवा 1 माळ किंवा 11 माळा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करायचा किंवा तारक मंत्राचा 11 वेळा रोज जाप करायचा ह्याची संपूर्ण माहिती पाहिली.

पण आपल्याला 21 दिवस ही सेवा करायला वेळ नाही किंवा काही कौटुंबिक अडचणी आहेत, मुले लहान आहेत, घरात आजारी माणूस आहे किंवा एकत्र कुटुंब असल्याने आपल्याला नाही जमत तर आपण रोज 10 मिनिट फक्त सेवा करा.
स्वामी असे म्हणत नाहीत की तुम्ही तुमचे कर्तव्य सोडून दिवसभर माझी सेवा करा. स्वामी आपल्या सर्व अडचणी समजून घेतात. त्यांना आपल्या जिवना विषयी सर्व माहिती आहे, आपल्याला जीवनात काय काय अडचणी आहेत किंवा पुढे सुद्धा काय अडचणी येणार आहेत. पण गोष्ट लाक्षात ठेवा आपण गुरु मानून त्यांची सेवा केली तर आपल्या मनाला खूप शांती मिळते. त्या सेवेचे खूप लाभ सुद्धा आहेत. कोणते लाभ आहेत ते सुद्धा आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.

आपण फक्त रोज सकाळी किंवा संध्याकाळी पुढे दिलेली सेवा मनोभावे करा. आपण संपूर्ण दिवस भरात 10 मिनिट वेळ तर काढू शकताच. आपण 9 जुलै पासून 29 जुलै 2026 पर्यन्त फक्त 10 मिनिट वेळ काढून ही प्रभावी सेवा करायची आहे.
आपण 10 मिनिट सेवा करणार असाल तर 8 जुलै रोजी श्री स्वामी समर्थ ह्यांचा मठात जाऊन एक संकल्प करा की मी रोज 10 मिनिट मनोभावे सेवा करीत आहे व आपली मनोकामना स्वामिना सांगा. स्वामींच्या माठात जाताना एक नारळ, फूल व खडीसाखर बरोबर घेऊन जा व स्वामीच्या मूर्ती किंवा प्रतिमा समोर बसून त्यांच्या समोर नारळ, फूल व खडीसाखर ठेवून प्रार्थना करा व संकल्प करा की मी 9 जुलै ते 29 जुलै रोज 10 मिनिट आपली सेवा करणार आहे. आपली मनोकामना लवकरच पूर्ण होईल स्वामी आपल्या भक्तांना कधी सुद्धा निराश करीत नाहीत. ते नेहमी भक्ताच्या अडी-अडचणीला धाऊन येतात.

आता आपण पाहू या 9 जुलै पासून सेवा कशी करायची.
9 जुलै ला सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करून स्वामीच्या मूर्ती किंवा फोटो समोर बसून स्वामीच्या मूर्तीला अभिषेक करून हळद-कुंकू अक्षता अर्पित करून फूल, तुपाचा दिवा व आगरबती लावा. मग मनोभावे प्रार्थना करून उजव्या हातात जल घेऊन एक संकल्प करा की मी रोज 10 मिनिट किंवा एक माळ (108 वेळा) जाप करील व आपली मनोकामना स्वामिना सांगून हातातील जल ताम्हणात सोडा. ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे. त्याचा प्रत्यय तुम्हाला लवकरच येईल.स्वामीची कृपा प्राप्त होण्यासाठी वेळे पेक्षा भक्ति खूप महत्वाची आहे.

आता आपण पाहू या रोज 10 मिनिट सेवा कशी करायची:
* रोज सकाळी किंवा संध्याकाळी हात-पाय धुवून स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर दिवा आगरबती लावा व मनोभावे नमस्कार करा, ह्यासाठी आपल्याला फक्त 2 मिनिट लागतील.

* डोळे मिटून मन शांत करून 1 माळ (108 वेळा) मंत्र जाप करा. ह्या साठी आपल्याला 5 मिनिट लागतील.

* त्यानंतर 1 वेळा तारक मंत्र मनापासून म्हणा. त्यासाठी आपल्याला 2 मिनिट लागतील.

* मग आपण स्वामिना नमस्कार करून नेवेद्य म्हणून खडीसाखर किंवा गोड पदार्थ दाखवा व चूक भूल झाली असेलतर क्षमा मागा ह्यासाठी आपल्याला 1 मिनिट लागेल.
प्रभावी सटीक मनोकामना पूर्ति मंत्र: “श्री स्वामी समर्थ”

Guru Purnima 2026
Guru Purnima 2026 | No Time for 21 Days? Do This 10-Minute Shri Swami Samarth Seva Daily

“श्री स्वामी समर्थ” ह्या मंत्राचा जाप करताना मंत्राचा ऊचार अगदी साफ पाहिजे म्हणजे हळुवार पणे म्हणा, खूप फास्ट फास्ट मंत्र म्हणायचा नाही.
आपण अगदी सोपी 10 मिनिटांची सेवा कशी करायची ते पहिले आपण 10 मिनिट नक्की वेळ काढू शकता.

श्री स्वामी समर्थ ह्यांचे नामस्मरण करण्याचे महत्व किंवा लाभ:
प्रारब्धाची तीव्रता कमी होते.
मन शांत व आनंदी राहते.
सेवा केल्याचे समाधान मिळते
आपली वास्तु शुद्ध होते व वास्तु दोष असेलतर निघून जातो
प्रारब्धा भोगण्याची क्षमता वाढते
घरात सात्विकता वाढते व घरातील वातावरण चांगले राहते
संसारीक अडचणी कमी होतात किंवा दूर होतात
घरातील व्यक्तिमद्धे प्रेमभाव निर्माण होतो
घरात भगवंताचा वास राहतो.
काळजी मिटून भीती जाते
संकटाला सामोरे जाण्याच्या शक्ति मिळते
आपण स्वभाव बदलत जातो व सकारात्मकता येते
आपल्या सदगुणांत जलद गती येवून वृद्धी होते
साकक्षांत सद्गुरूनचा हात आपल्या मस्तकी असतो.
नियम: फक्त नॉनव्हेज खाणे वर्ज आहे.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.