Yogini Ekadashi 2026 | Date, Puja Muhurat, Paran Time, Importance & Powerful Remedies for Wealth and Freedom from Troubles
10 जुलै 2026 योगिनी एकादशी 🔥 फक्त हे 7 उपाय करा | धनवर्षाव, विष्णू कृपा व सर्व संकटांपासून मुक्ती
योगिनी एकादशी भगवान विष्णु ह्यांना समर्पित असून ह्या दिवशी काही उपाय केलेतर धन लाभ व कष्टा पासून मुक्ती मिळून जीवनात सकारात्मकता येते. मिळेल. चला तर मग पाहू या योगिनी एकादशी ह्या दिवसाची संपूर्ण माहिती.
हिंदू धर्मा नुसार संपूर्ण वर्ष भरात 24 एकादशी तिथी येतात. जेव्हा अधिक मास येतो तेव्हा त्या वर्षी 26 एकादशी तिथी येतात. कोणती सुद्धा एकादशी ही भगवान विष्णु ह्यांना समर्पित असून ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांची पूजा केली जाते.
धार्मिक मान्यता अनुसार, हे व्रत विधी पूर्वक केल्याने साधकाच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होऊन सुख-समृद्धीमध्ये वृद्धी होते. आता आपण पाहू या योगिनी एकादशीची तारीख, शुभ मुहूर्त व धार्मिक महत्व काय आहे व कोणते सटीक उपाय करायचे आहेत.
सर्व एकादशी मध्ये आषाढ महिन्यातील एकादशी योगिनी एकादशीचे व्रत विशेष महत्वाचे मानले जाते. ह्या दिवशी श्रद्धा पूर्वक व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
योगिनी एकादशी व्रत शुभ महूर्त व पारण वेळ:
धार्मिक मान्यता अनुसार एकादशी व्रताचे पारण न केल्यास साधकाला पुण्य प्राप्ती मिळत नाही. योगिनी एकादशी व्रत पारण 11 जुलै शनिवारी 1 वाजून 50 मिनिट पासून 4 व वाजून 36 मिनिट पर्यन्त आहे. ह्या वेळेत व्रत पारण करू शकता.
योगिनी एकादशी 10 जुलै 2026 शुक्रवार
ब्रह्म मुहूर्त – सकाळी 04:09 मिनिट ते 04:50 मिनिट पर्यन्त
अभिजित मुहूर्त- सकाळी 11:59 मिनिट ते 12:54 मिनिट पर्यन्त
विजय मुहूर्त – दुपारी 02:45 मिनिट ते 03:40 मिनिट पर्यन्त
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी 07:21 मिनिट ते 07:41 मिनिट पर्यन्त
अमृत काल- सकाळी 08:47 मिनिट ते 10:16 मिनिट पर्यन्त
योगिनी एकादशी शिववास योग:
योगिनी एकादशीच्या दिवशी शिववास चा योग बनत आहे. ह्या दिवशी भगवान शिव सकाळी 08:16 मिनिट ह्या वेळेत कैलाश पर्वतावर आहेत. ह्या वेळेत भगवान शिव ह्यांची पूजा व अभिषेक केल्याने साधकाच्या जीवनात सुख-सौभगया व वंश वाढण्यास मदत होते. त्याच बरोबर शुभ कामामध्ये सफलता मिळते. ह्या दिवशी बव व बालव करणचे पण योग आहेत. पहिल्यादा बव करण योग आहे नंतर बालव करण संयोग आहे.
योगिनी एकादशीचे धार्मिक महत्व:
धार्मिक मान्यता अनुसार, योगिनी एकादशी ह्या दिवशी विधीपूर्वक व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळेल. व्रताला आत्मा शुद्धीचे महत्वपूर्ण मानले जाते. ह्या खास दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा अर्चा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येवून सुख-समृद्धी येते. त्याच बरोबर कधी सुद्धा कशाची कमतरता पडत नाही. त्याच बरोबर धन लाभ योग बनून अन्न भंडार भरलेल राहते. ह्या दिवशी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ ह्या मंत्राचा जाप करावा व विष्णु सहस्त्रनाम पठन, तुळशी पत्र अर्पित करावे व आपल्या सामर्थ्य नुसार दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. योगिनी एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णु ह्याची पूजा अर्चा करून व्रत करावे व भगवान विष्णु ह्यांना भोग व पिवळी फळे अर्पित करावी व पिवळी मिठाई अर्पित करावी.
योगिनी एकादशी उपाय कोणते करावे?
जरूरतमंद लोकांना धन दान करावे:
योगिनी एकादशी ह्या दिवशी जरूरतमंद लोकांना धन दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून विष्णु भगवान ह्यांची पूजा करून गरीब लोकांना धन, अन्न-दान करावे. नाहीतर ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करावे. असे केल्याने जीवनातील सर्व बाधा दूर होऊन अन्न व धनाची कमतरता होत नाही.

तुळशीच्या रोपांची पूजा करावी:
तुळशीच्या रोपाला विष्णुजीनची प्रिया ह्या रूपात पूजले जाते. योगिनी एकादशी ह्या दिवशी तुळशीची विधी पूर्वक पूजा अर्चा केल्यास व भगवान विष्णु ह्यांना तुळशी पत्र अर्पित केल्यास भगवान विष्णु व माता लक्ष्मीची कृपा लाभते. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होऊन जीवनातील सर्व समस्या दूर होतील.
योगिनी एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा पुढील कामे करू नका:
1. योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र चुकून सुद्धा तोडू नये. धार्मिक मान्यता अनुसार तुळशी माता सुद्धा एकादशी व्रत करते. म्हणून ह्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका व पाणी सुद्धा घालू नका
2. तामसी भोजन सेवन करू नका: एकादशीच्या दिवशी कांदा-लसूण-आल, मांसाहारी जेवण व दारू सेवन करणे वर्ज आहे. ह्या दिवशी वरील गोष्टी सेवन केल्यास व्रत तुटू शकते व त्याच बरोबर भात सेवन करणे सुद्धा वर्ज आहे.
3. मिठाचा उपाय: एकादशी व्रतच्या दिवशी मीठ पूर्ण पणे वर्ज असते. व्रताच्या दिवशी सेंधा नमकच वापरावे. सामान्य मीठ वापरू नये.
4. क्रोध व वाद-विवाद करू नये: एकादशीच्या दिवशी राग-राग व भांडण करू नयेत. कोणाला सुद्धा अपशब्द बोलू नये. धार्मिक मान्यता अनुसार असे केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळत नाही व जीवनात अडीअडचणी येतात. त्याच बरोबर कोणा विषयी वाईट बोलू नये.
