अधिक मास ( पुरुषोत्तम मास) गुरुवारच्या पूजेचे खास महत्व, उपाय, दान करणे महापुण्यदायी
Adhik Maas Thursday Puja 2026 | Vishnu Puja Vidhi, Daan & Powerful Remedies In Marathi
आता 17 मे 2026 रविवार पासून अधिक मास चालू झाला असून 15 जून 2026 सोमवार पर्यन्त आहे. आपल्याला माहीत असेलच अधिक मास मध्ये भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांची पूजा अर्चा मंत्र जाप करणे किती शुभ आहे. त्याचा बरोबर अधिक मास मध्ये आईची ओटी कशी भरायची त्याची पण माहिती आपण ह्या अगोदर पाहिली त्यानंतर आपण अधिक मास मध्ये लेक व जावयाला कोणते वाण द्यावी ह्याची सुद्धा संपूर्ण माहिती ह्या अगोदर पाहिली.
आता आपण अधिक मास मध्ये गुरुवारच्या पूजेचे काय महत्व आहे ते आपण पाहू या.
गुरुवार हा दिवस भगवान विष्णु ह्यांचा मानला जातो. अधिक मास मधील गुरुवारची पूजा करणे खूप खास मानले जाते. ह्या दिवशी पूजा पाठ केल्याने सर्व पापा पासून मुक्ती मिळून सर्व मनोकामना पूर्ण होतात.
अधिक मास मधील गुरुवार खूप शुभ मानला जातो. ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांची विधी पूर्वक पूजा करण्याचे महत्व आहे. ह्या दिवशी विष्णु भगवान ह्यांची पूजा व सत्यनारायण पूजा करणे व कथा आइकणे खूप महत्वाचे मानले जाते. ह्या दिवशी काही वस्तूंचे दान करणे महापुण्यदायी मानले जाते.
अधिक मासच्या गुरुवारी करा हे काम:
अधिक मास च्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून करताना पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान केल्याने पुण्य मिळते. मग व्रत, पूजा व दान करण्याच्या संकल्प करा. दूध व पाणी मिक्स करून भगवान विष्णु ह्यांचा अभिषेक करा. भगवान विष्णु ह्यांची पूजा झाल्यावर तुलसी पत्र अर्पित करा. मग भगवान शालिग्राम ह्यांची पण पूजा करा. ह्या दिवशी पिंपळाच्या वृक्षा जवळ तुपाचा दिवा लावावा. अधिक मास मध्ये गुरुवारच्या दिवशी गाईला जरूर घास देणे अतिउत्तम आहे.
अधिक मासमध्ये गुरुवार च्या दिवशी काही वस्तुचे दान करा:
अधिक मास मध्ये गुरुवारच्या दिवशी जरूरतमंद लोकांना अन्न व जल च्या बरोबर जरूरी वस्तु दान करणे शुभ आहे. गुरुवारी भगवान विष्णु ह्यांची पूजा केली जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी चनाडाळ दान केल्याने सर्व कष्टा पासून व समस्या पासून मुक्ती मिळते. जे गुरुवारचे व्रत करताना त्यांनी पिवळे वस्त्र परिधान करावे व पिवळ्या रंगाच्या वस्तुचे दान केले पाहिजे त्यांनी पिवळ्या रंगाचे अन्न प्राशन केले पाहिजे, ह्या दिवशी चनाडाळ सेवन करणे व दान करणे खूप शुभ मानले जाते.

गुरुवारी जर आपण भगवान विष्णु ह्यांच्या मंदिरात जाऊन केसर व सव्वा किलो चनाडाळ दन करून विष्णु सहस्त्रनाम जाप केला तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात हा उपाय केल्याने आर्थिक तंगी दूर होते. गुरुवारी गोड फळे व पिवळी मिठाई दान केल्याने नोकरी मधील परेशानी दूर होतात. ह्या दिवशी ब्रह्मणाला पिवळे वस्त्र दान केल्याने बिघडलेली कामे नीट होतात.
गुरुवारी भगवान विष्णु ह्याच्या मंदिरात जाऊन सुरहीचे दान केल्याने जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. गुरुवारी भगवान विष्णु ह्यांच्या मंदिरात जाऊन जरूरत मंद लोकाना हळद दान केल्याने विवाह योग लवकर येऊन विवाहामधील येणाऱ्या अडचणी दूर होतात.
गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी 33 वातीनचा दिवा लावणे शुभ आहे, आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा लाऊ शकता.
