Padmini Ekadashi 2026 | Kamala Ekadashi Vrat, Story, Muhurat, Paran Time & Powerful Remedies

Padmini Ekadashi 2026
Padmini Ekadashi 2026 | Kamala Ekadashi Vrat, Story, Muhurat, Paran Time & Powerful Remedies

संतान सुख व मोक्ष देणारी पद्मिनी एकादशी शुभ मुहूर्त पारण वेळ पौराणिक कथा, नियम व उपाय

Padmini Ekadashi 2026 | Kamala Ekadashi Vrat, Story, Muhurat, Paran Time & Powerful Remedies

27 मार्च 2026 बुधवार पद्मिनी एकादशी आहे, तिलाच कमला एकादशी असे सुद्धा संबोधले जाते. आपण पाहणार आहोत अधिक मास मधील पद्मिनी एकादशीचे महत्व, शुभ मुहूर्त, पारण वेळ व सटीक उपाय कोणते आहेत. कमला एकादशी संतान सुख व मोक्ष देणारी राजा कीर्तिवीर्य व रानी पद्मिनी ह्यांची पुराणिक कथा.
सनातन धर्मामध्ये पुरुषोत्तम मास (अधिमास/मलमास) चे विशेष महत्व आहे. ह्या पवित्र महिन्यात शुल्क पक्ष मध्ये येणारी एकादशी ला पद्मिनी एकादशी असे म्हणतात. तिलाच ‘पुरुषोत्तमी’ किंवा ‘कमला एकादशी’ ह्या नावाने संबोधले जाते. स्कन्द पुराण, पद्म पुराण, भविष्य पुराण व विष्णु पुराण नुसार ह्या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या आयुष्यातील पाप नष्ट होऊन शेवटी विष्णु लोकाची प्राप्ती होते. धार्मिक मान्यता अनुसार ह्या व्रता पेक्षा जीवनात दुसरे कोणते सुद्धा यज्ञ किंवा दुसरे कोणते सुद्धा पुण्य अनुष्ठान नाही.

शास्त्रा नुसार ह्या दिवशी केलेले व्रत किंवा उपवास पर्यन्त फक्त सीमित नाही तर आंतरिक शुद्धता, अतूट आस्था व निस्वार्थ भक्तिचे प्रतीक आहे.

कमला अकडशी तिथि, शुभ मुहूर्त व पारण वेळ:
हिंदू पंचांग अनुसार, ह्या वर्षी अधिक मास मध्ये शुक्ल पक्ष पद्मिनी एकादशी 27 मे 2026 बुधवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. हिंदू धर्मामध्ये उदय तिथी मानली जाते म्हणून भक्त ह्या दिवशी व्रत ठेवतील.

पंचांग अनुसार मुख्य वेळ:
एकादशी तिथी प्रारंभ: 26 मे 2026 (मंगळवार) सकाळी 5:10 मिनिट
एकादशी तिथी समाप्ती: 27 मे 2026 (बुधवार) सकाळी 6:21 मिनिट पर्यन्त
व्रत (उदय तिथी): 27 मे 2026 बुधवार
व्रत पारण शुभ वेळ: 28 मे 2026 गुरुवार सकाळी 5:25 ते 7:56 पर्यन्त
व्रताचा संपूर्ण लाभ मिळण्यासाठी पारण नेहमी शुभ वेळेच्या आता केले पाहिजे.

पौराणिक कथा: राजा कीर्तिवीर्य व रानी पद्मिनीची तपस्या:
पद्मिनी एकादशी ची कथा त्रेतायुग शी जोडली गेली आहे, ज्याचे संक्षिप्त विवरण पुढे दिलेले आहे.
1. संतान सुखा पासून वंचित होते राजा कीर्तिवीर्य
पौराणिक कथा अनुसार त्रेतायुग मध्ये महिष्मति नगरीचे राजा कीर्तिवीर्य हे आपल्या एक हजार पत्नीना घेऊन सुखात रहात होते, त्यांच्या कडे सर्व काही होते पण संतान सुख पासून वंचित होते. त्यांनी खूप उपाय केले, यज्ञ केले, पूजा पाठ केले तरी पण त्यांना संतान प्राप्ती झाली नाही म्हणून राजानी एक निर्णय घेतला त्यानी सर्व राजपाठ सोडून तपस्या करण्याचा.

2. गंधमादन पर्वत वर कठोर तप केले
राजा जेव्हा यात्रेला निघाले तेव्हा त्यांची पत्नी राणी पद्मिनी सुद्धा त्यांच्या बरोबर निघाली त्यांनी गंधमादन पर्वतावर जाऊन अनेक वर्ष कठोर तपस्या केली.

3. माता अनुसुइया चे मार्गदर्शन व व्रताचे फल:
राणी पद्मिनीची अखंड भक्ति व कठीण तप पाहून सती अनुसूया प्रसन्न होऊन तिच्या समोर प्रकट झाली तेव्हा माता अनुसूया नि राणी पद्मिनीला अधिक मास मध्ये शुक्ल पक्ष मध्ये येणाऱ्या एकादशीचे पुत्र प्राप्तीसाठी मनोभावे व्रत करायला सांगितले
माता अनुसूयाच्या निर्देशानुसार राजा व राणीने पूर्ण श्रद्धा, निष्ठा व विधी पूर्वक एकादशी व्रत केले. व्रताच्या पुण्य प्रभावानी भगवान विष्णु प्रसन्न झाले व त्यांनी राणी पद्मिनी पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद दिला व नऊ महिन्या नंतर राणी पद्मिनीला महापराक्रमी पुत्र झाला म्हणून राणीच्या नावा वरच ह्या एकादशीचे नाव पद्मिनी एकादशी म्हणून पडले.

पद्मिनी एकादशी महत्व:
पद्मिनी एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णु (श्री हरी) ह्यांची पूजा करतात. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी व्रत केल्याने सर्व पापा पासून मुक्ती मिळते, संतान सुख प्राप्त होते व मोक्ष प्राप्ती होते. ह्या वर्षी पद्मिनी एकादशी ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग व रवि योग ह्यांचा अद्भुत संयोग येत आहे. त्यामुळे पूजेचे फळ कितीतरी पटीने मिळेल.

Padmini Ekadashi 2026
Padmini Ekadashi 2026 | Kamala Ekadashi Vrat, Story, Muhurat, Paran Time & Powerful Remedies

पद्मिनी एकादशीच्या दिवशी करावयाचे प्रमुख उपाय:
धन व सुख-समृद्धिसाठी: एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपा जवळ तुपाचा दिवा लाऊन विष्णु सहस्रनाम म्हणावे.

कर्ज मुक्ति साठी:
एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णुच्या फोटो समोर 11 तुळशी पत्र अर्पित करून पाच मुखी दिवा लाऊन “ॐ नमो भगवते वासुदेवाय” ह्या मंत्राचा जाप करा.

आंवला स्नान:
एकादशीच्या दिवशी स्नान करताना पाण्यात आवल्याचा रस घालून स्नान करा त्याने शारीरिक, मानसिक व वाचिक पापा पासून मुक्ती मिळेल.

तुळशीला प्रदक्षिणा मारा:
एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला प्रदक्षिणा मारा व भगवान शालिग्राम किंवा भगवान श्री कृष्ण ह्यांना तुळशी पत्र अर्पित करा.

दान:
आपल्या आयपती प्रमाणे अन्न किंवा वस्त्र दान करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दुसऱ्याच्या येथे किंवा दुसऱ्यांनी दिलेले अन्न सेवन करू नका.

कमला एकादशीच्या दिवशी पाळावयाचे नियम:
एकादशीच्या दिवशी तांदूळ (भात) सेवन करणे वर्ज मानले जाते.
व्रत करताना दूध, फळे, साबुदाणा, शेगदाणे, भगर सेवन करावे.
शक्य असेलतर दिवसभर निरजली उपवास करावा.
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे. भगवान विष्णु व माता लक्ष्मीची पूजा करावी. पूजे मध्ये पिवळी फुले, तुळशी पत्र, नेवेद्य व धूप-दीप वापरावे व ॐ नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करावा.
कमला एकादशीची कथा आइकावी.
कमला एकादशीच्या दिवशी कोणाशी वाईट बोलू नये, राग राग करू नये, खोटे बोलू नये.
कांदा-लसूण सेवन करू नये. तसेच दुपारी झोपू नये.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी सर्योदया नंतर योग्य मुहूर्तवर उपवास सोडवा.
पराण करताना सर्व प्रथम तुळशीचे पान व तीर्थ सेवन करून मगच अन्न प्राशन करावे.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.