अधिक मास 2026 विवाहित स्त्रिया जोडवी का बदलतात? कोणती चूक करू नये? सासुला काय द्यावे?
Adhik Maas 2026 Why Married Women Change Toe Rings? Mistakes to Avoid & Gifts for Mother-in-law
17 मे 2026 रविवार अधिक मास सुरू होत असून 15 जून 2026 सोमवार समाप्ती होत आहे. अधिक महिना हा खूप पवित्र महिना आहे. तसेच अधिक मास भगवान विष्णु ह्यांना समर्पित आहे. ह्या महिन्यात भगवान विष्णु ह्यांची पूजा, सेवा, मंत्रजाप, व्रत व दानधर्म केले जाते.
अधिक महिन्यात 33 ह्या अंकाला खूप महत्व आहे. पौराणिक मान्यता अनुसार आपल्या हिंदू संस्कृतिमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास आहे असे म्हणतात. अधिक मास मध्ये दीप दानाचा अर्थ आहे “अंधकार वरती प्रकाशाचा विजय”
आपण अधिक मास जेव्हा 33 वतींचा एक दिवा असे 33 दिवे लावतो तेव्हा ते दिवे 33 कोटी देवी-देवताना समर्पित आहेत. असे केल्याने सर्व देवी-देवतांची दिव्य शक्तिचा आशीर्वाद प्राप्त होतो.
आपल्याला माहीत आहे का? हिंदू कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या हालचालींवर आधारित आहे.
सूर्य वर्ष हे 365 दिवसांचे असते तर चंद्र वर्ष हे 354 दिवसांचे असते. ह्यामधील फरक म्हणजे 11 दिवसांचा आहे. हा फरक भरून काढण्यासाठी साधारणतः 32 महिने 16 दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, त्यालाच अधिक मास म्हणतात. ह्या वर्षी खास असे आहे की अधिक मास मध्ये जेष्ट मास पण आहे. त्यामध्ये अधिक मास हा 30 दिवसांच्या आयवजी 60 दिवसांचा आहे. अधिक मास हा दर 3 वर्षानी एकदा येतो.
अधिक मास मध्ये मुलीने आईची ओटी भरणे हे शुभ, धार्मिक व भावनिक दृष्टीने महत्वाचे आहे. आपल्या जीवनात आईचे स्थान हे मोठे आहे. आपल्या आईसाठी, तिच्या सन्मानासाठी, तिच्या दीर्घ आयुष्यसाठी आपण तिची ओटी भरून तिच्यासाठी प्रार्थना करू शकतो. आपली आई आपल्या मुलांच्या सुखासाठी आपल्या इछा बाजूला ठेवून सतत काम करीत असते.
अधिक मास मध्ये विवाहिक महिला जोडवी बदलतात तर विवाहिक महिला जोडवी का बदलतात? तसेच जोडवी बदलताना कोणत्या चुका होऊ शकतात व त्याचे परिणाम काय होऊ शकतात. त्याची सविस्तर माहिती आपण पाहू या.
अधिक महिन्यात सोनारा कडे जाऊनच जोडवी बदलावी, अधिक महिन्यात सोनाराकडे जोडवी बदलण्यासाठी खूप गर्दी असते. तसेच महिलांना जोडवी खूप आवडतात त्यामुळे त्या आतुरतेने अधिक मास ची वाट पाहत असतात. आपल्या मध्ये लग्नात जोडवी घातली जातात. त्यानंतर अधिक महिन्यात जोडवी बदलली जातात. जोडवी म्हणजे पती-पत्नी ह्यांना जोडणारी एक मजबूत गाठ आहे तसेच त्याचा चंद्र ग्रहाशी संबंध सुद्धा आहे. चंद्र ग्रह हा नाते संबंधाशी जोडला गेलेल्या आहे.
आपण पायातील बोटात जेव्हा जोडवी घालतो त्याचे एक अजून महत्वाचे कारण आहे. आपल्या जोडवी घातलेल्या बोटयाची शिर ह्याच गर्भाशयाशी संबंध आहे त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. चांदी हा धातू थंड आहे. आपल्या पायातील जोडवी रोज वापरुन त्याचे जमिनीशी घर्षण होते. व ती काळी पडतात व झिजतात.
आपण जोडवी बदलताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत किंवा पुढील चुका टाळल्या पाहिजेत.
1. जोडवी नेहमी चांदीचीच घ्यावी आपण वेढे असलेली जोडवी घेताना 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेढ्याची जोडवी घ्यावी 3 वेढ्याची जोडवी घेऊ नये.

2. जोडवी घेताना खोटी सुद्धा घेऊ नये. किंवा सोन्याची जोडवी सुद्धा घेऊ नये, कारणकी सोने आपण नेहमी पूजातो तिला लक्ष्मीचे रूप मानतो. त्यामुळे आपण सोन्याची जोडवी पायात घालू नये लक्ष्मी माताचा अपमान होतो. तसेच आपल्या कमरेच्या खालच्या भागा खाली सोने परिधान करू नये.
3. आपण आपली वापरलेली जोडवी कोणला सुद्धा देवू नये तर सोनाराकडे जाऊन त्यामध्ये भर टाकून नवीन जोडवी घ्यावीत. किंवा कोणाची वापरलेली जोडवी सुद्धा घेऊ नयेत. ते सौभाग्याचे प्रतीक आहे.
4. आपल्या मैत्रिणीला किंवा बहिणीला किंवा अजून कोणाला जोडवी द्यायची असतील तर त्यांना सोनारा कडे जाऊन नवीन जोडवी घेऊन द्यावीत.
5. बोटात जोडवी घालताना खूप घट्ट किंवा सैल सुद्धा घालू नयेत. ती बोटातून निघून पडली तर अशुभ आहे असे म्हणतात.
आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत नाहीतर त्याचे काही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील.
