Healthy Rava Veg Fingers Recipe | Crispy Veg Finger Snack for Kids | Easy Semolina Breakfast
1कप रवा अगदी भन्नाट हेल्दि नाश्ता मुलांच्यासाठी कल्पनाच केली नाही इतका मस्त बनेल Veg Fingers
झटपट नाश्ता एक वाटी रवा व मुले आवडीने खातील अश्या भाज्या. भन्नाट हेल्दि नाश्ता मुलांच्यासाठी बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. तसेच ह्यामध्ये भाज्या सुद्धा आहेत त्यामुळे हेल्दि सुद्धा आहे. आपण हा नाश्ता कोणी पाहुणे येणार असतील किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा बनवू शकतो. इतका मस्त वरतून कुरकुरीत व आतून सॉफ्ट लागतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 12 पिसेस बनतात
साहित्य:
1 कप रवा
1 मध्यम आकाराची शिमला मिरची (बारीक चिरून)
1 छोटे गाजर (बारीक चिरून)
1/2 कप स्वीट कॉर्न दाणे
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
1 छोटा कांदा (बारीक चिरून)
2 टे स्पून कोथिंबीर (बारीक चिरून)
1 टी स्पून चिली फ्लेस्क
1 चीज क्युब
1 टे स्पून तेल
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
स्लरी बनवण्यासाठी:
3 टे स्पून कॉर्नफलोर
2 टे स्पून मैदा
मीठ चवीने
3 ब्रेड स्लाइस व 1/4 वाटी बारीक शेवया

कृती: कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर व हिरवी मिरची बारीक चिरून घ्या, स्वीट कॉर्न दाणे थोडेसे उकडून घ्या. गाजर उभे पातळ चिरून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून कांदा, गाजर, शिमला मिरची, हिरवी मिरची व स्वीटकॉर्न दाणे 2 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये रवा घालून मंद विस्तवावर भाज्या व रवा 5-7 मिनिट परतून घ्या.
आता त्यामध्ये चवीने मीठ घालून मिक्स करून 1 कप पाणी घालून मिक्स करून रवा मंद विस्तवावर शिजवून घ्या. जर मिश्रण खूपच कोरडे वाटले तर अजून अगदी थोडेसे पाणी घाला, मग 5 मिनिट झाकण ठेवून एक वाफ येवू द्या.
रव्याला चांगली वाफ आली की त्यामध्ये चिली फ्लेस व कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊन विस्तव बंद करा. रव्याचे मिश्रण थोडेसे थंड झाले की त्यामध्ये चीज किसून घालून परत मिक्स करून घ्या.
आता एक बटर पेपर घेऊन त्यावर रव्याचे मिश्रण काढून चौकोनी आकारामद्धे एक सारखे थापुन घ्या. मग फ्रीजमध्ये 10-15 मिनिट सेट करायला ठेवा. मग बाहेर काढून त्याचे आयताकृती पिसेस करून घ्या. जर आपल्याला आयताकृती पिसेस करायचे नसतील तर गोल लांबट पिसेस करू शकता.
आता एका बाउल मध्ये कॉर्नफलोर, मैदा व मीठ मिक्स करून लागेल तसे पाणी घालून मिडियम अशी पातळ स्लरी बनवा खूप पातळ किंवा खूप घट्ट नको. ब्रेड स्लाइस मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा, तेल गरम झालेकी एक रव्याच्या मिश्रणाचा एक पीस घेऊन कॉर्नफलोर च्या स्लरीमध्ये सर्व बाजूनी बुडवून मग ब्रेडक्रम मद्धे घोळून गरम तेलात सोडा पॅन मोठा असेलतर 4 पिसेस बसतील आपल्या पॅनच्या आकारा मुसार पिसेस ठेवा. मंद विस्तवावर दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व पिसेस तळून घ्या.
गरम गरम नाश्ता टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.
