Swami Samarth Punyatithi 7 Diwsachi Sopi Sewa In Marathi

Shri Swami Samarth Punyatithi
Swami Samarth Punyatithi 7 Diwsachi Sopi Sewa

स्वामी समर्थ पुण्यतिथि सगळ्यात सोपी 7 दिवसांची सेवा, सर्व मनोकामना 100% पूर्ण होतील

Swami Samarth Punyatithi 7 Diwsachi Sopi Sewa In Marathi

15 एप्रिल 2026 बुधवार ह्या दिवशी श्री स्वामी समर्थ ह्यांची पुण्यतिथि आहे. आपण काही सोप्या सेवा करू शकता. आपण 7 दिवसाची म्हणजे 9 एप्रिल 2026 तो 15 एप्रिल 2026 पर्यन्त प्रभावी सेवा करू शकता.

आपण 3 सोप्या सेवा करू शकता. पहिली म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत चे 21 अध्यायाचे पठन करू शकता, रोज 11 माळ “श्री स्वामी समर्थ” ह्या मंत्राचा जाप करू शकता, रोज 11 वेळा तारक मंत्राचा जाप करू शकता. आपल्याला जसे जमेल तशी सेवा करू शकता.पण एक नियम कटाक्षाने पाळा तो म्हणजे मांसाहार करू नका नाहीतर आपल्याला आपण केलेल्या सेवेचे फळ प्राप्त होणार नाही.

आपण म्हणतो मला वेळ नाही मला खूप काम असतात पण आपण थोडा शक्य तेव्हडा वेळ काढून सेवा करावी, ह्या सेवा करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्यांची कृपा प्राप्त होते सर्व अडचणी मधून मार्ग निघतो.आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपण कोणती सुद्धा मनोभावे सेवा केलीतर आपल्याला त्याचे फळ निश्चित मिळते.

पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत,आपण 7 दिवस रोज 21 अध्याय वाचू शकता त्यासाठी आपल्याला दीड ते दोन तास लागतात. जर आपल्याला रोज 21 अध्याय वाचन करणे शक्य नसेलर 7 दिवस रोज 3 अध्याय वाचन करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा श्री स्वामी चरित्र सारामृतचे वाचन करणार असाल तेव्हा 1 माळ म्हणजे 108 वेळा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करा व त्याच बरोबर एक वेळा तारक मंत्राचा जाप करा.

दुसरी सेवा म्हणजे आपण 7 दिवस रोज 11 माळा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करू शकता असे नाहिकी 11 माळच जाप करा आपण पाहिजे तेव्हडा जाप करू शकता. पण रोज 11 माळ तरी 7 दिवस जाप कराच.

तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्र आपण रोज 7 दिवस किमान 5 किंवा 11 वेळा तरी तारक मंत्राचा जाप करावा तारक मंत्र हा खूप प्रभावी मंत्र आहे. आपण दिवस भरात पाहिजे तितक्या वेळा तारक मंत्र म्हणू शकता.

Shri Swami Samarth Punyatithi
Swami Samarth Punyatithi 7 Diwsachi Sopi Sewa

आपण ही सेवा काही संकल्प करून करणार असाल तर संकल्प करून आपली मनातील इछा बोलून मग सेवा सुरू करू शकता. आपण काही संकल्प नकरता सुद्धा ही सेवा करू शकता. आपण सेवा सुरू केली की एकदा तरी स्वामीच्या माठात जाऊन यावे.

आपण जेव्हा कोणती सुद्धा सेवा करायचे ठरवतो तर ती मनोभावे करावी तरच आपल्याला त्याचे फळ प्राप्त होते. आपण त्यासाठी काही सोपे नियम पाळले पाहिजेत.

श्री स्वामींची सेवा करण्याचे काही सोपे नियम आहेत:
7 दिवस ही सेवा करीत असाल तर मांसाहार करू नये सात्विक जेवण सेवन करावे. शुद्ध विचार ठेवावे, कोणची सुद्धा निंदा करू नये. घरातील वातावरण आनंदी ठेवावे त्यामुळे घरात सकारात्मकता येते. मासिक पाळी असेलतर ही सेवा करू नये
आपण ही सेवा दिवस भरात कधी सुद्धा करू शकता. फक्त सकाळी 12 ते 12:30 ह्या वेळत सेवा करू नये. कारणकी ही वेळ स्वामींची भिक्षेची वेळ आहे.
आपण ही सेवा शक्य असेल तेव्हडे दिवस करू शकता, उदा. 11 दिवस, 7 दिवस, 5 दिवस किंवा पुण्यतिथि दिवसाच्या दिवशी.
आपण स्वामींच्या पुण्यतिथिच्या दिवशी दिवसभर पाहिजे तेव्हडा जाप करू शकता व ह्या दिवशी स्वामींना नारळ व वस्त्र अर्पित करावे ते त्यांना खूप प्रिय आहे. त्याच बरोबर अन्नदान जरूर करावे.

श्री स्वामी समर्थ ह्यांचे नामस्मरण करण्याचे महत्व:
प्रारब्धाची तीव्रता कमी होते.
मन शांत व आनंदी राहते.
सेवा केल्याचे समाधान मिळते
आपली वास्तु शुद्ध होते व वास्तु दोष असेलतर निघून जातो
प्रारब्धा भोगण्याची क्षमता वाढते
घरात सात्विकता वाढते व घरातील वातावरण चांगले राहते
संसारीक अडचणी कमी होतात किंवा दूर होतात
घरातील व्यक्तिमद्धे प्रेमभाव निर्माण होतो
घरात भगवंताचा वास राहतो.
काळजी मिटून भीती जाते
संकटाला सामोरे जाण्याच्या शक्ति मिळते
आपण स्वभाव बदलत जातो व सकारात्मकता येते
आपल्या सदगुणांत जलद गती येवून वृद्धी होते
साकक्षांत सद्गुरूनचा हात आपल्या मस्तकी असतो.

15 एप्रिल 2026 बुधवार रोजी आपला संकल्प पूर्ण झाल्यावर श्री स्वामीना गोड नेवेद्य दाखवून आपला संकल्प पूर्ण करावा.

 

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.