16 February 2026 Somvati Amavasya Time Puja Vidhi and Snan-Daan Muhurat in Marathi
16 फेब्रुवारी सोमवती अमावस्या 2026 तिथी पूजा विधी, मुहूर्त व पितरांना प्रसन्न करण्यासाठी सटीक उपाय
17 फेब्रुवारी मंगळवार कंकणाकृती सूर्य ग्रहण आहे पण भारतात दिसणार नाही त्यामुळे ते आपण पाळायचे नाही.
सोमवती अमावस्या ह्या दिवसाचे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व मुलांच्या सुखासाठी ठेवतात. ह्या दिवशी माता पार्वती व भगवान शिव ह्यांची पूजा अर्चा करण्याचे विशेष महत्व आहे. धार्मिक मान्यता आनुसार ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान व दान करण्याचे विशेष महत्व आहे, त्यामुळे पितृ दोष पासून मुक्ती मिळून जीवनात सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो. योग्य मुहूर्त वर पूजा व व्रत करण्याचे विशेष फळ प्राप्त होऊन परिवारात सुख-शांती राहते.
अमावस्या तिथीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र व आध्यात्मिक दृष्टीने महत्व आहे. जेव्हा अमावस्या ही सोमवार ह्या दिवशी येते तेव्हा त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात. त्यामुळे त्याचे महत्व अधिक पटीने वाढते. असे म्हणतात की ह्या दिवशी स्नान, दान व पूजा पाठ केल्याने विशेष पुण्य मिळते. खास करून पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने मन व आत्मा शुद्ध होतो व जीवनातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
धार्मिक मान्यता अनुसार सोमवती अमावस्याला माता पार्वती व भगवान शिव ह्यांची विधीपूर्वक पूजा केल्याने विवाहित जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व परिवाराच्या खुशाली साठू व्रत करतात. त्याच बरोबर पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा मारतात.
चला तर मग बघू या सोमवती आमवस्या तिथी, स्नान-दान करण्याचा शुभ मुहूर्त किंवा शुभ वेळ व संपर्ण पूजा विधी काय आहे.
सोमवती अमावस्या कधी आहे?
पंचांग अनुसार अमावस्या तिथी 16 फेब्रुवारी सोमवार संध्याकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी सुरू होत असून 17 फेब्रुवारी मंगळवार ह्या दिवशी संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी समाप्त होत आहे. 16 फेब्रुवारी सोमवार ह्या दिवशी सूर्यास्त होण्याच्या अगोदर अमावस्या तिथी सुरू होत आहे, म्हणून सोमवार ह्या दिवशी सोमवती आमवस्याचे व्रत ठेवायचे आहे. तसेच 17 फेब्रुवारी मंगळवार ह्या दिवशी सुद्धा अमावस्या तिथी आहे तर त्याला भौमवती आमवस्याचा संयोग आहे असे म्हणतात.
सोमवती अमावस्या 2026 शुभ मुहूर्त:
16 फेब्रुवारी सोमवार ह्या दिवशी सोमवती अमावस्या आहे. ह्या दिवशी स्नान व दान करण्याची शुभ वेळ 17 फेब्रुवारी मंगळवार सकाळी आहे. जे विशेष पुण्यदायी मानले जाईल. ह्या दिवशी पितरांची शांती व आशीर्वादसाठी दुपारीच्या वेळी तर्पण, पिंडदान व अजून काही उपाय केले जाऊ शकतात. त्यामुळे ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान व दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होईल व पितृदोषा पासून मुक्ती मिळेल.
सोमवती अमावस्याच्या दिवशी दीपदान करावे:
अमावस्या च्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरच्या छतावर किंवा घराच्या मुख्य दरवाजा जवळ दक्षिण दिशा च्या दिशेने तुपाचा दिवा लावावा. दीपदान केल्याने पितृ देव प्रसन्न होऊन सात पिढ्या परिवाराला सुख समृद्धी व खुशालीचे वरदान मिळते.

सोमवती अमावस्या 2026 पूजा विधि:
* अमावस्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्त वर उठून स्नान करावे व स्वच्छ कपडे परिधान करावे,त्यानंतर व्रत संकल्प करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व परिवाराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी.
* जर शक्य असेलतर शिव मंदिरमध्ये जाऊन भगवान शिव व माता पार्वतीची विधीपूर्वक पूजा करावी. जर मंदिरमध्ये जाणे शक्य नसेलतर घरीच एक चौरंग ठेवून त्यावर लाल रंगाचे वस्त्र घालून शिव पार्वतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
* पूजा करताना शिवलिंग व माता पार्वतीच्या मूर्तीवर 7 किंवा 11 वेळा कचे सुत अर्पित करावे. असे केल्याने आपल्या विवाहिक जीवनात प्रेम व स्थिरता राहते.
* भगवान शिव ह्यांना जल, दूध, बेलपत्र, व माता पार्वती ह्यांना शृंगारचे साहित्य अर्पित करावे. मग विधी पूर्वक पूजा व आरती करावी व परिवारात सुख-शांती राहण्यासाठी प्रार्थना करावी.
* पूजा झाल्यावर पिंपळाच्या वृक्षाला 108 वेळा प्रदक्षिणा मारणे शुभ मानले जाते. 108 वेळा प्रदक्षिणा मारताना एक धागा घेऊन घेऊन पिंपळाच्या वृक्षाला बाधा. मग पिंपळाच्या वृक्षाला जल, दूध, चंदन व अक्षता अर्पित कराव्या.
* शेवटी आपल्या पितरांच्या शांतीसाठी व आशीर्वाद मिळण्यासाठी दान-पुण्य करावे व जरूरतमंद लोकांना भोजन व वस्त्र द्यावे.
