Maha Shivratri 2026 Durlabh Shubh Symyog, Manokamna Purti Upay In Marathi
महाशिवरात्री 2026 दुर्लभ शुभ संयोग, उपाय केलेतर सर्व मनोकामना पूर्ण होऊन किस्मत बदलेल
महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रविवार ह्या दिवशी आहे. महाशिवरात्री 2026मध्ये शिव-पार्वतीचा दुर्लभ संयोग बनत आहे, ह्या दिवशी काही सोपे सटीक उपाय केलेतर विवाहिक सुख, धन, मानसिक शांती, नोकरी-व्यवसाया संबंधित अडचणी, संतती प्राप्ती अडचणी, विवाहमध्ये येणाऱ्या अडचणी व आरोग्याशी जोडल्या गेलेल्या परेशानी पासून सुटका होऊ शकते.
महाशिवरात्री म्हंटले की आपोआप मनात भक्ति-वैराग्य व आस्थाचा भाव येतो. ह्या वर्षी येणारी महाशिवरात्री ही साधीसुधी नाही. ह्या वर्षी शिव-पार्वती मिलन हा एक दुर्लभ संयोग येत आहे जी अनेक वर्षा नंतर येत आहे. ह्या दिवशी फक्त पूजा पाठ करण्याचे महत्व नसून आपल्या जीवनातील अधुरे राहिलेली कामे पूर्ण करण्याचा एक अवसर आहे. संपूर्ण देशात ह्या दिवशी महाशिवरात्री आपल्या परीने साजरी केली जाते, कोणी उपवास करून, कोणी रात्री जागरण करून. असे म्हणतात की महाशिवरात्री ह्या रात्री शिव तत्व अधिक सक्रिय होतात. ह्या वर्षी महाशिवरात्री अधिक सक्रिय होत आहे. अश्या वेळी आपण जर काही सरल उपाय केलेतर व्यक्तीच्या जीवनातील वैवाहिक जीवन, आर्थिक स्थिति, मानसिक शांति व स्वास्थ्य संबंधित तक्रारी, नोकरी व्यवसाया संबंधित अडचणी, संतान प्राप्ती संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होईल.
महाशिवरात्रि 2026 ज्योतिषीय महत्व:
शास्त्रानुसार महाशिवरात्री शिव व शक्तिचा संतुतील पर्व आहे. 2026 मध्ये ग्रहांची स्थिति अशी होत आहे. त्यामध्ये चंद्र व गुर ह्या ग्रहांचा विशेष प्रभाव आहे, हा संयोग भावनात्मक स्थिरता व सौभाग्य वृद्धीचा संकेत आहे. तसेच ह्या दिवशी केलेले उपाय विशेष फळ देणारे आहेत.
महाशिवरात्री ह्या दिवशी पती-पत्नी दोघांनी मिळून पूजन केलेतर आपल्या घरगुती जीवनातील अडचणी सुटण्यास मदत होईल. खास करून जे पती-पत्नी बऱ्याच दिवसान पासून अडचणीत आहेत. त्यांच्या साठी ही रात्र खूप शुभ आहे.
आता आपण महाशिवरात्रीच्या दिवशी काही सोप उपाय आहेत ते पाहू या:
सौभाग्य व वैवाहिक सुखसाठी उपाय: गौरी-शंकर पूजन केल्यास नाती सुधारतील.
विवाहामध्ये उशीर होत असेलतर, वैवाहिक जीवनात तनाव असेलतर, महाशिवरात्री च्या दिवशी शिव-पार्वतीचे दोघांनी पूजन करावे, पार्वती माताला सिंदूर, बांगड्या व टिकली अर्पित करावी व भगवान शिव ह्यांना पंचामृत नी अभिषेक करणे फलदायी आहे. असे केल्याने नाते संबंधमध्ये सुधार होतो.
आर्थिक परेशानि असेलतर निराकरण होईल: त्यासाठी ऊसाच्या रसानी शिव अभिषेक करा
आज कालच्या वेळेत आर्थिक अस्थिरता ही एक सर्वांची समस्या बनली आहे. शास्त्रामध्ये असे म्हणतात की महाशिवरात्री च्या दिवशी ऊसाच्या रसानी शिव अभिषेक केला तर धन संबंधित अडचणी कमी होतात. ॐ नम: शिवाय ह्या मंत्राचा जाप करत अभिषेक केल्याने मनात सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो व निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते.
मानसिक शांति व नकारात्मकते पासून मुक्ति: त्यासाठी बेलपत्रचा विशेष प्रयोग करा:
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक अशांती ही एक मोठी समस्या आहे. भगवान शिव ह्यांना बेलपत्र खूप प्रिय आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी 108 बेलपत्रवर चंदनाच्या पेस्टनी “राम” असे लिहून अर्पित करा हा एक खूप जुना पण अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे मन शांत होऊन घरातील वातावरण सुधारते.
स्वास्थ्य व रोग बाधा पासून छुटकारा: त्यासाठी महामृत्युंजय मंत्रचा जाप करा
खूप दिवसांपासून आजारपण व आरोग्याच्या तक्रारी त्यामुळे मनात भीती व बेचेनी येते. अश्या वेळी महाशिवरात्रीच्या रात्री महामृत्युंजय मंत्रचा जाप केल्याने विशेष फळ मिळते. शिवलिंगवर काळे तीळ व जल मिक्स करून अभिषेक केल्याने आत्मबल वाढते व त्याच बरोबर रोगाशी लढण्याची ताकत वाढते.
नोकरीत सफलता मिळण्यासाठी:
आपल्याला जर नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे असेलतर महाशिवरात्रीच्या रात्री कोणत्या सुद्धा जुन्या शिव मंदिर मध्ये जाऊन शिवलिंगवर माध अप्रीत करा, असे करताना ॐ नम: शिवाय ह्या मंत्राचा जाप करा. मध अप्रीत केल्याने आपल्या वाणीमध्ये गोडवा येतो व कार्यक्षेत्र मध्ये आपल्या वरिष्ठ व्यक्ति कडून सहयोग मिळतो.
व्यवसायात फायदा होण्यासाठी:
व्यवसायात तोटा होत असेलतर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या प्रहरच्या पूजेमद्धे ऊसाच्या रसानी अभिषेक करा. ज्योतिष शास्त्रानुसार उसाचा रस लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अडकलेले धन परत मिळते व व्यवसाय वृद्धीचे नवे मार्ग मिळतात.
ग्रह दोष निवारण करण्यासाठी:
महाशिवरात्रीच्या मध्य रात्री शिव मंदिरात जाऊन किंवा बेलाच्या झाडाखाली 11 तुपाचे दिवे लावा. असे केल्याने कुंडलीमधील ग्रह दोष शांत होतो व अडलेली कामे पूर्ण होतात. जर आपणाला कर्ज झाले असेलतर हा उपाय एक रामबाण उपाय होऊ शकतो.

शनि दोषा पासून मुक्ती मिळण्यासाठी:
ज्या व्यक्तीवर शनि साडेसातीचा प्रभाव आहे त्यांनी महाशिवरात्रीच्या रात्री काळे तीळ व जल अभिषेक शिवलिंगवर करावा त्याच बरोबर शमीची पाने अर्पित करावी. त्यामुळे शनि कृपा मिळते व जीवनात येणाऱ्या समस्या पासून मुक्ती मिळते.
सुख-समृद्धिसाठी:
सर्व कष्टा पासून मुक्ती मिळण्यासाठी 21 किंवा 108 बेलपत्र वर पांढऱ्या चंदनाने “राम” असे लिहावे मग शिव पार्वती ह्यांना एक एक करून अर्पित करावे. असे केल्याने भगवान शिव खुश होऊन आशीर्वाद देतात.
