Mahashivratri: Shivlilamrut Granthache 1,3,5,7 Diwasache Parayan Kadhi-Kase Karawe, Niyam In Marathi

Mahashivratri 2026
Mahashivratri Shivlilamrut Granthache 1,3,5,7 Diwasache Parayan Kadhi-Kase Karawe, Niyam

Mahashivratri: Shivlilamrut Granthache 1,3,5,7 Diwasache Parayan Kadhi-Kase Karawe, Niyam In Marathi

महाशिवरात्री: शिवलीलामृत ग्रंथाचे 1,3,5,7 दिवस पारायण कधी-कसे करावे, सोपे नियम सर्व इच्छापूर्ति

महाशिवरात्रीसाठी शंकर भगवान ह्याचे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करायची सोपी पद्धत तसेच 1,3,5 किंवा 7 दिवस पारायण कसे करावे ह्याची संपूर्ण माहिती दिली आहे व नियम सुद्धा सोपे आहेत कोणी सुद्धा पारायण अगदी सहज करू शकते.

आता 15 फेब्रुवारी 2026 रविवार ह्यादिवशी महाशिवरात्री हा दिवस साजरा करायचा आहे. हा दिवस अत्यंत महत्वाचा व पवित्र आहे. आपण महाशिवरात्रीसाठी 1 दिवस, 3 दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवसाचे पारायण करू शकता.
शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत पण आता अजून एक 15 वा आध्याय आला आहे, पण आपण फक्त 14 अध्याय पठन केले तरी चालेल.

आता आपण पाहू या किती दिवसाचे पारायण करायचे व किती अध्याय पठन करायचे.
1 दिवसाचे पारायण: 15 फेब्रुवारी 2026 रविवार महाशिवरात्री ह्या दिवशी 1 दिवसात 14 अध्याय पठन करून आपण एक पारायण करू शकता.

3 दिवसाचे पारायण: आपण सलग 3 दिवसाचे पारायण करू शकता म्हणजे 5 – 5 – 4 अध्याय असे तीन दिवस अध्याय पठन करू शकता.

5 दिवसाचे पारायण: आपण 5 दिवस सलग 3 – 3 – 3 – 3 – 2 अध्याय असे 5 दिवस पारायण करू शकता.

7 दिवसाचे पारायण: आपण 7 दिवस म्हणजे रविवार पासून शनिवार पर्यन्त किंवा सोमवार पासून रविवार पर्यन्त रोज 2 अध्याय पठन करू शकता.

आपण पारायण सुरू केल्यावर जर काही घरगुती अडचण आली किंवा मासिक पाळी आली तर आपण महाशिवरात्री झाल्यावर 1-2 दिवसांत सुद्धा आपले पारायण पूर्ण करू शकता.

महाशिवलीलामृत ग्रंथाचे पठन करताना ब्रह्मवेळ किंवा प्रदोष वेळ पाळणे शुभ आहे किंवा दुपारी 12 ते 12:30 किंवा 4 ते 5 ही वेळ सुद्धा चांगली आहे किंवा आपल्याला जमेलतेव्हा पठन करू शकता.

महाशिवलीलामृत मध्ये शिवाची महानता, लिंग पूजा व रुद्राक्ष धरणाचे फायदे काय आहेत ते सांगितले आहे. तसेच शिवाने आपल्या भक्तांचे संकट कशी दुरकेली व त्यांना वरदान कसे दिले ते सांगितले आहे. भक्ताने श्रद्धा पूर्वक पारायण केल्यास दुख नाश, सुख-समृद्धी व मोक्ष कसा मिळतो ते सांगितले आहे.

महाशिवलीलामृत पठन करायचे नियम काय आहेत:
महाशिवलीलामृत पठन करायचे नियम अगदी सोपे आहेत. महाशिवलीलामृत ग्रंथ पठन ब्रम्ह मुहूर्त किंवा प्रदोष काळात करणे उत्तम आहे.
महाशिवलीलामृत पठन करायचे अगोदर व पठन झाल्यावर ॐ नम: शिवाय ह्या मंत्राचा जाप करावा.
महाशिवलीलामृत पठन करताना घरातील देव घरासमोर बसून पठन करावे. पठन करताना पांढरे किंवा अन्य दुसऱ्या कोणत्या सुद्धा रंगाचे वस्त्र परिधान करावे फक्त काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये.
महाशिवलीलामृत पठन करताना कांदा-लसूण वर्ज करावे व परअन्न घेऊ नये, कारण की आपण श्रद्धेने पठन करणार व परअन्न सेवन केलेतर त्या मागची भावना आपल्याला समजणार नाही. कोणच्या घरी किंवा हॉटेलमधील जेवण पठन करताना सेवन करू नये. त्याच बरोबर ब्रह्मचार्यचे पालन करावे.

Mahashivratri 2026
Mahashivratri Shivlilamrut Granthache 1,3,5,7 Diwasache Parayan Kadhi-Kase Karawe, Niyam

महाशिवलीलामृत ग्रंथामध्ये प्रतेक अध्यायाची फलश्रुति आहे. त्यामधील 11 वा अध्यायमध्ये ब्रह्मानंदांची प्राप्ती होते.

आपण महाशिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणार असाल तेव्हा शिव मंदिरात जाऊन आपण भगवान शिव ह्यांना प्रार्थना करावी की आपण किती दिवसाचे पारायण करीत आहोत व आपली मनोकामना पूर्ण होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करावी.

महाशिवलीलामृतचे पारायण पूर्ण झाले की शिव मंदिरात जाऊन पांढरे जानवे अर्पण करून शिधा द्यावी, शिधा देताना गहू, तांदूळ दिले तरी चालतील. मग दही-भातचा नेवेद्य दाखवून मग वर्ण-भात व गोड पदार्थचा नेवेद्य दाखवावा. रोज पारायण करताना दिवा-अगरबत्ती लाऊन खडीसाखर ठेवावी व संपूर्ण श्रद्धा पूर्वक सेवा करावी त्याने आपल्याला सुख-संपत्ति प्राप्त होऊन संकट दूर होतील, आपली प्रगती होईल.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.