बटाटा-ब्रेड न वापरता, मुलांसाठी पौष्टिक कुरकुरीत मटार कचोरी सोपी पद्धत वडा-समोसा विसराल
Tasty Crispy Green Peas Kachori For Kids In Marathi
आता हिरव्या ताज्या मटारचा सीझन चालू आहे. आपल्याला बाजारात ताजे मटार मिळतात. हिरवे ताजे मटार वापरुन आपण निरनिराळ्या डिश बनवू शकतो.
आज आपण मटार वापरुन एक मस्त टेस्टि कुरकुरीत पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत. आपण अश्या प्रकारचा नाश्ता ब्रेकफास्ट किंवा साइडडिश म्हणून किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा बनवू शकतो, बनवायला सोपा व झटपट होणारा आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 15 कचोरी
साहित्य:
1 कप हिरवे ताजे मटार
3 हिरव्या मिरच्या
1” आले तुकडा
7-8 लसूण पाकळ्या
1 टी स्पून जिरे
1 कप तांदळाचे पीठ
1/2 कप गव्हाचे पीठ
1/4 टी स्पून हिंग
1 टे स्पून तीळ
1 टी स्पून चिलीफ्लेस्क
1 टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी

कृती: प्रथम मिक्सरच्या जारमध्ये हिरवे मटार, लसूण-आल-हिरवी मिरची, जिरे घालून पानी न घालता जाडसर वाटून घ्या.
एका कढईमध्ये 2 कप पाणी गरम करायला ठेवा, पाणी गरम झालेकी त्यामध्ये हिंग, तीळ, चिलीफ्लेस्क, कोथिंबीर व मीठ चवीने घालून मिक्स करून घ्या, पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये तांदळाचे पीठ व गव्हाचे पीठ घालून मिक्स करून एक वाफ आली की विस्तव बंद करून मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या.
आता मिश्रण थोडेसे थंड झाले की चांगले मळून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याला गोल चपटा किंवा बदामचा आकार देवून ठेवा. आपल्याला जेव्हडया कचोरी पाहिजे तेव्हाडया घेऊन बाकीच्या हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा 2-3 दिवस छान राहतात.
एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाले की त्यामध्ये मध्यम विस्तवावर दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत तळून घ्या.
आता गरम गरम ताज्या मटारची कचोरी टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
