Angarki Ganesh Chaturthi Satik Upay For Kids In Marathi

Angarki Ganesh Chaturthi
6 January 2026 Angarki Ganesh Chaturthi Satik Upay In Marathi

अंगारकी चतुर्थी उपाय करून श्री गणेशजिना करा प्रसन्न, व्यापार व धन संपत्तिमध्ये होईल वाढ
आईने मुलांच्या प्रगतीसाठी करावयाचे उपाय

Angarki Ganesh Chaturthi Satik Upay For Kids In Marathi

हिंदू धर्मामध्ये अंगारकी गणेश चतुर्थीचे खूप महत्व आहे. हा दिवस भगवान गणेश ह्यांना समर्पित आहे. ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांची पूजा अर्चा केल्याने सुख-शांती मिळते. हिंदू पंचांग अनुसार कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. पॅन जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवार ह्या दिवशी येते तेव्हा त्याला अंगारकी गणेश चतुर्थी असे म्हणतात. ह्या दिवशी भक्त गणेश भगवान ह्यांची पूजा अर्चा व व्रत करतात. त्यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात.

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काही खास उपाय केलेतर व्यक्तिला कर्जापासून मुक्ती मिळते. त्याच बरोबर धन-धान्यामध्ये वृद्धी होते. चला तर मग आपण पाहू या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करायचे.

* आपल्याला माहिती असेलच खुपवेळा व्यक्ति बरीच मेहनत करतो पॅन त्यामध्ये त्याला यश मिळत नाही. त्यासाठी मग भगवान गणेश ह्यांची पूजा नियमित केल्याने लाभ होतात. जर आपल्याला जीवनात सफलता पाहिजे असेलतर भगवान गणेश ह्यांचे ध्यान करून “श्री गणेशाय नम:” ह्या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जाप करा.

* आपल्याला व्यापारात सफलता मिळण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश ह्यांना 11 दूर्वाची जुडी म्हणजेच 11 जुडया बनवून अर्पित करा. हा उपाय केल्याने आपल्या व्यवसायात सफलता मिळेल व त्याच बरोबर कर्ज परत करण्याची समस्या सुद्धा मिटेल.

* अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश ह्यांना मोदक किंवा बुंदीचे लाडू भोग म्हणून अर्पित केल्यास धन धान्यमध्ये वृद्धी होते. संकष्टी किंवा अंगारकी चतुर्थीच्या व्यतिरिक्त आपण बुधवार ह्या दिवशी सुद्धा असे करू शकता असे केल्याने घरात कशाची सुद्धा कमतरता होत नाही.

* जर कोणाला कर्जा पासून मुक्ती पाहिजे असेलतर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरात जाऊन भगवान गणेश ह्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा करून ॐ गं गणपतये नम: ह्या मंत्राचा जाप करा.

* घरात सुख समृद्धी पाहिजे असेलतर भगवान गणेश ह्यांना जल अभिषेक करा. मग अभिषेक केलेले जल संपूर्ण घरात शिंपडा, असे केल्याने घरात सुख समृद्धी राहते.

अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पूजा विधि:
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान गणेश ह्यांना प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण दिवस व्रत करून त्यांच्या समोर आपल्या मनोकामना बोला. स्नान झाल्यावर लाल रंगाचे वस्त्र परिधान करून भगवान गणेश ह्यांची पूजा अर्चा करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा. भगवान गणेश ह्यांच्या मूर्तीला छान फुलांनी सजवा. मग हळद-कुंकू, अक्षता, गूळ-खोबरे, बुंदीचे लाडू, फळ, तांब्याच्या कलशमध्ये पाणी, नारळ, धूप, चंदन, प्रसाद, केळी अर्पित करा. मग लाडूचा भोग दाखवावा. गणेश भगवान ह्यांना दूर्वा अतिप्रिय आहेत त्यामुळे दूर्वा अर्पित करायला विसरू नका. मग भगवान गणेश ह्यांची आरती करा.

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाला चंद्राची पूजा करून गणेश भगवान ह्यांची आरती म्हणून नेवेद्य दाखवून मग व्रत सोडावे.
अंगारकी चतुर्थी चांगली वेळ: दुपारी 12:40 ते दुपारी 2:02 पर्यन्त
राहू काल: दुपारी 3:24 ते संध्याकाळी 4:46 पर्यन्त
संकट काल: सकाळी 9:56 ते 11:18 पर्यन्त

Angarki Ganesh Chaturthi
6 January 2026 Angarki Ganesh Chaturthi Satik Upay In Marathi

अंगारकी चतुर्थी तिथी:
6 जानेवारी 2026 सकाळी 8:01 प्रारंभ
7 जानेवारी 2026 सकाळी 6:52 मिनिट पर्यन्त समाप्ती
अंगारकी चतुर्थी चंद्रोदय: 6 जानेवारी मंगळवार रात्री 9:16 मिनिट

आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी कोणते उपाय करायचे आहेत:
अंगारकी चतुर्थीच्या दिवशी किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी अगदी सोपे उपाय करायचे आहेत, त्यामुळे मुलांची प्रगती होऊन त्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. भगवान गणेश हे विघ्नहर्ता आहेत तसेच बुद्धीचे देवता आहेत.

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आई आपल्या मुलांसाठी करू शकते जर मुले मोठी असतील तर मुलांना हा उपाय करायला सांगावा किंवा मुले लहान असतील व अभ्यासात लक्ष देत नसतील तर आईने स्वतः हा उपाय करावा. तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी 21 दूर्वाची जुडी घेऊन मुलांच्या उजव्या हातात देऊन (म्हणजे त्याचा शेंडा आपल्या बाजूला ठेवून) 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणावे किंवा 11 वेळा गणपती स्तोत्र म्हणावे. मग मनोभावे प्रार्थना करावी. त्यामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागते एकाग्रता वाढते. जर मुले कोणत्या परीक्षेसाठी बसत असतील तर त्यांनी सुद्धा हा उपाय करावा यश नक्की मिळेल.

अजून एक सोपा उपाय आहे संध्याकाळी एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेऊन त्यावर 2 कापुर ठेवून जाळावे व त्यावेळी “ॐ श्री विघ्नहर्ता नम:“

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.