देव उठनी एकादशी 1 का 2 नोव्हेंबरला? तिथी व शुभ मुहूर्त, तुलसी विवाह आरंभ, विवाह अडचणी उपाय
Dev Uthani Ekadashi 2025 Shubh Muhurat Tulsi Vivah Arambh Vivah Adchni Upay In Marathi
प्रतेक महिन्यात दोन वेळा एकादशी व्रत असते. ही तिथी भगवान विष्णु व माता लक्ष्मी ह्यांना समर्पित आहे. नोवेमबर महिन्यात देव उठनी एकादशी व उत्पन्ना एकादशी साजरी केली जाते. धार्मिक मान्यता अनुसार
एकादशी व्रत ही विधीपूर्वक केल्यास साधकाचे सर्व पापान पासून मुक्ती होऊन भगवान विष्णु ह्यांची कृपा प्राप्त होऊन सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात. त्याच बरोबर सुख-समृद्धीमध्ये वृद्धी होते व कामातील सर्व अडचणी दूर होतात. आता नोव्हेंबर महिना चालू होणार असून ह्या महिन्यात एकादशी कधी आहे ते पाहू या.
देवउठनी एकादशी तारीख व शुभ मुहूर्त: (Devuthani Ekadashi 2025 Date and Shubh Muhurat)
वैदिक पंचांग अनुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी तिथीला देव उठनी एकादशी व्रत केले जाते. ह्या दिवशी चातुर्मास समाप्ती होते असून भगवान विष्णु योगनिद्रा मधून जागृत होतात.
कार्तिक मास शुक्ल पक्ष एकादशी तिथी सुरुवात: 1 नोव्हेंबर सकाळी 9 वाजून 11 मिनिट पासून
कार्तिक मास शुक्ल पक्ष तिथी समाप्ती 2 नोव्हेंबर सकाळी 7 वाजून 31 मिनिट पर्यन्त
देवउठनी एकादशी 2025 व्रत पारायण वेळ: (Dev Uthani Ekadashi 2025 Vrat Paran Time)
एकादशी व्रत पारायण ही नेहमी द्वादशी तिथीला केले जाते. ह्या वर्षी देव उठनी एकादशी व्रत पारायण 2 नोव्हेंबर ह्या दिवशी आहे.
व्रत पारायण वेळ: दुपारी 1 वाजून 11 मिनिट ते संध्याकाळी 3 वाजून 23 मिनिट पर्यन्त
देव उठनी एकादशी ह्या तिथी पासून तुलसी विवाह करण्यास सुरुवात होते.
देव उठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवसा पासून तुलसी विवाह:
ह्या वर्षी 2 नोव्हेंबर पासून तुलसी विवाहला सुरुवात होईल. ह्या दिवशी भक्त भगवान शालिग्राम व माता तुलसीचा विवाह करतात. असे म्हणतात की ज्याना संतान नाही त्यांनी तुलसी विवाह जरूर करावा. असे केल्याने विवाहिक जीवन सुखी होते.
हिंदू धर्मामध्ये शुभ मुहूर्तला खूप महत्व आहे. ह्या शुभ मुहूर्तवर मंगल कार्य,मुंडन, साखरपुडा, नामकरण, गृह प्रवेश व विवाह केले जातात. प्रतेक व्यक्तीच्या जीवनात विवाह सारखा शुभ कार्य खास मुहूर्त व तिथीला केले जातात.
विवाहमध्ये जर अडचणी किंवा विलंब होत असेल तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु ह्यांना देव उठनी एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णु ह्यांना चंदन, जानवे व पिवळी फळे व नारळ अर्पित करून त्याबरोबर तुलसी पत्र अर्पित करा. त्यानंतर भगवान विष्णु ह्यांची आरती म्हणा त्यामुळे विवाह योग लवकर जुळून येईल.
तुलसी विवाहच्या दिवशी सकाळी स्नान करण्याच्या वेळी अंघोळीच्या पाण्यात एक चिमूत हळद घालून स्नान करा. त्यामुळे शरीर व मन शुद्ध होईल हा उपाय गुरु ग्रहला शक्ति देतो. स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र घालून माता तुलसी व भगवान शालिग्राम ह्यांची विधी पूर्वक पूजा करा. पूजेच्या वेळी तुलसी व शालिग्राम ह्यांना हळदीचा लेप लाऊन दूध अर्पित करा. असे केल्याने कुंडली मधील गुरु ग्रह मजबूत होतो. त्यामुळे विवाह लवकर जुळून येतो.

तुलसी विवाहच्या दिवशी माता तुलसी व भगवान शालिग्राम ह्याचा विवाह संस्कार सर्वात महत्व पूर्ण मानले जातात. पूजा झाल्यावर तुलसीचे रोप व भगवान शालिग्राम ह्यांना लाल धाग्यानी बांधा. ही दैविक मिलन व शुभ विवाहचे प्रतीक आहे. विवाह झाल्यावर गरीब किंवा ब्राह्मण किंवा मुलींना कपडे, फळ, मिठाई किंवा धन चे दान करावे. ही दान करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
तुपाचा दिवा लावावा व मंत्रजाप करावा. तुलसी विवाह च्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपा जवळ तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. दिवा लावताना आपली मनोकामना सांगावी. त्यानंतर तुलसी चालीसाचे पठन करावे. मग पुढे दिलेला मंत्र 11 वेळा किंवा 108 वेळा म्हणावा. असे केल्याने तुलसी माता लवकर प्रसन्न होते. घरात सुख, शांती व सौभाग्य येऊन विवाहा मधील अडचणी दूर होतात.
मंत्र: “ॐ सृष्टिकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा”