20 ऑक्टोबर सोमवार नरक चतुर्दशी छोटी दिवाळी कोणत्या देवांची पूजा करतात, दीप दानाचा शुभ मुहूर्त
20 October 2025 Narak Chaturthi Chhoti Diwali 2025 Full Information In Marathi
नरक चतुर्दशीला रूप चौदस किंवा छोटी दिवाळी ह्या नावांनी ओळखले जाते. कार्तिक महिन्यातील चतुर्दशी ह्या तिथीला ही साजरी होते. ह्या दिवसाचे धार्मिक व पौराणिक दृष्टीने विशेष महत्व मानले जाते. ह्या वर्षी छोटी दिवाळी 20 ऑक्टोबर सोमवार ह्या दिवशी साजरी करायची आहे.
छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीचे पौराणिक महत्व:
आपल्याला माहीत आहे का छोटी दिवाळी भगवान राम ह्यांची नाहीतर भगवान श्री कृष्ण भगवान ह्यांच्याशी संबंधित आहे. धार्मिक मान्यता अनुसार भगवान श्री कृष्णनी नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यानी 16,000 मुलींना बंदी बनवून ठेवले होते. भगवान श्री कृष्णनी त्यांना मुक्त केले होते. म्हणून ह्या तिथीला नरक चतुर्दशी म्हणतात.
शुभ मुहूर्त व पूजन विधि:
पंचांग नुसार नरक चतुर्दशी आरंभ 19 ऑक्टोबर रविवार दुपारी 01:51 पासून सुरू होत असून 20 ऑक्टोबर 2025 सोमवार दुपारी 03:44 पर्यन्त आहे. ह्या अवधिमध्ये आपण यम दीपक लाऊन पूजा करू शकता.
नरक चतुर्दशी ह्या दिवशी अभ्यंग स्नान मुहूर्त सकाळी 05:12 ते सकाळी 06:25 पर्यन्त आहे. दीपदान केल्याने व्यक्तिला नरक कष्टा पासून मुक्ती मिळते व जीवनात सौभाग्य वाढते.

नरक चतुर्दशी छोटी दिवाळी कोणाची पूजा केली जाते?
नरक चतुर्दशी ह्या दिवशी भगवान श्रीकृष्ण, यमराज व माता लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. पहाटे सकाळी लवकर उठून स्नान करण्याची परंपरा आहे ज्याला अभ्यंग स्नान असे म्हणतात. असे केल्याने मन व शरीर शुद्ध होते व सकारात्मक ऊर्जा येते.
पौराणिक मान्यता अनुसार ह्या दिवशी भगवान श्री कृष्ण च्या बरोबर यमराज ह्यांची आराधना केली जाते, त्यामुळे व्यक्तीला अकाल मृत्यूचे भय रहात नाही व जीवनात शांती व समृद्धी येते.
नरक चतुर्दशी फक्त धार्मिक अनुष्ठान नाही तर आध्यात्मिक शुद्धी व आंतरिक प्रकाशचे प्रतीक आहे. ही पर्व आपल्याला असा संदेश देतात की भगवान श्रीकृष्णनी अधर्म वर विजय प्राप्त केला तसेच आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये अंधकार घालवून सद्गुण व प्रकाशानी आपले जीवन आलौकिक करायचे आहे.