Dhanteras la Kay Daan Karawe W Dhanprapti Upay Konte Karawe In Marathi
धनत्रयोदशीला काय दान करावे व धनप्राप्तीचे कोणते उपाय करावे?
धनत्रयोदशीला कोणत्या वस्तु दान करणे शुभ, धनप्राप्तीसाठी मीठ,कौड्या व लवंग ह्याचे सटीक उपाय
धनत्रयोदशी हा सण धन, स्वास्थ व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ज्यामध्ये माता लक्ष्मी, भगवान कुबेर व धन्वंतरी भगवान ह्यांची पूजा केली जाते. ह्या दिवशी खरेदी करणे व दान केल्याने जीवनात आनंद व सौभाग्य वाढते.
धनत्रयोदशी हा सण कार्तिक महिन्यात कृष्ण पक्ष त्रयोदशी ह्या दिवशी साजरा करायचा आहे. जे धन व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ह्या दिवशी भगवान धन्वंतरीचे प्रकट होणे व त्यांच्या द्वारे अमृत कलश येणे ही स्वास्थ व धना संबंधित खूप शुभ मानले जाते. म्हणूनच ह्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान कुबेर व धन्वंतरी भगवान ह्यांची पूजा केली जाते. त्यामुळे जीवनात सुख-समृद्धी व स्वास्थ येते. त्याच बरोबर ह्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे संपत्ति मध्ये वृद्धी होते.
धनत्रयोदशीला फक्त खरेदी करणे शुभ नसून ह्यादिवशी दान धर्म करणे खूप पुण्यकारी असते. ह्या दिवशी दान केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा व शुभता येते. खास करून ह्या दिवशी काही विशिष्ट वस्तु दान करणे खूप शुभ मानले जाते. जे स्वास्थ्य, धन व समृद्धि वाढवण्यास मदत करते. जसे की तांब्याची भांडी, पणत्या, नवीन चमचे, दागिने, वस्त्र, व औषधे दान करणे शुभ असते त्यामुळे आपले भाग्य वाढते.
धान्य दान करावे:
धनत्रयोदशीला गहू, तांदूळ, डाळ किंवा अजून काही धान्य दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व घरात धन-धान्य ची कमतरता होत नाही सुख-शांती राहते.
कपडे दान करा:
धनत्रयोदशीला गरीब किंवा जरूरतमंद लोकांना कपडे दान करणे शुभ मानले जाते. नवीन किंवा साफ कपडे दिल्याने त्यांना सहारा मिळतो. व आपल्या धनामध्ये वृद्धी होऊन सुख-शांती मिळते.
मिठाई दान करा:
धनत्रयोदशीला माता लक्ष्मीला मिठाईचा भोग दाखवणे खूप शुभ मानले जाते. त्याच बरोबर जरूरतमंद लोकांना मिठाई दान केल्याने घरात सुख-समृद्धी व खुशाली राहते. धना संबंधित समस्या दूर होऊन प्रेम वाढते.
तेल किंवा तुपाचे दान करावे:
धनत्रयोदशीला तेल किंवा तुपाचे दान करणे खूप मानले जाते. तेल व तूप प्रकाश देण्याचे काम करते. तेल व तूप दान केल्याने अंधकार दूर होतो. तेल व तूप दान केल्याने स्वास्थ संबंधित समस्या व आर्थिक परेशानी दूर होऊन माता लक्ष्मी व धन्वंतरी भगवान प्रसन्न होतात.
झाड़ूचे दान करावे:
धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे व दान करणे खूप शुभ मानले जाते. झाडू घरातील नकारात्मक ऊर्जा साफ करणे व सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे प्रतीक आहे. मंदिर किंवा जरूरत मंद लोकांना झाडू दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.

धनत्रयोदशीला काही मिठाचे उपाय करावे:
जर आपण वास्तु दोषा पासून मुक्ती साठी प्रयत्न करीत असाल तर धनत्रयोदशीला पाण्यात मीठ घालून घरात पोछा मारा, त्यामुळे वास्तु दोष दूर होऊन घरात सुख-समृद्धीचे आगमन होते.
जर आपण सुख व सौभाग्यमध्ये वृद्धी वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर धनत्रयोदशीला मीठ जरूर खरेदी करा. हा उपाय केल्याने धनाची
देवी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन कृपा करते.
धनत्रयोदशीला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर मिठाच्या पाण्याचा सडा जरूर घाला. हा उपाय केल्याने दुख दारिद्र दूर होईल.
ज्योतिषशास्त्रा नुसार धनत्रयोदशीला खर म्हणजे मीठ दिले व घेतले जात नाही म्हणूनच ह्या दिवशी कोणाला मीठ देऊ नका किंवा कोणा कडून मीठ घेऊ नका.
धन दौलतमध्ये वृद्धी होण्यासाठी कौडीचा प्रभावी उपाय:
धनत्रयोदशीला धनामध्ये वृद्धी होण्यासाठी संध्याकाळी एक छोटासा उपाय जरूर करा. आपण 13 दिवे लावायचे आहेत व घरातील प्रतेक कोपऱ्यात एक एक दिवा ठेवावा मग मध्य रात्री त्याच कोनामध्ये एक एक कौडी ठेवा. असे केल्याने पैशांची तंगी दूर होऊन आर्थिक स्थिति मजबूत बनते.
धनत्रयोदशीला करा लवंगचा उपाय:
धनत्रयोदशीला व लक्ष्मी पूजनच्या दिवशी माता लक्ष्मीला एक लवंगची जोडी अर्पित करा. असे केल्याने आर्थिक तंगी दूर होईल व घरात समृद्धी येईल.
घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी:
पूजा करण्याच्या अगोदर व नंतर दक्षिणवर्ती शंखमध्ये पाणी भरून घरात सर्वत्र शिंपडा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन माता लक्ष्मीचे आगमन होते.
आडकलेले धन परत मिळण्यासाठी:
जर आपले पैसे कुठे अडकले आहेत तर अमावस्या किंवा पूर्णिमा ह्या दिवशी 11 किंवा 21 लवंग कपूर बरोबर जाळून माता लक्ष्मीची आराधना करा.
समृद्धीसाठी उपाय: धनत्रयोदशी ते दिवाळी संपे पर्यन्त रोज पूजा करताना माता लक्ष्मील एक लवंगची जोडी अर्पित करा. असे केल्याने धना संबंधी समस्या दूर होतील.