धनत्रयोदशीला कोणत्या दिशेला यम दीपक लावल्याने अकाली मृत्यू टळू शकतो, नियम काय आहेत?
Dhanteras 2025 Yamadeepdaan Muhurat Full Information In Marathi
धनत्रयोदशीला यमराज ह्यांच्या नावांनी दीपक लावणे एक धार्मिक परंपरा नसून, जीवनात प्रकाश, सुरक्षा, व समृद्धीचे प्रतीक आहे. चला तर मग पाहू या यमदीपक कसा लावायचा.
धनत्रयोदशी ह्या वर्षी 18 ऑक्टोबर 2025 शनिवार ह्या दिवशी आहे. धनत्रयोदशी हा दिवस धन, स्वास्थ्य व दीर्घायु चे प्रतीक मानले जाते. ह्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी, धनाचे देव भगवान कुबेर व स्वास्थ्यचे देवता भगवान धन्वंतरि ह्यांची पूजा केली जाते. पण त्याबरोबर अजून एक विशेष पूजा केली जाते. ते म्हणजे यमराज ह्यांच्या नावांनी दीपक लावला जातो.
धार्मिक मान्यता अनुसार धनत्रयोदशी ह्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर घराच्या बाहेर यमदेव च्या नावांनी दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने यमदेव प्रसन्न होतात व परिवारातील सदस्यांचा अकाली मृत्यू होण्या पासून मुक्ती मिळते. पण त्यासाठी आपण जाणून घेतले पाहिजे की कोणत्या दिशेला दीपक लावला पाहिजे म्हणजेच योग्य दिशा कोणती आहे.
यम दीपक कोणत्या दिशेला लावावा?
ज्योतिष व धर्मशास्त्रा नुसार यमराज दक्षिण दिशेचे स्वामी मानले जातात. म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री दक्षिण दिशेला दीपक लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्याला यम देवतांची कृपा प्राप्त होते. व अकाली मृत्यूचा खतरा टळतो.
धनत्रयोदशीच्या दिवशी यम दीपक कसा लावावा?
धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला बाहेर यम दीपक लावावा. हा दिवा लावताना तिळाचे तेल किंवा सरसुचे तेल घालावे, त्यामुळे वातावरणात शुद्धी येते व नकारात्मक ऊर्जा दूर होते.
धनत्रयोदशीच्या दिवशी यम दीपक का लावावा?
असे म्हणतात की धनत्रयोदशीच्या रात्री यम दीपक लावल्याने व्यक्तीच्या जीवनात मृत्यूचे भय समाप्त होते. यम दीपक लावल्याने दीर्घायु, सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरात शांती व सकारात्मकता येते.

यम दीपक कश्या पद्धतीने लावावा:
एका बाउलमध्ये 1 कप कणिक घेऊन त्यामध्ये थोडी हळद घालून मिक्स करा पण त्यामध्ये मीठ आजिबात घालायचे नाही. मग कणिक मळून एक भाग मोठा व 2 भाग छोटे करून घ्या. मोठ्या भागाचा चार मुखी दिवा बनवावा, व 2 लहान भागांच्या दोन मुठी बनवाव्या. मग त्यामध्ये दोन वातीनची एक वात करून मोहरीचे तेल किंवा आपल्या घरातील तेल घालून दिवा तयार करावा. मग प्रदोष काळात लावावा.
दिवा डायरेक्ट जमिनीवर न ठेवता थोडे तांदूळ ठेवावे मग त्यावर दिवा ठेवून लावावा मग दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुल अर्पित करावी व घरातील सर्व व्यक्तिनी हात जोडून दीर्घायुषसाठी प्रार्थना करावी असे केल्याने घरात अपमृत्यू होत नाही असे म्हणतात.