घरात सुख-समृद्धीसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा अगदी सोप्या पद्धत, रोगमुक्ती प्रभावी मंत्र
Dhanteras 2025 Full Information And Powerful Mantra in Marathi
धनतेरस हा दिवस दिवाळीचा प्रथम दिवस आहे. ह्या दिवसा पासून दिवाळी आरंभ होते. घरात सुख-शांती- समृद्धी व स्वास्थ मिळण्याचा हा दिवस मानला जातो. ह्या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी व कुबेर भगवान ह्यांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्यासाठी मंत्रजाप अगदी बरोबर केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. तसेच ह्या दिवशी नवीन वस्तु खरेदी केल्याने धनामध्ये वृद्धी होते. व विधी पूर्वक पूजा अर्चा केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळून दारिद्र नष्ट होते.
18 ऑक्टोबर 2025 शनिवार ह्या दिवशी धनत्रयोदशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी व धनाचे देव कुबेर ह्यांची पूजा करणे महत्व पूर्ण मानले जाते. योग्य मुहूर्त व आवश्यक पूजा साहित्य वापरुन धार्मिक विधी नुसार पूजा करावी. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन जीवनात सुख समृद्धी मिळते.
तिथि व पूजा शुभ मुहूर्त:
तिथि: 18 ऑक्टोबर 2025 (शनिवार)
प्रदोष काल: सायं 5:48 पासून रात्री 8:20 पर्यन्त
वृषभ काल: सायं 7:16 पासून रात्रि 9:11 पर्यन्त
धनतेरस पूजा शुभ मुहूर्त: सायं 7:16 पासून रात्रि 8:20 पर्यन्त
पूजा करण्यासाठी उत्तम वेळ: वृषभ काळ मध्ये पूजा करणे श्रेष्ट मानले जाते.
पूज्य देवी-देवता: भगवान धन्वंतरि, माता लक्ष्मी व कुबेर देव
लाभ: ह्या वेळी पूजा कल्याने धन, स्वास्थ्य व सौभाग्य प्राप्ति होते.
धनतेरस पूजा विधि:
सर्वात पहिले घर व पूजा मंदिर साफ करावे मग घराच्या मुख्य दारावर रांगोळी काढून दिवा लावावा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
घराच्या उत्तर-पूर्व कोनामध्ये एक चौरंग ठेवून त्यावर लाल रंगाचे कापड घाला.
एक तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये जल व गंगाजल घेऊन त्यामध्ये आंब्याची पाने ठेवून नारळ ठेवा ही शुभता व समृद्धीचे प्रतीक आहे.
भगवान धन्वंतरि, माता लक्ष्मी, भगवान कुबेर व गणेश जीची मूर्ती चौरंगावर स्थापित करा.
मग हळद-कुंकू, चंदन, अक्षता, फूल, धूप, दीप मिठाई व दक्षिणा ठेवून मंत्रजाप करा.
पूजा करताना गाईच्या तुपाचा दिवा लावायला विसरू नका. त्याच बरोबर छोटे 13 दिवे लावून वेगवेगळ्या जागी ठेवा. हे दीर्घायु व समृद्धिचे प्रतीक आहे.
साळीच्या लाहया, बत्तासे, व मिठाई भोग महणून ठेवा. मग सर्व देवांची आरती म्हणा. मग परिवारात प्रसाद वाटप करा.

धनतेरस पूजा सामग्री लिस्ट:
भगवान धन्वंतरि, लक्ष्मी माता व कुबेर जी की मूर्ति किंवा फोटो
गंगाजल व स्वच्छ पाणी
हल्दी, कुमकुम, चंदन, व अत्तर
ताजे फूल व फुलांचा हार
कलावा (मौली) व जानवे
पूजा साठी चौरंग व त्यावर घालण्यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड
कलश, आंब्याची पाने व नारळ
भोग साठी साळीच्या लाहया, बताशे, मिठाई
अक्षत (चावल) व धने
13 पणत्या, गाईच्या तुपाचा दिवा कपूर व अगरबत्ती
दक्षिणा व थोडेसे मीठ
चांदी किंवा सोन्याचे नाणे किंवा धातूचे भांडे
नवीन झाड़ू
धनतेरसला करा ही खरेदी:
सोने किंवा चांदीचे नाणे, माता लक्ष्मी व कुबेर भगवान ह्याच फोटो
पितळ, तांबे किंवा स्टीलची भांडी ही समृद्धीचे प्रतीक आहे.
नवीन झाडू ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे दारिद्रता दूर होते.
मोबाइल, लॅपटॉप किंवा घरातील काही उपकरण खरेदी करणे शुभ मानले जाते.
मोबाइल, लैपटॉप या घरेलू उपकरण आदि खरीदना शुभ होता है।
धनतेरसला खरेदी करू नये:
काचेचे नाजुक सामान घेऊ नये कारणकी ते तुटण्याचा संभव आहे. त्यामुळे ते अशुभ आहे.
एल्यूमिनियम किंवा लोखंडी भांडी घेऊ नये करणकी ते अशुद्ध धातू मानले जाते.
काले कपडे, चप्पल, बूट हे नकारात्मक मानले जातात.
सूरी, चाकू सारखी टोकदार वस्तु घेऊ नये. त्यामुळे क्लेश व कडवाहटचे प्रतीक मानले जाते.
मंत्र:
ॐ धन्वंतराये नमः।
ह्या मंत्राचा नियमित जाप केल्यास व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहून मानसिक संतुलन व ऊर्जा प्राप्त होते.