महाअष्टमीला करा ही खास उपाय, विवाह, नोकरी व व्यवसायात येणाऱ्या अडचणी होतील दूर
Maha Ashtmi Navratri 2025 Upay In Marathi
जर आपले लग्न होत नाही किंवा त्यामध्ये बाधा येत आहेत किंवा ठरलेले लग्न तुटत आहे. तसेच नोकरी मिळत नाही, अडचणी येत आहेत, व्यवसायात तोटा होत आहे तर करा हे खास उपाय त्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर होतील व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
शारदीय नवरात्री ही खूप पवित्र मानली जाते. नवरात्रीमध्ये प्रतेक दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा अर्चा, मंत्र जाप केल्याने विशेष कृपा प्राप्त होते. अष्टमीच्या दिवशी देवी माताचे आठवे रूप माता महागौरीची पूजा केली जाते. महागौरीच्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन थांबलेली कामे पूर्ण होतात. जे साधक निष्टा व भक्तिने माताची पूजा अर्चा करतात त्यांच्या सर्व मनोकामना हळू हळू पूर्ण होतात.
विवाहमधील अडचणी दूर करण्यासाठी उपाय:
बऱ्याच लोकांच्या जीवनात विवाह विषयी अडचणी येतात. काही वेळेस जमलेले लग्न मोडते, किंवा जास्त वय होते तरी लग्न जमत नाही किंवा अजून काही कारणांनी लग्न होत नाही, अश्या वेळी अष्टमीच्या दिवशी विशेष उपाय केला तर त्याने लाभ होतो.
अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा.
माता दुर्गाला लाल रंगाचे फूल व सिंदूर अर्पित करा.

मग 108 वेळा पुढे दिलेला मंत्र जाप करा:
“ॐ कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरि। नंदगोपसुतं देवि पतिं मे कुरु ते नमः।।”
त्याच बरोबर अष्टमी ह्या दिवशी कन्या भोजन घाला, त्यांना लाल रंगाची चुनरी व बांगड्या भेट म्हणून देणे खूप शुभ फलदायी आहे.
असे म्हणतात की हा उपाय केल्याने विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात व विवाह लवकर जमतो.
नोकरी, व्यापार संबंधित समस्या उपाय:
आपण जर खूप दिवसा पासून नोकरीच्या शोधत असाल व आपल्याला चांगली नोकरी मिळत नाही. तर अष्टमीच्या दिवशी काही खास उपाय केल्यास नोकरी विषयी समस्या दूर होतील.
महाअष्टमीच्या दिवशी माता महागौरीला पांढरी फुले व नारळ अर्पित करा. मग पुढे दिलेला मंत्र 108 वेळा म्हणा.
मंत्र: “ॐ देवी महागौर्यै नमः।।”
अष्टमी ह्या दिवशी माता राणीला दुधा पासून बनवलेले पदार्थ भोग म्हणून दाखवा त्याच बरोबर जरूरतमंद लोकांना पांढरे वस्त्र व मिठाई दान करणे शुभ आहे. असे केल्याने नोकरी करियर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील व नवीन नोकरी मिळू शकेल.