नवरात्रीमध्ये माता दुर्गाला खुश करण्यासाठी सटीक उपाय, मिळेल माताची विशेष कृपा
Shardiya Navratri 2025 Satik Upay In Marathi
शक्तिच्या साधनेचा महापर्व शारदीय नवरात्री ह्या वर्षी 22 सप्टेंबर 2025 पासून प्रारंभ झाली असून 9 दिवस आहे. रोज माताच्या विविध रूपांची पूजा अर्चा केल्यास माता प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल. शास्त्रामध्ये दुर्गा माताला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय दिले आहेत.
धार्मिक मान्यता अनुसार ही उपाय पूर्ण श्रद्धा व विश्वास ठेवून केल्यास माता राणीची कृपा मिळेल व सर्व मनोकामना पूर्ण होतील. ही 9 दिवस आध्यात्मिक ऊर्जानि भरलेले असतात. व ही छोटे छोटे उपाय केलेतर त्याचे मोठे फळ मिळते. चला तर मग पाहूया ही कोणते शक्तिशाली उपाय आहेत.
अखंड ज्योत लावा:
नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावणे विशेष महत्वाचे आहे. 9 दिवस निरंतर ज्योत लावलेने घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जाचा संचार होईल. हे देवीच्या अतूट आस्था व संकल्पचे प्रतीक आहे. घरात अखंड ज्योत लावल्याने घरात सुख शांती व समृद्धीचा वास येतो व माता दुर्गाची कृपा आपल्या परिवारावर नेहमी राहते. पण गोष्ट लक्षात ठेवा ज्योत लावल्यावर 9 दिवस तेवत राहिली पाहिजे कधी सुद्धा विजता कामा नये.
नवार्ण मंत्र का जाप:
नवरात्रीमध्ये मंत्र जाप करणे सर्वश्रेष्ट मानले जाते. शक्तिशाली मंत्र “ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे” नक्की म्हणा. हा निर्वाण मंत्र आहे. ज्यामध्ये महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचा शक्तिशाली बीज मंत्र आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस हा मंत्र जाप रुद्राक्ष जाप माळा घेऊन 108 वेळा म्हणा. मंत्र जाप केल्याने साधकाचे बळ, बुद्धी, धन व ऐश्वर्यची प्राप्ती होईल. त्याच बरोबर सर्व संकटा पासून सुरक्षा मिळेल.
लाल आसनचा प्रयोग:
नवरात्रीमध्ये पूजा करताना लाल रंगाचे आसन वापरणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. लाल रंग माता दुर्गाला अत्यंत प्रिय आहे. लाल रंग शौर्य, शक्ति, व सौभाग्यचे प्रतीक आहे. नवरात्रीमध्ये पूजा, मंत्र जाप करताना लाल रंगाचे आसन वापरा त्यामुळे त्यावेळी उत्पन्न होणारी ऊर्जा शरीरात समावली जाते. त्यामुळे साधकाला पूर्ण फळ प्राप्त होते.
श्रृंगारचे सामान अर्पित करा:
नवरात्रीमध्ये माताला 16 श्रृंगार चे सामान अर्पित करणे शुभ मानले जाते. त्यामध्ये लाल रंगाची चुनरी, सिंदूर, बिंदी, बांगड्या व अजून काही सामान असते. माता दुर्गाला सदा सुहागण मानले जाते. तिला श्रृंगारचे साहित्य अर्पित केल्याने ती खुश होते. असे केल्याने साधक म्हणजे महिलांना अखंड सौभाग्य व सुख समृद्धीचा आशीर्वाद प्रदान होतो. हा उपाय केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

पानाचा विडा अर्पित करा:
असे म्हणतात की नवरात्रीमध्ये पानाचा विडा देवी मातेला अर्पित केल्याने माताची विशेष कृपा प्राप्त होते. हा उपाय केल्यास कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात व सर्व मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.
दान-धर्म करा:
नवरात्रीमध्ये लाल रंगाच्या वस्तु दान करणे हितावह आहे. म्हणजेच पितळ्याची घंटी, अन्न, वस्त्र दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सुख-समृद्धी व भाग्य येते.
दुर्गा चालीसाचे पाठन करा:
नवरात्रीमध्ये दुर्गा चालीसाचे नियमित पठन केल्याने मानसिक शांती मिळते. हा उपाय रोग व कर्ज पासून मुक्ती देतो.
प्रभावी मंत्र जाप:
माता दुर्गाचे प्रभावी मंत्र “ॐ ह्रीं दुं दुर्गायै नमः” किंवा “सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते”
सकारात्मक सोच व भक्ति:
माता दुर्गाची कृपा मिळण्यासाठी भक्ति व सकारात्मक विचार ठेवून करा.