शारदीय नवरात्री कन्या पूजन सोपी पद्धत, किती वर्षाच्या मुलींनचे पूजन करणे भाग्य दायक
Shardiya Navaratri Kanya Pujan Sopi Padhat, Kiti Warshachya Mulinche Pujan Karawe?
कन्या भोजन विधी, किती कन्या बोलवाव्या, वय वर्षे किती, कन्या
पूजन महत्व :
आता शारदीय नवरात्री सुरू झाली आहे तेव्हा पहिल्या माळेपासून दुर्गा देवीच्या प्रतेक रूपाची नऊ दिवस पूजा अर्चा केली जाते. त्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी व सिद्धिदात्री असे क्रमाने देवीची रूप आहेत.
नवरात्री मध्ये अष्टमी तिथी व नवमी तिथी खूप महत्वाची आहे. ह्या तिथीला कन्या पूजन करतात. ही तिथी सुख, समृद्धी, यश व कीर्ती देणारी आहे. ह्या तिथीला कोणते सुद्धा चांगले कार्य केल्यास त्यामध्ये यश मिळते.
ह्या दिवशी नऊ देवीची रूप असणारे प्रतीक म्हणजे नऊ कन्या ह्याची पूजा करतात. ह्या दिवशी नऊ कन्या घरी आमंत्रित करून त्यांची पूजा करतात. त्याच बरोबर एका बालक सुद्धा आमंत्रण देतात. त्याला बटुक भैरव किंवा लांगूर चे रूप मानतात. कन्या पूजनच्या बरोबरच माता दुर्गाला सुद्धा विदा करतात. मग नवरात्रीची समाप्ती होते.
अष्टमी तिथी शुभ मुहूर्त:
पहिला शुभ मुहूर्त:
पंचांग नुसार सकाळी 5 वाजल्या पासून सकाळी 6 वाजून 12 मिनिट पर्यन्त
दूसरा शुभ मुहूर्त:
सकाळी 10 वाजून 40 मिनिट पासून ते 12 वाजून 10 मिनिट पर्यन्त
नवमी तिथी कन्या पूजन शुभ मुहूर्त:
पहिला नवमी तिथी कन्या पूजन सकाळी 4 वाजून 53 मिनिट पासून 5 वाजून 41 मिनिट पर्यन्त
दूसरा शुभ मुहूर्त सकाळी 8 वाजून 6 मिनिट पासून 9 वाजून 50 मिनिट पर्यन्त कन्या पूजन व भोग देवू शकता
कन्या पूजन विधि-
कन्या पूजन करण्याच्या आधल्या दिवशीच कन्याना आमंत्रण दिले पाहिजे.
शास्त्रों नुसार दो वर्ष पासून 10 वर्ष पर्यन्तच्या कन्याना पूजनासाठी आमंत्रण करायचे.
सर्वप्रथम शुद्ध पाणी घेऊन सर्व कन्या व एक बालक हीचे पाय धुवावे.
मग सर्वाना आसन वर बसण्यास आमंत्रण करावे.
आसनवर बसल्यावर दिवा लाऊन त्यांना कुकु लावावे.
मग खीर-पुरी हलवा व अजून काय पदार्थ बनवले असतील ते माता देवीला नेवेद्य दाखऊन मग सर्व कन्याना व बालक हयाना जेवण वाढावे व प्रमाने त्यांना जेवण सेवन करण्यास आग्रह करावा.
मग सर्वांचे पाय धरून आशीर्वाद घ्यावा.
मग त्यांना प्रसाद, फळ व भेट वस्तु देवून विदा करावे
कन्या पुजनाची काही विशिष्ट महत्व:
कन्या पूजनच्या दिवशी 9 पेक्षा जास्त मुलींना आमंत्रित करणे जास्त शुभ असते.
2 वर्षाच्या कन्याचे पूजन करणे जास्त शुभ मानले जाते. असे म्हणतात की त्यामुळे घरातील दरिद्र दूर होऊन सर्व बाधा पासून मुक्ती मिळते.

3 वर्षाच्या कन्या म्हणजे त्रिमूर्तिचे रूप मानले जाते. असे म्हणतात की 3 वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यास घरात सुख समृद्धी येते.
असे म्हणतात की सुख समृद्धीसाठी 4 वर्षाच्या कन्याचे पूजन करणे खूप शुभ मानले जाते.
5 वर्षाच्या मुलीना रोहिणी असे म्हणतात त्याची पूजा केल्यास सर्व रोगा पासून मुक्ती मिळते.
6 वर्षाच्या मुलीना कालिकाचे रूप मानले जाते असे म्हणतात की त्यांची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये सफलता मिळते.
7 वर्षाच्या मुलीना चंडिका असे म्हणतात त्यांचे पूजन केल्यास घरात ध्यान दौलतची कधी सुद्धा कमतरता होत नाही.
8 वर्षाच्या मुलींना शांभवी असे म्हणतात असे म्हणतात की 8 वर्षाच्या मुलींची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये सफलता मिळते.
9 वर्षाच्या कन्याना माता दुर्गाचे रूप मानले जाते. त्यांचे पूजन केल्यास शत्रूवर विजय प्राप्त होतो.
10 वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.