नवरात्री अष्टमी व नवमी तिथीला कन्या पूजन शुभ मुहूर्त व महत्व काय?
Navratri 2025 Ashtmi w Navami Tithi Pujan Kaa Krave In Marathi
हिंदू धर्मामध्ये नवरात्रीमध्ये अष्टमी व नवमी ह्या दोन्ही तिथीला खास महत्व आहे. महाअष्टमी ह्या तिथीला दुर्गाअष्टमी सुद्धा म्हणतात. ह्या तिथीची दुर्गा पूजा फार महत्वाची मानली जाते.
आश्विन महिन्यातील प्रतिपदा तिथी पासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. हिंदू धर्मामध्ये नवरात्री ही खूप महत्वाची मानली जाते. ती संपूर्ण भारतात खूप उत्साहात साजरी केली जाते. ह्या वर्षी 22 सप्टेंबर पासून नवरात्री सुरू झाली असून 2 ऑक्टोबर ह्या दिवशी दसरा हा सण आहे. नवरात्री मध्ये 9 दिवस रोज विविध रूपाची पूजा करतात. रोज नऊ दिवस उपवास करून पूजा अर्चा व मंत्र जाप करतात.
नवरात्रीची अष्टमी व नवमी तिथी खूप महत्वाची आहे ह्या दिवशी कन्यापूजन व हवन करतात.
नवरात्रीमध्ये अष्टमी व नवमी तिथीला कन्या पूजन व भोग देवून व्रताचे पारण केले जाते. नवरात्रीमध्ये कन्या पूजन केल्याने माता दुर्गा प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. ह्या तिथीला माता दुर्गाची विशेष पूजा अर्चा केली जाते. काही जण अष्टमी ह्या तिथीला किंवा काही जण नवमी ह्या तिथीला कन्या पूजन करतात.
नवरात्री अष्टमी तिथी व नवमी तिथी कधी आहे?
वैदिक पंचांग नुसार ह्या वर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष अष्टमी तिथी 29 सप्टेंबर संध्याकाळी 4 वाजून 31 मिनिटला आहे. व समाप्ती 30 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजून 6 मिनिट पर्यन्त आहे. अष्टमी तिथी समाप्त झाल्यावर नवमी तिथीची सुरुवात होते व नवमी तिथी समाप्ती 1 ऑक्टोबर रात्री 7 वाजून 1 मिनिट पर्यन्त आहे.
अष्टमी तिथी कन्यापूजन शुभ मुहूर्त:
नवरात्री मध्ये माता दुर्गाच्या 9 रूपांची पूजा झाल्यावर अष्टमी व नवमी तिथीला कन्या पूजन व भोजन देऊन व्रताचे पारण केले जाते.
अष्टमी तिथी शुभ मुहूर्त:
पहिला शुभ मुहूर्त:
पंचांग नुसार सकाळी 5 वाजल्या पासून सकाळी 6 वाजून 12 मिनिट पर्यन्त
दूसरा शुभ मुहूर्त:
सकाळी 10 वाजून 40 मिनिट पासून ते 12 वाजून 10 मिनिट पर्यन्त
नवमी तिथी कन्या पूजन शुभ मुहूर्त:
पहिला नवमी तिथी कन्या पूजन सकाळी 4 वाजून 53 मिनिट पासून 5 वाजून 41 मिनिट पर्यन्त
दूसरा शुभ मुहूर्त सकाळी 8 वाजून 6 मिनिट पासून 9 वाजून 50 मिनिट पर्यन्त कन्या पूजन व भोग देवू शकता

नवरात्री मध्ये अष्टमी व नवमी तिथी महत्व का आहे?
शारदीय नवरात्री 22 सप्टेंबर पासून सुरू होत असून 2 ऑक्टोबर पर्यन्त आहे. नवरात्रीमध्ये अष्टमी व नवमी तिथीचे महत्व आहे. महाअष्टमी लाच दुर्गाष्टमी असे सुद्धा म्हणतात. ह्या तिथीला विशेष महत्वाची पूजा असते. ही पूजा अष्टमी व नवमी ह्या दोन्ही तिथीला चालते.
महाअष्टमी दुर्गापूजा व उपासना साठी सर्वात शुभ तिथी मानली जाते. ह्या तिथीला दुर्गा माताचे सर्वात शक्तिशाली रूपाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यता अनुसार महा अष्टमीला माता दुर्गाच्या महागौरी स्वरूप व नवमी तिथीला माता सिद्धीदात्री ह्या रूपाची पूजा केली जाते.
धार्मिक मान्यता अनुसार महाअष्टमीला दुर्गा माताने महिषासुर दैत्यचा वध केला होता. त्यामुळे तिने महिषासुर मर्दिनीचे रूप धरण केले होते. म्हणूनच ह्या दिवशी कन्या पूजन, हवन व मंत्र उचर केला जातो. व उपासना, व्रत पारायण केले जाते. मग दशमी तिथीला दुर्गा माताच्या प्रतिमाचे विसर्जन केले जाते.