Shardiya Navratri 2025 Nine Shubh Colours And Their Meaning In Marathi
शारदीय नवरात्री 2025, 9 दिवसांचे 9 शुभ रंग, त्याचे महत्व व कृपा मिळेल
शारदीय नवरात्री हा सण भक्ति भावाचे व श्रद्धेचे प्रतीक आहे. ह्यामध्ये 9 दिवसांचे व 9 रंगाचे विशेष महत्व आहे. त्या रंगाचे महत्व आहे व त्यामधून आपल्याला चांगला संदेश सुद्धा मिळेल. नवरात्री मधील शुभ रंग ही आपल्याला केवळ कृपा मिळवून देत नाहीत तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा सुद्धा मिळवून देतात.
दरवर्षी नवरात्री मध्ये भक्तगण देवी दुर्गाच्या 9 रूपांची पूजा करतात. धार्मिक मान्यता अनुसार 9 दिवसांचे 9 रंगाचे महत्व आहे व त्याचे विशेष गुण सुद्धा आहेत. व दुर्गा माता आपल्याला आशीर्वाद सुद्धा देतात. ह्या शुभ रंगाचे वस्त्र धारण केल्याने भक्ताना सकारात्मक ऊर्जा व देवीची कृपा मिळते.
आपण आता 9 दिवसांचे 9 शुभ रंग कोणते आहेत व त्याचे महत्व पाहू या:
पहिला दिवस पांढरा रंग (white)
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग पांढरा आहे, जो शांती, पवित्रता व सादगीचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांत व निर्मल राहण्याचा संदेश देतो. पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्याने धार्मिक कार्यमध्ये एकाग्रता वाढते.
दूसरा दिवस लाल रंग (Red)
दूसरा दिवस लाल रंग आहे. जो शक्ति, ऊर्जा व जोश दाखवतो. हा रंग दुर्गा माताची शक्ति व उत्साहचे प्रतीक आहे. लाल रंग हा माता राणीचा खूप आवडतीचा रंग आहे.
तिसरा दिवस रॉयल ब्लु रंग (Royal Blue)
तिसऱ्या दिवसाचा रंग रॉयल ब्लु आहे. जो शांती, गंभीरता व समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग जीवनात स्थिरता व गहराई आणण्याचा संदेश देतो.
चौथा दिवस पिवळा रंग (Yellow)
चौथ्या दिवसाचा रंग पिवळा आहे. जो आनंद, उमंग व आशाचे प्रतीक आहे. हा रंग सकारात्मकता व जीवनात नवीन उमीद आणणारा आहे. पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने माताची कृपा मिळते.
पाचवा दिवस हिरवा रंग (Green)
पाचव्या दिवसाचा रंग हिरवा आहे. जो प्रकृती, समृद्धी व संतुलन दाखवतो. हा रंग जीवनात उत्साह व सकारात्मक बदल आणण्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग प्रतेक क्षेत्रात सफलता मिळवून देतो.

सहावा दिवस ग्रे रंग (Grey)
सहाव्या दिवसाचा रंग ग्रे आहे. जो नेहमी सादगी व संतुलनचे प्रतीक आहे. हा रंग आपल्या जीवनातिल नेहमी येणाऱ्या परिस्थितिचा स्विकार केला पाहिजे. ग्रे रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास इंद्रियावर नियंत्रण ठेवण्याची शक्ति देतो.
सातवा दिवस नारंगी रंग (Orange)
सातव्या दिवसाचा रंग नारंगी आहे. जो उत्साह जोश व सकारात्मक ऊर्जाचे प्रतीक आहे. हा रंग जीवनात जोश व उमंग आणतो.
आठवा दिवस मोरपंखी रंग (Peacock Green)
आठव्या दिवसाचा रंग मोरपंखी आहे. हा रंग निळा व हिरव्या रंगाचे एकत्रित मिश्रण आहे. हा रंग खूप सुंदर आहे. जो जीवनात उत्साह, खुशाली व सकारात्मकता आणतो.
नव्वा दिवस गुलाबी रंग (Pink)
नवरात्रीच्या शेवटच्या दिवसाचा शुभ रंग गुलाबी आहे. जो प्रेम, दया व करुणाचे प्रतीक आहे. हा रंग नात्यांमद्धे प्रेम व सदभाव राखण्याचा संदेश देतो.