नवरात्री 9 दिवस कोणत्या 9 देवी माताच्या रूपांची पूजा करणे शुभ आहे
Navratri 2025 9 Days 9 Forms Of Durga Mata Information In Marathi
शारदीय नवरात्री हा पवित्र सण हिंदू धर्मामध्ये खास महत्वपूर्ण मानला जातो. ह्या वर्षी नवरात्री हा सण 22 सप्टेंबर 2025 सोमवार ह्या दिवसा पासून सुरू होत असून 2 ऑक्टोबर ह्या दिवशी दसरा हा सण आहे. धार्मिक मान्यता अनुसार 9 दिवस देवी माताच्या 9 रूपांची पूजा अर्चा मंत्र जाप केला जातो. त्यामुळे आपले सर्व दूध कष्ट दूर होतात.
आता आपण पाहून या देवी माताची 9 रूप कोणती आहेत.
पहिला दिवस नवरात्री घट स्थापना म्हणजेच कलश स्थापना
दूसरा दिवस शैलपुत्री: माता पार्वतीही पहिले रूप असून जी पर्वतराज हिमालयची पुत्रि आहे व भगवान शिव ह्यांची पत्नी आहे. हीचे वाहन वृषभ आहे. तिच्या उजव्या हातात त्रिशूल व डाव्या हातात कमळ आहे. हिच्या उपासनेने मनाजोगे लाभ होतात. यश देणारी ही देवता आहे.
तिसरा दिवस ब्रह्मचारणी: माता ब्रह्मचारणी ही ज्ञान व शिक्षाची देवी आहे. ब्रह्मपद दिणारी ही देवता आहे. ही प्रसन्न झालीतर मनुष्याला मुक्तीसाठी वरदान आहे. हीच संसार बंधनातून सोडवणारी मोक्षदाईनी आहे. हिच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य, त्याग, संयम या गुणांची प्राप्ती होऊन मोक्ष मिळतो.
चौथा दिवस चंद्रघंटा: माता चंद्रघंटा ही शास्त्रू पासून मुक्ती देणारी देवी माता आहे. हिच्या डोक्यावर किंवा हातात चंद्र घंटा आहे किंवा जिच्या घंटेमध्ये चंद्र आहे ती चंद्रघंटा. हिला दहा हात आहेत. हिच्या हातात कमळ, धनुष-बाण, त्रिशूल, गदा, खडग, ई आयुधे आहेत. ही लाल वस्त्र परिधान केलेली असून वाघावर बसलेली आहे. हिच्या उपासनेने सर्व पापे व बाधा नष्ट होतात. हिच्या कृपेने अलोकिक दर्शन, दिव्य सुंगध, व दिव्य ध्वनि यांची अनुभूति येते.
पाचवा दिवस कूष्मांडा: माता कूष्मांडा ही सृष्टिची देवी असून आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते. कुष्मा + अँड. कुष्मा म्हणजे ताप. वाईट ताप देणारा असा हा संसार जिच्या उदरात आहे ती. ही देवी त्रिविध तपांची बोळवण करणारी आहे. ह्या देवीला आठ हात आहेत हिच्या हातात जपमाळ, आणि कमडलू, धनुष व बाण, कमळ व अमृतकलश, चक्र व गदा आहेत ही देवी सिंह वाहिनी आहे. कुष्मांड म्हणजे कोहळा हा ह्या देवीला आवडतो. म्हणून नवाचंडि होमात कुष्मांड अर्पण करतात. हिच्या आशीर्वादाने रोग, शोक, कष्ट, नाहीसे होतात भक्ताला आयू, आरोग्य, यश देणारी ही देवी आहे.
सहावा दिवस स्कंदमाता: स्कंद म्हणजे कार्तिकेय. भगवान शंकर व माता पार्वती ह्याचे सुपुत्र. हिला चार हात असून दोन हातात कमळपुष्प घेतली आहेत तिसऱ्या हाताची वरद मुद्रा असून शुभ्रवर्ण आहे. व चौथ्या हातात स्कंदाला धरले आहे. हीचे वाहन सिह आहे. हिची उपासनेने चितवृती शांत होते सर्व लौकिक, सांसारिक, मायिक बंधनातून साधक मुक्त होतो.
सातवा दिवस कात्यायनी माता: कात्यायनी माता ही आयुर्वेद मध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी देवी असून वेगवेगळ्या रोगांचा नाश करणारी देवी आहे. ही देवी सिहवाहिनी असून त्रीनेत्रा आहे. विद्यार्णव तंत्रात ही चतुर्भुजा असून शंख-चक्र खड्ग त्रिशूल धरण करणारी आहे. तसेच मस्यपुराणात ही दशभुजा असल्याचे म्हटले आहे.

आठवा दिवस कालरात्री देवीमाता: मन व मस्तिष्कचे होणारे विकार दूर करणारी व रोगामध्ये औषधरूपी लाभ देणारी माता आहे. रौद्र स्वरूप असलेली, उग्र तपात रामलेली, संहारक अशी तामसी शक्ति म्हणजे कालरात्री होय. सर्व संहारक कालाला सुद्धा नाशाचे भय निर्माण करते, म्हणून तिला कालरात्री म्हंटले आहे. कालरात्री दूषटयांचा नाश, ग्रहबाधानाश करणारी असून. हिच्या उपासनेने उपासक भयमुक्त होतो. पण उपासकाने यमनियमपूर्व शरीर , मन, वाणी यांची शुद्धी ठेवणे आवश्यक आहे. ही दिसण्यास भयंकर असली तरी शुभ फलदायिनी असल्यामुळे हीचे नाव शुभंकरी असेही आहे. गरधब हीचे वाहन आहे. अमावस्या हे या देवीचे प्रतीक मानले असल्याने त्या रात्री साधना करणे श्रेयस्कर मानतात. कार्तिक आमवस्या विशेष मानली जाते. या देवीचे मंत्र पठन शस्त्रूचे उचाटन, नाश यासाठी केले जाते. ही देवी आद्यशक्तीचे सर्वनाशक स्वरूप आहे.
नववा दिवस महागौरी देवीमाता: महागौरी ही रक्त साफ करणारी व हृदयरोग बरा करणारी देवी आहे. हिमवानाची कन्या पार्वती हिने श्री शंकराची आराधना करून त्यांना पती म्हणून प्राप्त करून घेतले. पार्वतीचा वर्ण सावळा व शंकर तर कर्पूरगौर. नववधूला ते काळी म्हणून चिडवत. पार्वतीला राग आला ती विध्य पर्वतावर गेली तिने तप करून ब्रम्हदेवांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्या कडून गौर वर्ण मागून घेतला व ती गौरवर्ण झाली तेव्हा पासून तिचे नाव गौरी असे पडले पुढे तिचे नाव महागौरी असे पडले. ही चतुरभुज असून हिच्या उजव्या हातात त्रिशूल अ अभयमुद्रा तर डाव्या हातात डमरू व वरमुद्रा आहे. हीचे वाहन बैल आहे. ही शांत चेहऱ्याची असून हिच्या कृपेने असंभव कार्य संभव होते. ही देवी भक्ताचे पाप, ताप निवारण करणारी तसेच दुख, दैन्य दूर करते.
दहावा दिवस सिद्धीदात्री: सिद्धीदात्री देवी माता ही बळ, बुद्धी व विवेक प्रदान करणारी माता आहे. हिलाच सिद्धीदा किंवा सिद्धीदायिनी असेही म्हणतात. ही देवी अष्ट महासिद्धी देते त्या अश्या अणिमा-महिमा, गरिमा-लघिमा, प्राप्ती-प्राकाम्य, ईशीत्व-वशीत्व. सूक्ष्म रूप धारण करणारी म्हणजे अणिमा. महिमा म्हणजे शरीर मोठे होणे, लघिमा म्हणजे हलके होणे किंवा लवकरात लवकर काम करन्याची शक्ति. गरिमा म्हणजे सर्वाना पूजनीय होण्याची अवस्था तसेच सर्वाना वश करून घेणे या सर्व सिद्धी हिच्या कृपेने मिळतात ही देवी चतुर्भुज असून तीच्या उजव्या हातात चक्र व गदा आहेत. आणि डाव्या हातात शंख व पद्य आहे. हीचे वाहन सिंह असून ही कमलासना आहे. विधिविधानासह हिची उपासना केल्यास उपासकाला अशक्य काहीच राहात नाही.
नवरात्री मध्ये 10 दिवस माताच्या 9 रूपांची पूजा व शक्ति चा उत्सव आहे. दुर्गा पूजाची समाप्ती विजया दशमी हा दिवस आहे. ही तिथीला दोन वेळा आली आहे त्यामुळे ह्या वर्षी 9 दिवसांच्या आयवजी 10 दिवस नवरात्री आहे.