26 ऑगस्ट 2025, मंगळवार हरतालिका पूजनच्या दिवशी भगवान शिव-पार्वती, गणेश, सूर्य व शुक्र भगवान पूजा केल्याने शुभ फळ मिळतात
26 August 2025 Hartalika Pujan Full Information In Marathi
हरतालिका पूजन 26 ऑगस्ट 2025, मंगळवार ह्या दिवशी आहे. परंपरा अनुसार महिला संपूर्ण दिवस निर्जल व्रत ठेवतात. त्याच बरोबर रात्री जागरण भजन कीर्तन करतात.
हिंदु धर्मात हरतालिका व्रत हे विशेष महत्वाचे आहे. हे व्रत महिलांच्या साठी भक्ति, प्रेम व समर्पणचे प्रतीक मानले जाते. विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यसाठी व विवाहिक जीवनात सुख-समृद्धीसाठी करतात. तसेच अविवाहित कन्या चांगला जीवनसाथी मिळण्यासाठी करतात.
पौराणिक कथा नुसार ह्या दिवशी माता पार्वती नी घोर तपशर्या करून भगवान शिव ह्यांना आपले पती मानले होते. म्हणूनच ह्या व्रताला शिव-पार्वती मिलनचे प्रतीक मानले जाते. खर म्हणजे हरतालिका व्रत हे फक्त शिव-पार्वतीच्या पूजे पुरते नसून ह्या दिवशी भगवान गणेश, सूर्य देव व शुक्र देवची आराधना केली पाहिजे. त्यामुळे घरात सुख-शांती व समृद्धी मिळेल.
भगवान गणेशची पूजा महत्व:
प्रतेक शुभ कार्यमध्ये प्रथम भगवान गणेश ह्यांची पूजा केली जाते. हरतालिका व्रत ह्यादिवशी सुद्धा भगवान गणेश ह्यांची पूजा केली पाहिजे त्याशिवाय आपले व्रत पूर्ण होणार नाही. धार्मिक मान्यता अनुसार गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. कोणत्या सुद्धा पूजा किंवा व्रतमध्ये येणाऱ्या बाधा भगवान गणेश दूर करतात. म्हणूनच हरतालिका पूजेच्या वेळी महिला प्रथम भगवान गणेश ह्यांची पूजा करतात मग आपले व्रत सुरू करतात. असे केल्याने पूजा सफल होऊन निर्विघ्न होऊन संपन्न होते. त्याच बरोबर घरात सुख-समृद्धी व शांतीचे आगमन होते.
सूर्य देवची आराधना केल्याने ऊर्जा मिळून स्वास्थ्य चांगले राहते.
हरतालिका पूजनच्या दिवशी सूर्य देवाची पूजा करणे विशेष महत्वाचे मानले जाते. प्राचीन परंपरा अनुसार ह्या दिवशी भगवान सूर्यना अर्ध्य दिल्याने जीवनात ऊर्जा व उत्साहचा संचार होतो. असे म्हणतात की सूर्य देवाच्या कृपामुळे आपले आरोग्य चांगले राहते व जीवन शक्तिमध्ये वाढ होते. म्हणूनच ह्या दिवशी महिलांनी सूर्य देवाची आराधना करणे आवशक आहे.
शुक्र देव ची पूजा केल्याने प्रेम व सामंजस्य वाढते:
धार्मिक शास्त्रा मध्ये शुक्र देव ह्यांना प्रेम, आकर्षण व वैवाहिक सामंजस्यचे कारक मानले जाते. हरतालिक पूजन च्या दिवशी शुक्र देवाची पूजा करणे पती-पत्नी च्या जीवनासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. त्यांची आराधना केल्याने पती-पत्नीचे आपसातील प्रेम संबंध वाढतात व जीवनात मधुरता येते.
हरतालिका व्रत व पूजा:
हरतालिका व्रत हे निर्जल उपवास करून केले जाते. महिला संपूर्ण दिवस उपवास करून पाणी सुद्धा न ग्रहण करता भगवान शिव-पार्वतीची आराधना करतात. पूजेमध्ये नारळ, बेलपत्र, फळ, फुल, व मिठाईचा नेवेद्य दाखवतात. असे म्हणतात की ह्या दिवशी उपवास व विधिपूर्वक पूजा कल्याने सकारात्मक ऊर्जा येते. व परिवारात देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो.
हरतालिका व्रत पूजा शुभवेळ:
हरतालिक व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया ह्या तिथीला आहे. 26 ऑगस्ट 2025 मंगळवार ह्या दिवशी आहे.
संध्याकाळची वेळ ही पूजा करण्यासाठी उत्तम आहे.
संध्याकाळी 6:40 ते रात्री 8:51 पर्यन्त प्रदोष काळ आहे. ह्या वेळेत पूजा करू शकता.
पूजेची तयारी:
मीहिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची जागा स्वछ करून घ्यावी.
घराच्या पूर्व दिशेला किंवा देवघरात चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर केळीचे खांब किंवा फुल लाऊन सजवावे. चौरंगा भोवती छान रांगोळी काढावी.
चौरंगावर वस्त्र अंथरून त्यावर शंकर-पार्वती ची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. मनोभावे पूजा अर्चा करावी. धूप, दीप, नेवेद्य दाखवावा.

विविध प्रकारची पत्री व फुले अर्पित करावी. हरतालिकाची कथा वाचावी किंवा ऐकावी. रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे. दुसऱ्या दिवशी गूळ-खोबरेचा नेवेद्य दाखवून पूजा विसर्जित करावी. संपूर्ण दिवस उपवास करावा.
हरतालिका व्रत शिव-पार्वती पर्यन्त फक्त सीमित नाही.
असे मानले जाते की हरतालिका व्रत फक्त शिव-पार्वतीची आराधना करण्या पुरते आहे. पण शास्त्रा नुसार ह वारत तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा भगवान गणेश, सूर्य देव, व शुक्र देवची पूजा केल्यावर. ह्या सर्व देवतांची पूजा आराधना केल्याने आध्यात्मिक शक्ति मिळते त्याच बरोबर घर-परिवारात सुख, सौभाग्य व समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो.