23 ऑगस्ट 2025 शनिवार शनि अमावस्या, करा हे उपाय सर्व कष्ट दूर होतील
23 August 2025 Shaniwaar Shani Amavasya Upay in Marathi
श्रावण महिन्यातील अमावस्या तिथी 22 ऑगस्ट शुक्रवार सकाळी 11:55 सुरू होत असून 23 ऑगस्ट शनिवार सकाळी 11:35 पर्यन्त आहे. उदय तिथी मुख्य पर्व 23 ऑगस्ट शनिवार ह्या दिवशी आहे. अमावस्या जेव्हा शनिवार ह्या दिवशी येते तेव्हा त्याला शनि अमावस्या असे म्हणतात.
शनि अमावस्या: सनातन धर्म मध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्व असते. ह्या दिवशी लोक गंगा किंवा पवित्र नदीमध्ये स्नान व ध्यान करतात. अमावस्या हा दिवस पितरांना सुद्धा समर्पित आहे. ह्या तिथीला पितरांना तर्पण व पिंडदान केल्याने पितृ दोष पासून मुक्ती मिळते व परिवारात सुख-समृद्धी येते. शनिवार ह्या दिवशी अमावस्या आली की तिला शनि अमावस्या असे म्हणतात.
शनि आमवस्या कधी आहे?
श्रावण महिन्यातील अमावस्या तिथी 22 ऑगस्ट सकाळी 11:55 सुरू होत असून 23 ऑगस्ट सकाळी 11:35 पर्यन्त आहे. उदय तिथी अनुसार मुख्य पर्व 23 ऑगस्ट शनिवार ह्या दिवशी आहे. शनि अमावस्या ह्या दिवसाला धार्मिक दृष्टी बरोबर ज्योतिष शास्त्र मध्ये खास महत्व आहे. ह्या दिवशी शनि ग्रह शी जोडले गेलेले उपाय केल्याने शनि दोष व साडेसाती चा अशुभ प्रभावा पासून मुक्ती मिळते.
शनि अमावस्या ह्या दिवशी केले जाणारे उपाय:
शनि अमावस्या ह्या दिवशी शनिदेव ना मोहरीचे तेल अर्पित करावे. जर आपण शनि देवाच्या मूर्ती वर तेल अर्पित करणार असाल तर त्यांच्या पायाच्या अंगठ्यावर तेल अर्पित करावे व जर शनिदेव हे शिलाच्या रूपात विराजमान असतील तर संपूर्ण शिलावर तेल अर्पित करावे.
पिंपळाच्या झाडाच्या खाली दिवा लावावा:
शनि अमावस्या ह्या दिवशी सूर्यास्ता नंतर पिंपळाच्या झाडाच्या खाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की त्यामुळे जीवनात सुख-संपत्ती येते.
दान पुण्य करा:
ह्या दिवशी शनि संबंधित वस्तु म्हणजे मोहरीचे तेल, काळे तिल, उडीद डाळ, व लखंडाच्या वस्तु दान करा, त्याच बरोबर गरीब लोकांना भोजन, कपडे, चप्पल, छत्री व धन दान करा .
हनुमानजीनची उपासना करा:
शनि कष्ट पासून मुक्ती मिळण्यासाठी सर्वात श्रेष्ट उपाय आहे. बजरंगबलीची आराधना करा, असे म्हणतात की शनि देव हनुमान भक्तला कधी सुद्धा त्रास देत नाहीत.
शनि अमावस्या ह्या दिवशी काही कामे करणे वर्ज असते. त्यामुळे काही अशुभ होऊ शकते.
काय करू नये:
शनि अमावस्या ह्या दिवशी तेल व तिल दान करणे शुभ असते, पण ह्या दिवशी तेल किंवा तिल खरेदी करणे वर्ज असते.

शनि अमावस्याच्या दिवशी मसालेदार जेवण, मास, अंडी, मासे किंवा दारूचे सेवन करू नये. त्यामुळे शनिदेव नाराज होऊ शकतात व आपल्या जीवनातिल कष्ट वाढू शकतात.
शास्त्रा नुसार ह्या दिवशी मीठ खरेदी करणे सुद्धा अशुभ मानले जाते.असे म्हणतात की त्यामुळे आर्थिक संकट व धन हानी होऊ शकते.
शनि अमावस्या ह्या दिवशी केस किंवा नख कापणे अशुभ मानले जाते. त्यामुळे शनि देवाचा दोष आपल्याला लागू शकतो.
शनि अमावस्या ह्या दिवशी कोणाशी सुद्धा भांडण करू नये, किंवा कोणाचा अपमान करू नये. जर असे केलेतर शनिदेव नाराज होऊ शकतात किंवा आपल्याला कष्ट देवू शकतात.