Easy Quick Bun Dosa For Kids Tiffin or Nashta In Marathi
सोपा झटपट बन डोसा मुलांच्या डब्यासाठी नाश्तासाठी
मुलांना नाश्तासाठी किंवा डब्यासाठी रोज काहीतरी निराळे पाहिजे असते. आज आपण इडली बॅटर वापरुन एक मस्त पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत.
बन डोसा बनवताना आपण त्यामध्ये गाजर, शिमला मिरची वापरली आहे. बन डोसा बनवायला अगदी सोपा व झटपट होणार आहे. आपण अगदी पोट भरीचा अश्या प्रकारचा नाश्ता बनवू शकतो.
साहित्य:
2 कप इडली-डोसा बॅटर
1 छोटा कांदा (बारीक चिरून)
1 छोटे गाजर (बारीक चिरून)
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
2 टे स्पून शिमला मिरची (बारीक चिरून)
मीठ चवीने
तेल
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग

कृती: एका बाउलमध्ये इडली किंवा डोसा बॅटर घ्या. कांदा, शिमला मिरची, गाजर, कोथिंबीर व हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे हिंग घालून चिरलेला कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची व गाजर घालून मिक्स करून 2 मिनिट मंद विस्तवार परतून घ्या. मग विस्तव बंद करा.
आता इडली बॅटर मध्ये परतलेला कांदा, कोथिंबीर व मीठ घालून मिक्स करून घ्या.
एक छोटी फोडणी कढई किंवा छोटासा पॅन घेऊन त्यामध्ये थोडे तेल घालून 2 डाव इडली बॅटर घालून बाजूनी थोडे तेल सोडा मग मंद विस्तवावर 2 मिनिट फ्राय होऊ द्या, मग उलट करून परत दुसऱ्या बाजूनी परतून घ्या.
गरम गरम बन डोसा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.