श्रावण महिन्यात संक्षिप्त शिवलीलामृत कथासारचे पारायण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात
संक्षिप्त शिवलीलामृत कथासारचे पारायण करण्याचे महत्व
Shivlilamrut Kathasar Parayan Kelyane sarv manokamna purn hotat, niyam kay aahet in Marathi
श्रावण महिना हा भगवान शिव ह्यांना समर्पित आहे. श्रावण महिन्यात भगवान शिव ह्यांची पूजा अर्चा, मंत्र जाप केल्याने घरात सुख-शांती येते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
शिवलीलामृत कथासार ह्या मध्ये भगवान शंकर ह्यांची कथा आहेत. सचित्र श्री शिवलीलामृत कथासारचे आपल्याला पारायण करायचे असेलतर एक संकल्प करून रोज 7 दिवस वाचन करू शकता किंवा रोज 2 अध्यायचे वाचन करू शकता किंवा रोज संपूर्ण श्रावण महिना शिवलीलामृत कथासारचे वाचन करू शकता. श्रावण महिन्यात रोज सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध मनाने वाचन करावे. त्यामुळे आपल्याला भगवान शिव ह्यांची अनंत कृपा प्राप्त होऊन आशीर्वाद मिळतो. तसेच आपल्याला प्रतेक प्रश्नाचे उत्तर मिळते.
शिवलीलामृत संक्षिप्त कथासारमध्ये एकूण 14 अध्याय आहेत प्रतेक अध्यायाचे विशेष महत्व आहे. शिवलीलामृत कथासारमधील अध्याय 11 हा भगवान शिव ह्यांचा खूप शक्तिशाली अध्याय आहे.
श्रावण महिन्यात शिवलीलामृत कथासारचे पारायण का करावे:
भगवान शंकर हे देवांचे देव महादेव आहेत. कलियुगात ते श्रेष्ट मानले जातात. मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा प्रतेक व्यक्तिलच्या आयुष्यंत डूख, संकटे असतात ह्यामधून मार्ग काढण्यासाठीच आपण भगवान शंकर ह्यांना शरण जाऊन शिवलीलामृत कथासारचे पठन करायचे आहे. आपल्याला प्रतेक अध्यायमध्ये जीवनातील प्रतेक प्रश्नाची उत्तरे मिळतील. त्याच बरोबर त्याचे फळ सुद्धा प्राप्त होईल.
शिवलीलामृत कथासार मध्ये भगवान शंकर ह्याचे विविध अवतार व त्यांनी भक्ताना दिलेला आशीर्वाद वर्णन केले आहे. ह्या यामध्ये शिवाचा महिमा व भक्ति, समर्पण व त्यागाची शिकवण दिलेली आहे. ह्या मध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा व मोक्षचा मार्ग दाखवला आहे.
शिवलीलामृत कथासार मध्ये पुढील 3 अध्याय महत्वाचे आहेत.
शिवलीलामृत कथासार मध्ये 1 हिला अध्याय दाशाहर राजाच्या जीवनातील परिवर्तन कथा आहे.
11 वा अध्याय सर्वात महत्वाचा आहे ह्याला रुद्र अध्याय असे म्हणतात.ह्यामध्ये भगवान शिव ह्यांची महानता सांगितली आहे. तसेच हा अध्याय पठन केल्याने सर्व दु:ख दारिद्र दूर होऊन हजारो रुद्रभिषेकचे पुण्य मिळते.
अध्याय 14 मध्ये व्याधीची कथा आहे, जो शिकारी असून त्याने केलेल्या चुकीमुळे त्याला शिक्षा मिळाली पण शंकराच्या कृपे मुळे शिक्षा कमी होते.

शिवलीलामृत कथासार मधील 1 ते 14 अध्याय पठणाचे महत्व:
पहिला अध्याय मध्ये आपल्याला सद्गुरूनचे आशीर्वाद मिळतात, दुसऱ्या अध्याय मध्ये शिवभक्तीची अनुभूति मिळते, तिसऱ्या अध्यायमध्ये पापांचे क्षालन होऊन आपल्या जीवनाला सदमार्गाची दिशा मिळते.
चौथ्या अध्याय शिवपूजेचे फळ मिळते, पाचव्या अध्यायमध्ये आपल्यावर येणारी संकटे दूर होतील, सहाव्या अध्याय मध्ये स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल व उत्तम आरोग्य मिळले.
सातव्या अध्याय मध्ये भगवान शंकर ह्यांची कृपा मिळून मृत्यूवर मात करता येईल, आठव्या अध्याय मध्ये संकट, शारीरिक व्याधीतून सुटका होईल, नवव्या अध्यायमध्ये पूर्व जन्माची स्मृति होऊन या जन्माचा उद्धार होईल.
दहाव्या अध्याय मध्ये कृपा मिळून आपल्या प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला नवी दिशा मिळेल, आकरावा अध्याय अपमृतु टळेल, हितशत्रूचे बळ कमी होईल, प्रतिष्ठा व मान सन्मान मिळेल.
बाराव्या अध्याय मध्ये कुटुंबातील मृत आत्माना सदगती प्राप्त होतील, त्याच बरोबर परिवारातील भूत पिशाच बाधा नष्ट होईल, तेराव्या अध्यायात आध्यात्मिक गोडी लागेल, अडकलेली काणे पार पडतील, चौदा अध्याय गुरुकृपा लाभेल व विद्या प्राप्ती होईल.
शिवलीलामृत कथासार पठनचे फायदे किंवा लाभ:
आध्यात्मिक लाभ:
शिवलीलामृत कथासार पठणने भगवान शंकर प्रसन्न होतात व भक्तावर कृपा करतात.
पूर्वी केलेली पाप कमी होऊन मन शुद्ध होते.
भगवान शिव ह्यांची महती व शिकवण मिळून ज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळे जीवनाचा योग्य मार्ग मिळतो.
शिवलीलामृत कथासार पठन केल्याने मोक्ष मिळण्यास मदत होते.
सांसारिक लाभ:
शिवलीलामृत कथासारचे पठन केल्याने जीवनातील अडचणी व संकटे दूर होतात.
भगवान शिव ह्यांची कृपा मिळून पुण्य मिळते व घरात सुख -समृद्धी येते.
असे म्हणातत की शिवलीलामृत कथासार पाठणाने आरोग्य सुधारते व शररीक व मानसिक त्रास कमी होतो.
मनशांति मिळून स्थिरता मिळते तसेच नैराश्य कमी होते.
शिवलीलामृत कथासार पारायण करण्याचे नियम असे काही कडक नाहीत. पारायण सुरू करताना शुभ दिवस किंवा श्रावण महिन्यात करावे. रोज देवघरात समोर बसून पठन करावे. पारायण पूर्ण झाल्यावर नेवेद्य दाखवावा.