Zatpat Konkani Swadisht Paushtik Nashta Mulansathi In Marathi
झटपट कोंकणी पौस्टिक स्वादिष्ट नाश्ता मुलांसाठी 1 कप प्रमाण रवा+दूध+नारळ
मुलांना रोज नाश्तासाठी किंवा शाळेत जाताना डब्यासाठी वेगवेगळे पदार्थ पाहिजे असतात मग आवडतीचा नाश्ता किंवा डब्बा असला की मिनिटात संपतो.
पण आपण विचार करतो मुलांचा नाश्ता पौष्टिक असावा. आज आपण असाच एक छान कोंकणी पदार्थ बनवणार आहोत बनवायला अगदी सोपा व झटपट होणार आहे.
साहित्य:
1 कप रवा
1 कप दूध
1 कप ओला नारळ खोऊन
2 टे स्पून गूळ
1 टी स्पून वेलची पावडर
मीठ चवीने
तेल किंवा बटर नाश्ता भाजण्यासाठी

कृती: एका बाउलमध्ये रवा व दूध मिक्स करून झाकून 10 मिनिट बाजूला ठेवा, मग त्यामध्ये ओला नारळ, गूळ, मीठ व वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या, गरज भासेल तसे पाणी किंवा दूध वापरुन मिश्रण डोशाच्या पिठा सारखे बनवून घ्या.
नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा त्याला बटर किंवा तेल लाऊन एक एक डाव मिश्रण घालून छोटी छोटी धिरडी घाला. पॅन जर मोठा असेलतर एका वेळी 3 ते 4 धिरडी बसतील, मग बाजूनी थोडेसे तेल किंवा बटर घालून झाकण ठेवा व मध्यम विस्तवावर 2-3 मिनिट भाजून घ्या.
मग झाकण काढून धिरडी उलट करून परत बाजूनी थोडेसे तेल किंवा बटर घाला 2 मिनिट झाकण ठेवा. मग झाकण काढून गरमा गरम धिरडी सर्व्ह करा.