Ashadha Month 2026 | Religious Significance, Festivals & Why is Ashadh Talava Celebrated?

Ashadha Month 2026
Ashadha Month 2026 | Religious Significance, Festivals & Why is Ashadh Talava Celebrated?

आषाढ महिन्याचे धार्मिक महत्व, प्रमुख सण, आषाढ तळावा असे का? संपूर्ण महिती 

Ashadha Month 2026 | Religious Significance, Festivals & Why is Ashadh Talava Celebrated?

हिंदू धर्मामध्ये आषाढ महिना खूप शुभ व पवित्र मानला जातो. ह्या महिन्यात भगवान विष्णु ह्यांची आराधना करण्याचे विशेष महत्व आहे.

आता 15 जुलै 2026 बुधवार ह्या दिवसा पासून आषाढ महिना सुरू होत आहे. हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्याचे विशेष महत्व आहे. आषाढ महिन्यात भगवान विष्णु ह्यांची पुजा अर्चा करणे शुभ मानले जाते. आषाढ महिन्या पासून पाऊस पडायला सुरुवात होते. त्यामुळे चोहीकडे हिरवी गार चादर पसरली आहे असे दिसते. धार्मिक मान्यता अनुसार ह्या महिन्यात पूजा-पाठ, दान, तप, व जप करण्याचे महत्व आहे.

चला तरमग पाहू या आषाढ महिन्याचे धार्मिक महत्व काय आहे ह्याची संपूर्ण माहिती  

आषाढ महिन्याचे धार्मिक महत्व: 

हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्याचे शुभ व धार्मिक महत्व आहे. ह्या महिन्यात जगन्नाथ रथ यात्रा निघते. आषाढ महिन्यातच देवशयनी एकादशी येते. ज्यामध्ये भगवान विष्णु चार महीने योगनिद्रा मध्ये जातात. म्हणजेच चार महीने चातुर्मास ची सुरुवात होते. चातुर्मास मध्ये भगवान विष्णु क्षीर सागरमध्ये विश्राम करण्यासाठी जातात. त्यामुळे चार महीने कोणती सुद्धा शुभ कार्य किवा मंगल कार्य होत नाहीत. आषाढ महिना गुरुची कृपा प्राप्त करण्यासाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो. हा महिना गुरु ची सेवा व सन्मान मिळण्यासाठी विशेष मानला जातो.

आषाढ महिनात आषाढ वारी कधी असते:

महाराष्टमध्ये आषाढ वारीची लाखों भक्त वर्षभर वाट पहात असतात. ह्या वारी मध्ये गरीब, श्रीमंत असा भेद भाव नाही प्रतेक भक्त विठ्ठल-माऊलीचे नामस्मरण करीत पायी चालत असतो, नामस्मरण खूप श्रद्धेने व भक्ति भावाने करतात. संपूर्ण महाराष्ट्र खूप भक्तिमय होतो त्याचे कौतुक करणे खूप आवघड आहे. कितीही ऊन असो पाऊस असो माऊली भक्त नामस्मरण करती चालत असतो. प्रतेक भक्ताला विठूरायाच्या भेटीची ओढ लागलेली असते.

आषाढ महिन्यात आषाढी एकादशी 25 जुलै 2026 शनिवार ह्या दिवशी आहे. आषाढ वारीची सुरुवात 7 जुलै 2026 मंगळवार ह्यादिवशी संत तुकाराम महाराज ह्यांच्या पालखीचे प्रस्थान देहू ह्या गावातून होऊन पंढरपूर येथे पोहचते. आपल्याला महिती आहे का ह्यावर्षी संत तुकाराम महाराज ह्याच्या पालखीचा 341 वा पालखी सोहळा आहे. तसेच 8 जुलै 2026 बुधवार ह्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान करून 24 जुलै शुक्रवार ह्यादिवशी पंढरपूर येथे पोहचणार आहे.

आषाढ महिना सुरुवात कधी? 

आषाढ महिना 15 जुलै 2026 बुधवार ह्या दिवसापासून सुरू होत असून 12 ऑगस्ट 2026 बुधवार रोजी समाप्त होत आहे.

आषाढ महिन्यामध्ये कोण कोणते महत्वाचे दिवस किंवा सण आहेत: 

1. आषाढी एकादशी : २५ जुलै 2026 शनिवार 

२५ जुलै २०२६ शनिवार ह्या दिवसा पासून चातुर्मासाची सुरुवात होत आहे.

आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात. ह्या दिवशी भगवान विष्णु चार महीने योगनिद्रामध्ये जातात. म्हणजेच चातुर्मास सुरू होतो ह्या मध्ये कोणते सुद्धा शुभ कार्य केले जात नाही.

आषाढी एकादशी ही वारकरी संप्रदाय मध्ये खूप महत्वाची मानली जाते, ह्या दिवसाला खूप विशेष महत्व आहे. ह्या दिवशी लाखों वारकरी पंढरपूर येथे जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठल-रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतात. ह्या दिवशी शासन वारकरी लोकांची खूप काळजी घेतात.

2. आषाढ प्रदोष : २६ जुलै 2026 रविवार:

प्रदोश व्रत हे भगवान शिव ह्यांना समर्पित आहे. प्रदोश काळात (सूर्यास्तच्या वेळी) भगवान शिव ह्यांची पूजा अर्चा करणे खूप शुभ मानले जाते. ह्या व्रताच्या दिवशी उपवास करून शिव आराधना केल्यास घरात सुख-समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त प्राप्त होते.

3. गुरु पौर्णिमा : २९ जुलै 2026 बुधवार:

गुरु पूर्णिमा हा दिवस खूप महत्वाचा आहे ह्या दिवशी आपल्या गुरुना वंदन करून  कृतज्ञता व्यक्त केली जाते. ह्या दिवशी महर्षि वेडव्यास ह्यांचा जन्म झाला होता. टु दिवस आषाढी पूर्णिमा होता, हा दिवस आपल्या गुरु ना समर्पित आहे. ह्या दिवशी भगवान विष्णु, माता लक्ष्मी व सत्यनारायण पूजा केली जाते. ह्या दिवशी उपवास करून दान धर्म केला जातो.

4. संकष्टी चतुर्थी : २ ऑगस्ट 2026 रविवार 

संकष्टी चतुर्थी ह्या दिवक्षू भगवान गणेश विघ्नहर्ता ह्यांची पूजा अर्चा व्रत केल्याने सर्व संकट दूर होऊन घरात सुख समृद्धी येते.

5. कामिका एकादशी : ९ ऑगस्ट 2026 रविवार 

कामिका एकादशी चे व्रत केल्याने सर्व पापान पासून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्ती होते. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णुची मनापासून पूजा करावी. भगवान विष्णु व माता लक्ष्मीला पिवळे फूल, फळ, व तुळशी पत्र अर्पित करावे. ह्या दिवशी व्रत केल्याने व्रताचे फळ म्हणजे अश्वमेध यज्ञासमान मानले जाते, ह्या दिवशी दान धर्म करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे पितृदोष शांत होतो.

6. आषाढ प्रदोष : १० ऑगस्ट 2026 सोमवार 

सोमवारी येणाऱ्या प्रदोश व्रतांमुळे मानसिक शांती, स्थिरता व आरोग्य मिळते. ह्या दिवशी उपवास करून प्रदोश काळात भगवान शिव व माता पार्वतीचीपूजा करतात.

7. गटारी अमावस्या किंवा दीप अमावस्या: १२ ऑगस्ट 2026 बुधवार

आषाढ महिना संपला की श्रावण मास सुरू होतो, श्रावण मास मध्ये मांसाहार व मद्यपान वर्ज आहे. म्हणून लोक आषाढ महिन्याच्या शेवट्याच्या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी आपल्या आवडीचे मांसाहारी जेवण सेवन करतात मग संपूर्ण श्रावण महिना पाळतात.

आषाढ अमावस्या ह्या दिवसाला धार्मिक दिवस म्हणजे दीप अमावस्या असे सुद्धा म्हणतात. ह्या दिवशी घरातील सर्व दिवे साफ करून (निरंजन व समई) त्यांची विधिपूर्वक पूजा करून ते दिवे  प्रज्वलित करतात.

Ashadha Month 2026
Ashadha Month 2026 | Religious Significance, Festivals & Why is Ashadh Talava Celebrated?

आषाढ महिन्यात काय करावे व काय टाळावे? 

आषाढ महिन्यात रोज भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा केली जाते.

विष्णु सहस्त्रनाम व श्रीहरी मंत्राचा जाप करणे शुभ मानले जाते.

आषाढ महिन्यात दान धर्म करणे महत्वाचे मानले जाते. ह्या महिन्यात जरूरत मंद लोकांना अन्न वस्त्र व धन दान करावे.

आषाढ महिन्यात एकादशी व दुसऱ्या व्रताच्या नियमांचे पालन करावे.

गुरूनचा सन्मान करा व धार्मिक अध्यायांचे वाचन करा.

आषाढ महिन्यात तामसी भोजन करणे टाळावे.

आषाढ महिन्यात चुकीची कामे करू नयेत किंवा अपक्शब्द बोलू नयेत.

आषाढ महिन्यात आषाढ तळावा (आखाडा तळणे) असे का म्हणतात?  

आषाढ महिन्यात पाऊस जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी व सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात तेव्हा त्यांचे लाड करण्यासाठी पुरी, भजी, वडे, चकली व पापड-पापड्या असे तळणीचे पदार्थ तळतात.

आषाढ तळणे ह्या प्रथे मागील मुख्य उद्देश म्हणजे आरोग्य व हवामान कारण की ह्या महिन्यात हवेत गारवा असतो. अश्या वेळी शरीराला उष्णतेची व ऊर्जेची गरज असते तळलेले पदार्थ सेवन केल्याने जठराग्नी प्रज्वलित होऊन भूक भागते व पचन क्रिया चांगली राहते. माहेरी आलेल्या मुलींचे व जावयाचे गोड-धोंड व तळणीचे पदार्थ बनवून त्यांना मान दिला जातो.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.