Vinayak Chaturthi 2026 | Guru Pushya Nakshatra Yog | 5 Powerful Remedies for Wealth, Health & Prosperity
18 जूनचा दुर्लभ योग! विनायक चतुर्थी + गुरु पुष्य नक्षत्र | लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी करा हे उपाय
18 जून विनायक चतुर्थी| गुरु पुष्य नक्षत्र योग सुख-संपत्ती व आरोग्यसाठी उपाय
18 जुन 2026 गुरुवार ह्या दिवशी विनायक चतुर्थी व गुरु पुष्य नक्षत्र योग आहे. पुष्य नक्षत्रला नक्षत्रांचे स्वामी मानले जाते. गुरु व पुष्य ह्यांचे मिलन महणजे गुरु पुष्य योग बनतो. ज्याला जोतिष शास्त्रा मध्ये अत्यंत फलदायी व प्रभावशाली मानले जाते.
विनायक चतुर्थी गुरु पुष्यमृत योग 18 जून 2026 शुभ वेळ: सकाळी 10:58 ते 1:46 मिनिट आहे.
पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानले जाते. ज्यांचे गुरु हे स्वतः गुरु आहेत व स्वामी शनि देव आहेत. ह्या वेळेत गुरु हे उच्च आहेत म्हणून त्यांचे गोचर शुभ मानले जाते. गुरूचे नक्षत्र परिवर्तन धन, सुख-समृद्धी व चांगले आरोग्य ह्या साठी वरदान आहे.
गुरुपुष्य नक्षत्र ह्या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, आपण श्री यंत्र किंवा गणपती बाप्पाची मूर्ती किंवा माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करू शकता. पण आता सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. सोने-चांदी खरेदी करू शकत नसाल तर एखादे लक्ष्मी प्राप्तीचे ब्रेसलेट खरेदी करू शकता.
18 जुनला विनायक चतुर्थी व गुरु पुष्य नक्षत्र आहे हा योग अगदी शर्करा योग जुळून आला आहे. ह्या दिवशी आपण गणपती बाप्पाचे मंत्र जाप, अथर्वशीर्ष म्हणू शकता व गणपती बापांच्या बरोबर भगवान विष्णु व माता लक्ष्मीची सुद्धा पूजा अर्चा करू शकता. गणपती बाप्पाना लाल फूल व दूर्वा अर्पित करा. तसच आपण ह्या दिवशी सत्यनारायण करू शकता, विष्णु सहस्त्रनाम म्हणू शकता, गुरु दत्तात्रय ह्यांची आराधना करू शकता, श्री स्वामी समर्थ ह्यांचा मंत्र जाप किंवा गुरुचरित्राचे वाचन करू शकता, असे केल्याने आपल्याला भगवान विष्णु व माता लक्ष्मी व गणपती बाप्पा नचा आशीर्वाद मिळून सर्व मनोकामना पूर्ण होतात, धन वृद्धी होते, नाकारात्मकता निघून सकारात्मकता येते, रोग निवारण होते.
18 जून गुरुवार विनायक चतुर्थी व गुरु पुष्य नक्षत्र आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ व फलदायी आहे. ह्या दिवशी कोणते सुद्धा शुभ कार्य करू शकता म्हणजे कोणत्या नवीन व्यापाराला सुरुवात, नवीन अभ्यासाला सुरुवात, नवीन कोणता कौर्स करायचा असेलतर करू शकता, नवीन गुंतवणूक करू शकता, फक्त लग्न कार्य करू नये. कोणत्यासुद्धा नवीन कामाची सुरुवात करताना आपण भगवान गणेश ह्यांची प्रथम पूजा अर्चा क्ररतो मग आपले काम सुरू करतो. आपली अधिक मास मध्ये कोणती सेवा करायची राहिले असेलतर ती सुद्धा करू शकता.
आपण सुद्धा ह्या गोचरचा फायदा घेणार असाल व आपल्या जीवनात पैशाची तंगी व आजारपण पासून दूर जायचे असेलतर त्यासाठी पुढे दिलेले 5 अचूक उपाय जरूर करा.
गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी केसर-हळदीचा तिलक: गुरु ग्रहचा संबंध पिवळ्या रंग व खुशालीशी आहे. ह्या गोचरमध्ये आपल्या कपाळावर दोन्ही भुवयाच्या मध्य भागी केशर हळद ह्यांचा तिलक लावावा असे केल्याने कुंडली मधील गुरु मजबूत बनतो. त्यामुळे मान-सन्मान वाढतो व नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
विष्णु सहस्रनामचे पाठन: आपले पैशे कुठे अडकले असतील व कर्जाचा बोजा वाढला असेलतर ह्या दिवशी विष्णु सहस्रनामचे पाठन करावे किंवा आइकावे. त्यामुळे धनाचे आगमन होण्यास नवीन मार्ग मिळतात. पुष्य नक्षत्रचे देवता स्वतः भगवान बृहस्पति व भगवान विष्णु हे प्रधान देव आहेत.

सुख-समृद्धी व धन वृद्धीसाठी: गुरु पुष्य योग मध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तु जसे की चनाडाळ, केली, पिवळी वस्त्र, धार्मिक पुस्तक किंवा हळदीचे गुप्त दान करा. पिवळ्या वस्तुचे दान केल्याने घरात कधीसुद्धा धन-धान्यची कमतरता होत नाही.
करियर व विवाह मध्ये अडचणी किंवा उशीर: प्रतेक गुरुवारी जल, थोडीशी हळद, चनाडाळ, व गूळ मिक्स करून केळ्याच्या वृक्षाला अर्पित करा. एक दिवा लावा व “ॐ बृं बृहस्पतये नमः” ह्या मंत्राचा जाप करा. असे केल्याने नोकरी व बिजनेसमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील व ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील त्यांचे विवाहाचे योग लवकर जुळून येतील.
गाईला गूळ खायला द्या: बऱ्याच काळा पासून शरीरीक आजार असतील किंवा परेशानी असतील तर ह्या दिवशी किंवा प्रतेक गुरुवारी ओली चनाडाळ, व गूळ आपल्या हातांनी गाईला खावू घालून तिच्या पाठीवरून हात हिरवून आशीर्वाद घ्या. असे केल्याने शारीरिक आजार दूर होण्यास मदत होऊन आपले आरोग्य चांगले राहील.
