स्वादिष्ट रसरशीत गुलाबजाम केक बिना अंड्याचा बिना प्रीमिक्स सोपा केक
Delicious Juicy Gulab Jamun Cake Bina Egg Bina Premix Easy Cake In Marathi
आपण आता पर्यन्त बऱ्याच प्रकारचे निरनिराळे केक कसे बनवायचे ते पाहिले पॅन आज आपण अगदी मस्त रसरशीत गुलाब जाम केक कसा बनवायचा ते पाहू या, अगदी नवीन पद्धत आहे व खूप मस्त डिलीशीयस गुलाबजाम केक अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत.
The Delicious Juicy Gulab Jamun Cake Bina Egg Bina Premix Easy Cake In Marathi can be seen on our You tube Chanel Delicious Juicy Gulab Jamun Cake Bina Egg Bina Premix
गुलाब जामून केक बनवताना खव्याचे गुलाब जाम बनवले आहेत जर आपल्याला प्रीमिक्सचे गुलाबजाम बनवायचे असतील तरी चालेल. केकमध्ये गुलाब जामचे पण पिसेस वापरले आहेत व सजावट करताना सुद्धा गुलाबजाम वापरले आहेत त्यामुळे ह्या केकची टेस्ट अगदी अप्रीतीम लागते.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
बेकिंग वेळ: ४० मिनिट
वाढणी: ४-६ जणसाठी
केक बनवण्यासाठी साहित्य:
१/२ कप पिठीसाखर
१/२ कप दही
१/४ कप तूप किंवा बटर किंवा तेल
१ कप मैदा
१ टी स्पून बेकिंग पावडर
१/४ टी स्पून बेकिंग सोडा
२ टे स्पून मिल्क पावडर
१ टी स्पून वेलची पावडर
१/4 कप दूध
गुलाबजाम साहित्य:
१२५ ग्राम खवा
२ टे स्पून रवा + १ टे स्पून दूध
साखरेचा पाक बनवण्यासाठी साहित्य:
१ कप साखर
३/४ कप ला थोडे कमी पाणी
१/२ टी स्पून वेलची पावडर
तेल गुलाबजाम तळण्यासाठी
सजावटी करिता:
वीप क्रीम
ड्रायफ्रूट
गुलाबजाम
कृती: गुलाबजाम बनवण्यासाठी:
प्रथम रवा व दूध मिक्स करून २ तास भिजत ठेवा.
एका कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करायला ठेवा.
दुसऱ्या पॅनमध्ये एक कप साखर व ३/४ कप पाणी घालून साखर पूर्ण विरघळे पर्यन्त गरम करून घ्या, उकळी आली की त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून बाजूला ठेवा.
एका बाउलमध्ये खवा किसून घ्या, त्यामध्ये भिजवलेला रवा व मैदा घालून मळून एक गोळा बनवून घ्या, मग गोळ्याचे छोटे छोटे बॉलस् बनवून घ्या, तेल किंवा तूप गरम झाले की छोटे छोटे गोळे मध्यम विस्तवावर छान ब्राऊन रंगावर तळून घेऊन एक मिनिट बाजूला ठेवून पाकामध्ये टाका पण साखरेचा पाक थोडा गरम पाहिजे अश्या प्रकारे सर्व गोळे तळून पाकात घाला, आता पाकातील गुलाबजाम परत विस्तवावर ठेवून २ मिनिट गरम करून घ्या, एक उकळी आली की विस्तव बंद करा. आता पॅन बाजूला काढून ठेवा.
केक बनवण्यासाठी:
केक बेक करण्यासाठी पॅन गरम करायला ठेवा, पॅनवर झाकण ठेवा. केक बनवणार त्या भांड्याला किंवा बेकिंग ट्रेला तेल किंवा तूप लावून त्यामध्ये बटर पेपर ठेवा.
साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. एका बाउल मध्ये पिठीसाखर, दही व तूप किंवा तेल किंवा बटर मिक्स करून घ्या. मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मिल्क पावडर, वेलची पावडर चाळून घ्या, मग चाळलेला मैदा पिठीसाखरेच्या मिश्रणात घालून मिक्स करून घ्या.
आता केकचे मिश्रण बेकिंग ट्रे मध्ये घालून एक साखरे करून एकदा टॅप करा, मग ट्रे गरम केलेल्या पॅनमध्ये ठेवून ३५-४० मिनिट बेक करा. थंड झाल्यावर बाहेर काढून ठेवा. मग वरचा फुललेला भाग हळुवार पणे कापून घ्या व बाकीच्या केकचे २ किंवा तीन भाग करा म्हणजे त्याच्या गोल चकत्या कश्या कापतो तसे कापायचे स्लाइस प्रमाणे.
केक सजावटी करिता:
आता केकची आपण सजावट करायची आहे. एका प्लेट मध्ये केकचा प्रथम खालचा स्लाइसचा भाग घेऊन त्यावर गुलाबजामचा थोडा पाक व थोडेसे पाणी मिक्स करून २ टे स्पून मिश्रण लावावे. मग त्यावर २-३ टे स्पून वीपक्रीम लावावे व ३-४ गुलाबजामचे तुकडे करून घालावे. मग त्यावर केकची दुसरी स्लाइस म्हणजे दूसरा भाग ठेवून त्यावर परत २ टे स्पून साखरेचा पाक व पाणी मिक्स केलेले मिश्रण हळुवार पणे सर्व ठिकाणी चमचानी घालावे परत वरतून विपक्रिम लावावे एक सारखे करून गुलाब जामके दोन भाग करून घ्या. असे ३-४ गुलाब जाम कापून घेऊन केक वर ठेवा थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे घालून सजवून मग सर्व्ह करा.