14 फेब्रुवारी 2024 बसंत पंचमी सरस्वती पूजन मुहूर्त मुलांसाठी मंत्र अभ्यासात होईल प्रगती
14 February 2024 Basant Panchami Muhurat W Mulansathi Mantra In Marathi
बसंत पंचमी ह्या दिवशी माता सरस्वती हातात पुस्तक, विणा व माळ घेऊन पांढरे वस्त्र परिधान करून कमळावर विराजमान होऊन प्रकट झाली होती. म्हणूनच ह्या दिवशी माता सरस्वतीची पूजा अर्चा केली जाते. त्याच बरोबर वसंत पंचमी ह्या दिवशी वसंत ऋतुची सुरवात होते.
The 14 February 2024 Basant Panchami Muhurat Mulansathi Mantra in Marathi be seen on our You tube Chanel 14 February 2024 Basant Panchami Muhurat Mulansathi Mantra
पंचांग अनुसार प्रतेक वर्षी माघ महिन्यात शुक्ल पक्ष पंचमी ह्या तिथीला वसंत पंचमी साजरी करतात. हा सण मुख्य करून ज्ञान, विद्या, संगीत व कला ची देवी माता सरस्वतीला समर्पित आहे. ह्या दिवशी देवीमाता सरस्वतीचा जन्म झाला होता. शास्त्रा नुसार वसंत पंचमी ह्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने माता लक्ष्मी व माता काली प्रसन्न होते. तसेच ह्या दिवसा पासून वसंत ऋतुची सुरवात होते.
आता आपण पाहू या वसंत पंचमी तिथी, पूजाविधी व मुलांसाठी मंत्र
वसंत पंचमी 2024 तिथि:
पंचांग अनुसार माघ महिन्यात शुल्क पक्ष पंचमी तिथी सुरवात 13 फेब्रुवारी दुपारी 2 वाजून 41 मिनिट होत असून समाप्ती 14 फेब्रुवारी दुपारी 12 वाजून 9 मिनिट ला समाप्ती होत आहे. म्हणून ह्या वर्षी 14 फेब्रुवारी ह्या दिवशी वसंत पंचमी साजरी करावयाची आहे.
वसंत पंचमी 2024 पूजा शुभ मुहूर्त:
14 फेब्रुवारी वसंत पंचमी पूजा मुहूर्त सकाळी 7 वाजून 1 मिनिट ते दुपारी 12 वाजून 35 मिनिट पर्यन्त आहे. ह्या वर्षी पूजासाठी फक्त 5 तास 35 मिनिट आहेत तर ह्या वेळात पूजा करावी.
वसंत पंचमी पूजा विधि:
वसंत पंचमी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करून सरस्वती पूजेचा संकल्प करावा.
पूजास्थानवर माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा, मग माता सरस्वती ला गंगाजलनी स्नान घालून पिवळे वस्त्र घालावे.
मग पिवळे फूल, अक्षता, पांढरे चंदन, पिवळी रोली, पिवळा गुलाल, धूप, दीप, गंध, अर्पित करावे.
वसंत पंचमी ह्या दिवशी माता सरस्वती ला पिवळ्या झेंडूची माळ अर्पित करा व त्याच बरोबर पिवळी मिठाईचा भोग दाखवा.
मग सरस्वती वंदना व मंत्र म्हणून माता सरस्वतीची पूजा अर्चा करा. आपण पाहिजे तर सरस्वती कवच सुद्धा वाचू शकता.
मग शेवटी हवन कुंड तयार करून साहित्य घेऊन “ॐ श्री सरस्वत्यै नमः: स्वह:” किंवा ‘ॐ ऐं सरस्वत्यै ऐं नमः’ ह्या मंत्राचा 108 वेळा जाप करीत हवन करावे. मग शेवटी माता सरासवतीची आरती म्हणावी.
धार्मिक मान्यता अनुसार माता सरस्वतीची पूजा अर्चा केल्याने साधकाला शिक्षण व कला क्षेत्रात सफलता मिळते. जर आपल्या मुलाचे लक्ष अभ्यासात लागत नसेलतर बसंत पंचमी ह्या दिवशी मुलांकडून माता सरस्वतीची पूजा करून काही उपाय करवून घेऊ शकता त्यामुळे मुलांचे अभ्यासातील एकाग्रताची वृद्धी होऊन प्रतेक कार्यमध्ये सफलता प्राप्त होऊ शकेल.
बसंत पंचमी ह्या दिवशी मुलांकडून काही उपाय करून घ्या त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मिळेल सफलता
माघ महिन्यातील बसंत पंचमी ह्या दिवशी मुलांकडून माता सरस्वतीची पूजा अर्चा करून घ्या त्यामुळे विशेष लाभ मिळतील. त्यांना ज्ञान व बुद्धिचा आशीर्वाद माता सरस्वती कडून मिळेल.
बसंत पंचमी ह्या दिवशी सरस्वती माताची कृपा मिळण्यासाठी जरूरतमंद लोकांना पेन, वही किंवा पुस्तक दान करा. हा उपाय केल्याने मुलांच्या वाणी मधील दोष दूर होतो. त्याच बरोबर स्मरणशक्ती वाढते. तसेच त्यांचे अध्यात्मकडे लक्ष केंद्रित व्हायला लागते.