टेस्टि अप्रतिम ब्रोकोली फ्राइड राईस मुलांच्या डब्यासाठी
Tasty Broccoli Fried Rice For Kids Tiffin Recipe In Marathi
ब्रोकली मध्ये खूप सारे गुण आहेत. त्यामध्ये प्रोटिन, कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट, आयर्न, विटामीन ए, सी व अजून पोषक तत्व आहेत.
ब्रोकलीमध्ये कैरेटेनॉयड्स लयूटीन हे तत्व आहे त्याच्या मुळे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यानचे आरोग्य चांगले राहते. कोलेस्ट्रॉलचा वाढत नाही.
ब्रोकोली फ्राइड राईस ह्या विडियोची लिंक पूढी दिलेली आहे तेथे पाहू शकता: ब्रोकोली फ्राइड राईस
ब्रोकली मध्ये फिटाकेमिकल जास्त प्रमाणात आहे तसेच त्यामध्ये असणारे तत्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे कॅन्सर होत नाही. ब्रोकली मध्ये फोलेटची मात्रा जास्त प्रमाणात आहे त्यामुळे डिप्रेशनचा खतरा होत नाही व आपला मूड सुद्धा चांगला राहतो.
ब्रोकली मध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे रोग प्रतिकार शक्ति वाढते. ब्रोकली मध्ये विटामीन सी व अॅंटी ऑक्सिडेन्ट आहे ते आपली चरबी कमी करते. शरीरातील पोषक तत्व कमी झाली की दात व हाड कमजोर व्हायला लागतात. ब्रोकली मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे त्यामुळे त्याचे सेवन करावे.
ब्रोकली पासून आपल्या शरीराची पचन शक्ति वाढते, डायबीटीससाठी उपयोगी, स्कीनसाठी उपयोगी, केसांचे आरोग्य चांगले राहते. तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 कप बासमती तांदळाचा भात
1 कप ब्रोकोलीचे तुरे
1 कांदा उभा पातळ चिरून
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1/2 कप शिमला मिर्च उभी पातळ चिरून
1/2 कप गाजर उभे पातळ चिरून
1 टे स्पून सोया सॉस
2 टे स्पून तेल
2 सुक्या काश्मिरी लाल मिरच्या
मीठ चवीने
कृती: प्रथम तांदळाचा मोकळा भात शिजवून बाजूला ठेवा. ब्रोकोलीचे तुरे कापून पाण्यात घालून ठेवा. शिमलामिर्च व गाजर उभे पातळ चिरून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या. आल-लसूण पेस्ट बनवून घ्या. ब्रोकोली थोडी वाफवून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये सुकी लाल मिरची घालून कांदा व आल-लसूण थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये शिमलामिर्च, गाजर व ब्रोकोली घालून 2-3 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मीठ चवीने घालून मिक्स करून घ्या.
आता त्यामध्ये भात व सोया सॉस घालून मिक्स करून 2-3 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या.
गरम गरम ब्रोकोली फ्राइड राईस सर्व्ह करा.