Depression Symptoms and treatment Upay In Marathi

Depression Symptoms and treatment Upay
Depression Symptoms and treatment Upay

डिप्रेशन काय आहे? त्याची लक्षण व इलाज करण्याचे उपाय 

आपण सर्वजण आपल्या जीवनात कधीना कधी कोणत्या ना कोणत्या वळणावर उदास, हताश झालेले अनुभवले असेलच. असफलता, संघर्ष किंवा आपल्या प्रियजन पासून दुरावा त्यामुळे दुखी होणे सहाजिकच आहे. पण अप्रसन्नता, दुख, लाचारी, निराशा ह्या गोष्टी बरेच दिवस राहतात त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो मग डिप्रेशन किंवा मानसिक रोग होण्याचे संकेत होऊ लागतात.

The text Depression Symptoms and treatment Upay In Marathi be seen on our You tube Chanel Depression Symptoms and treatment Upay

WHO च्या अनुसार संपूर्ण जगात साधारण पणे 30% लोक डिप्रेशन सारख्या समस्यानी त्रस्त आहेत. आपल्या भारतात हा आकडा साधारपणे 5 करोंड आहे. आपल्याला माहीत आहेका साधारणपणे डिप्रेशनच्या समस्या किशोरावस्था किंवा 30 ते 40 ह्या वयो गटात चालू होतात. पण असे काही नाही डिप्रेशन च्या समस्या कोणत्या सुद्धा वयात सुरू होऊ शकतात. तसे पहिले गेलेतर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्या समस्या जास्त प्रमाणात दिसून येतात. मानसिक कारणे त्याच्या बरोबर हार्मोन्सचे असंतुलित होणे, गर्भावस्था व आनुवंशिकता पण डिप्रेशनची कारण असू शकतात.

लक्षणांची संख्या व त्याची तीव्रता च्या आधारावर निरनिराळी कारण असू शकतात. जसे की मध्यम समस्या पासून गंभीर समस्या असू शकतात. त्याच्यावर इलाज करण्यासाठी खूप खोलवर अभ्यास करून इलाज करावा लागतो. खर म्हणजे प्रतेक व्यक्तिमध्ये डिप्रेशनची वेगवेगळी कारण असू शकतात.

Depression Symptoms and treatment Upay
Depression Symptoms and treatment Upay

आपण पाहूया डिप्रेशनची लक्षण काय असू शकतात:
दिवसभर किंवा खास करून सकाळच्या वेळी उदास वाटणे.
साधारणपणे रोज थकल्या सारखे वाटणे किंवा अशक्तपणा वाटणे.
आपणच आपल्याला अयोग्य किंवा दोषी मानणे.
कोणता सुद्धा निर्णय घेताना उशीर लावणे किंवा निर्णय घेण्यास कठीण वाटणे.
रोज जास्त वेळ झोपणे किंवा कमी झोप येणे.
आपल्या दैनंदिन व्यवहारात उत्साह न वाटणे.
रोज सारखे सारखे मृत्यु किंवा आत्महत्या करण्याचे विचार डोक्यात येणे.
सारखे सारखे बेचैन वाटणे किंवा आळस येणे
अचानक शरीराचे वजन कमी होणे किंवा जास्त प्रमाणात वाढणे.

वरील दिलेल्या लक्षणा नुसार पाच लक्षण ही दिसून येत असतील व त्याचा प्रभाव दोन आठवड्या पेक्षा जास्त दिसून येत असेलतर असे समजावे की ती व्यक्ति डिप्रेशन ह्या समस्यानी त्रस्त आहे.

डिप्रेशन ही एक मानसिक समस्या आहे पण त्याचा परिणाम शरीरावर सुद्धा होतो. जसेकी थकावट, अशक्तपणा, जाड होणे, हार्ट प्रॉब्लेंम, डोके दुखी, अपचन इ. ह्या कारणासाठी लोक इलाज घेण्यासाठी दारोदारी भटकत असतात पण त्याची काय कारण आहेत ते खोलवर जाऊन विचार करत नाहीत. खर म्हणजे अशी कोणती सुद्धा लक्षण दिसली तर आपण तज्ञ डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेतली पाहिजे त्याना पहिल्या भेटीतच समजते.

आजकाल डिप्रेशनच्या समस्यासाठी वेगवेगळ्या थेरपी किंवा इलाज उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी योग्य डॉक्टर कडे गेलात तर ते काउंसलिंग, व्यव्हार परिवर्तन, ग्रुप थेरेपी, औषधे देऊन बरे करतात. त्यामुळे योग्य ती अगदी बरोबर ट्रीटमेंट मिळून व्यक्ति म्हणजे मानसिक रोगी बरा होऊन परत आपले दैनंदिन जीवन सामान्यपणे जगू शकतो.

आता आपण पाहू या आपण किंवा आपले कोणी परिचित डिप्रेशनच्या समस्यानी त्रस्त झाले आहेत तर आपण खाली दिलेले उपाय करू शकता पण डॉक्टरी इलाज बरोबर हे सरल साधे सोपे उपाय करा.
डिप्रेशन पासून बाहेर पडण्यासाठी चांगल्या मनोवैज्ञानिकचा सल्ला घ्या त्याच्याशी विचार विनिमय करा.
डिप्रेशन आलेल्या व्यक्तिला किंवा जर आपण डिप्रेशनच्या समस्यानी त्रस्त असाल तर एकटे राहू नका, आपल्या मित्र परिवार मध्ये जाऊन गप्पा मारा आपले मन मोकळे करा, त्यांच्या बरोबर बाहेर जा, वेळवेगल्या लोकाना भेटा त्यांच्याशी गप्पा मारा.
एकटे राहून कुढत बसू नका.
सकाळ संध्याकाळ फिरायला जा, बागेत गेलाततर झाडे फुले पाहून आपले मन प्रसन्न होते.
आपल्याला कोणत्याना कोणत्या कामात गुंतवून ठेवा म्हणजे आपले मन रमेल.
मन प्रसन्न ठेवण्यासाठी किंवा आनंदी राहण्यासाठी चांगली गाणी आइका उदास गाणी आइकू नका.
मनातल्या मानत कुढत बसण्याच्या आयवजी आपल्या जवळील व्यक्तिजवळ आपले मन मोकळे करा त्यामुळे मनावरील ताण कमी होऊन हलके वाटेल.
नवीन नवीन कामे हाती घ्या ती पूर्ण करण्यासाठी नवीन नवीन उपाय शोधा.
आपण जरी डिप्रेशनच्या समस्यानी त्रस्त असाल तरी लोकांना दाखवताना आपण खुश आहोत असे दाखवा. आपल्या मित्र परीवारात हसत खेळत राहाल तर आपली तब्येत चांगली राहील. जर आपण रडत बसलो तर आपल्या बरोबर कोणी सुद्धा रडणार नाही पण आपण हसत खेळत राहिलो तर दुनिया सुद्धा आपल्या बरोबर हसत खेळत राहील.
नेहमी सकारात्मक दृष्टिकोण ठेवा व त्याच बरोबर नेहमी सकारात्मक बोला.
आर्ट ऑफ़ पॉजिटिव लिविंगचा फायदा घ्या.
रोज योगा करा त्याच बरोबर अनुलोम विलोम, प्राणायाम, ध्यान ह्या गोष्टी शिकून आचरणात आणा.
आपल्या कडे इंटरनेट असेलतर सकारात्मक गोष्टीचे वाचन करा.
रात्री झोपण्याच्या अगोदर एक तास टीव्ही बंद करा कारण की जर आपण कोणती नकारात्मक गोष्ट पाहात असाल तर त्याचा प्रभाव आपल्या अंतेरमनावर होतो.

टीप:
डिप्रेशन हा एक सामान्य रोग आहे पण गंभीर रोग सुद्धा आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी डॉक्टरचा सल्ला घेणे जरुरीचे आहे.
डिप्रेशन पागलपण नाही व ते पूर्ण बरे सुद्धा होतात. पण त्यासाठी योग्य तज्ञ व्यक्ति कडून इलाज करून घेणे व त्याच बरोबर घरातील अन्य व्यक्ति व मित्र परिवार ह्यांची चांगली साथ होणे जरुरीचे आहे.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.