10 Vastu Tips Keep These Things Under Doormat To Attract Wealth In Marathi

Doormat
How to attract Wealth by using Doormat

डोरमैट 10 वास्तु टिप्स डोर मॅटच्या खाली एक वस्तु ठेवून बना मालामाल 

प्रतेक व्यक्तीच्या जीवनात वास्तू शास्त्रला खूप महत्व आहे. वास्तू शास्त्रा नुसार आपल्या घराला दोष मुक्त करता येते. प्रत्येकाच्या घरासमोर पायपुसणे म्हणजेच पायदान किंवा डोर मॅट असतेच. जर आपण डोर मॅट वास्तू शास्त्रानुसार ठेवले तर घरात सकारात्मक ऊर्जा येते. व घरात सुख समृद्धी येते.

The 10 Vastu Tips Keep These Things Under Doormat To Attract Wealth can be seen on our YouTube Channel Doormat To Attract Wealth

आपले मुख्य दार नेहमी चांगल्या स्थितीत पाहिजे व त्याच्या समोर चांगले डोर मॅट पाहिजे त्यामुळे घरातील छोटे छोटे विवाद होत नाहीत.

वास्तू शास्त्र नुसार डोर मॅट चा आकार आयताकार पाहिजे. त्यामुळे घरातील लोकांचे संबंध मजबूत बनतात.
एक लक्षात ठेवा जर आपल्या घराचे मुख्य दार पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला आहे तर डोर मॅटचा रंग फिकट पाहिजे.
वास्तू शास्त्र नुसार पाय पुसण्याच्याखाली काही खास वस्तु ठेवल्यातर घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.

प्रतेकचे श्रीमंत बनण्याचे स्वप्न असते पण फक्त काही लोकांचे हे स्वप्न पूर्ण होते. जर तुम्हाला सुद्धा तसे वाटत असेल तर काही सोपे उपाय करून पहा.

Doormat
How to attract Wealth by using Doormat

1. ज्योतिष शास्त्र नुसार आपल्या घराचे मुख्य दार हे महत्वाचे असते तेथून आपल्या घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. म्हणून नेहमी आपल्या मुख्य दरवाजाच्या वर गणपतीची तसवीर फोटो लावावा. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते.

2. ज्या लोकांना घरात आनंद पाहिजे त्यांनी मुख्य दरवाजा समोर काळ्या रंगाचे डोर मॅट पायदान ठेवावे त्यामुळे नजरदोष मुक्त होऊन आडलेली कामे मार्गी लागतात.

3. धन लाभ होण्यासाठी एका कागदावर तुरटीची पूड करून ठेऊन त्याची पुडी बनवावी व ती पुडी पायदानाच्या खाली मधोमध ठेवावी. त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होऊन नेहमी धन संपत्ति घरात राहते.

4. ज्या लोकाना आर्थिक तंगी पासून छुटकारा पाहिजे त्यांनी आपल्या घराचे मुख्य दार नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. तसेच मेन डोर जवळ चप्पल-बूट ठेवू नये असे केल्याने घरात सम्पन्नता येते. अश्या घरात अन्न व धनाची कधी सुद्धा कमतरता रहात नाही.

5. ज्या लोकाना अडचणी पासून छुटकारा पाहिजे त्यांनी पायदानाच्या खाली एक चावी म्हणजे किल्ली लपवून ठेवावी. असे केल्याने बंद किस्मतचे दरवाजे उघडतात. त्यामुळे लोकांची कामे लवकर होतात व तरक्की होते.

6. वाईट नजर पासून वाचण्यासाठी घराच्या चौकटीवर सात मिरे लाल कापडात बांधून टांगून ठेवावे. किंवा दरासमोरील पायदानाच्या खाली ठेवावे. त्यामुळे नकारात्मक शक्तिचा नाश होतो.

7. जर तुमचे एखादे काम बऱ्याच दिवसापासून होत नसेल तर डोर मॅटच्या खाली थोडेसे पिवळे मोहरीचे दाणे ठेवावे. त्यामुळे घरात समृद्धी येऊन माता लक्ष्मीचा वास राहतो.

8. जर मुख्य दरवाजाच्या चौकटवर श्री यंत्र लावले तर अश्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन अन्न धान्यची कधी सुद्धा कमतरता होत नाही. त्यामुळे घरातील लोकसुद्धा खुश राहतात.

9. जीवनात उन्नति पाहिजे असेलतर मुख्य दरवाजावर लाल कुंकूनि दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे व रोज दिवा अगरबत्ती लावावी.

10. जर तुम्हाला घरातील अशांतीचा महोल काढायचा असेलतर पायदानच्या खाली काळ्या कापडात थोडा कपूर पुडी बांधून ठेवा त्यामुळे नकारात्मकता दूर होऊन संबंध सुधारतात.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *