Lavkar Nokari Job Milnyasathi 9 Satik Upay in Marathi

Lavkar Nokari Job Milnyasathi Upay
Zatpat Lavkar Nokari Job Milnyasathi Upay

लवकर नोकरी मिळण्यासाठी ९ सटीक उपाय 

प्रतेक व्यक्तिला वाटते आपल्याला चांगली नोकरी मिळावी त्याच बरोबर चांगला पगार व पद म्हणजे पोस्ट मिळावे. आता ह्या कठीण काळामध्ये म्हणजेच महामारीच्या काळात बऱ्याच लोकांची नोकरी गेली आहे त्यामुळे ते परेशान आहेत. पण खूप प्रयत्न करून सुद्धा नोकरी मिळत नाही. आपल्याला असे सांगितले जाते की आपले ग्रह सध्या बरोबर नाही पण आपण खाली दिलेले काही सटीक उपाय किंवा टोटके करून पहा त्यामुळे तुमचे काम होऊ शकते व नोकरी मिळण्यासाठी काही बाधा येत असतील तर त्या निघून जातील.

The Lavkar Nokari Job Milnyasathi 9 Satik Upay can be seen on our YouTube Channel Lavkar Nokari Job Milnyasathi Upay

लवकर नोकरी मिळण्यासाठी काही सटीक सोपे उपाय आहेत:

Lavkar Nokari Job Milnyasathi  Upay
Zatpat Lavkar Nokari Job Milnyasathi Upay

ॐ श्री हनुमते नम: हा मंत्र म्हणावा किंवा “ॐ शं शनैश्चराय नमः” हा मंत्र म्हणावा

1. सकाळी सकाळी उठल्यावर पक्षांना दाणे घाला त्यामुळे नोकरी मिळण्यासाठी अडचणी दूर होतील. रोज सकाळी पक्षांना 7 प्रकारचे दाणे टाकल्याने नोकरी नक्की मिळेल.

2. नोकरी मिळण्यासाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी एका पांढऱ्या रंगाच्या कापडात काळे तांदळाचे दाणे घेऊन त्याची पुरचुंडी बांधावी व माता कालीला अर्पण करावी.

3. इंटरव्ह्युला जाण्याच्या अगोदर एक ताजे लिंबू घेऊन त्याला चारी बाजूनी चार लवंग टोंचावी. मग ते लिंबू हातात घेऊन ॐ श्री हनुमते नम: हा मंत्र जाप 108 वेळा करावा. जेव्हा आपल्याला इंटरव्ह्युला जायचे आहे त्याच्या अगोदर असे करावे व जाताना लिंबू आपल्या सोबत घेऊन जावे. आपल्याला लवकर नोकरी मिळेल.

4. आपल्या माना सारखी नोकरी मिळण्यासाठी श्री बजरंग बली ची पूजा नियमित करावी. आपल्या घरात हनुमानजी उडत आहेत अशी तसवीर लावावी व त्याची रोज पूजा करावी. त्यामुळे नोकरी मिळण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या येणार नाही व लवकर मना सारखी नोकरी मिळेल.

5. इंटरव्ह्यु ला जाण्याच्या अगोदर गाईला गूळ व चणे किंवा पेढ्यामध्ये गूळ घालून ते पेढे गाईला खावू घालावे त्यामुळे नोकरी मिळण्याची संभावना होते. पण एक लक्षात ठेवा आपण स्वतः गाईला खायला द्या तरच त्याचा फायदा होईल.

6. ज्या दिवशी इंटरव्ह्यु आहे त्यादिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करताना त्या पाण्यात थोडशी हळद मिक्स करून त्या पाण्याने आंघोळ करावी मग देवा समोर 11 अगरबत्ती लावावी. असे केल्याने सर्व मनो कामना पूर्ण होतील.

7. प्रतेक शनिवारी शनि देवाची पूजा केल्यास सर्व परेशानी दूर होतील. प्रतेक शनिवारी त्यांची पूजा करताना “ॐ शं शनैश्चराय नमः” हा मंत्र 108 वेळा म्हणावा. त्यामुळे आपल्या राशीमध्ये काही बाधा असतील तर त्या निघून जातील व आपल्याला मनासारखी नोकरी लवकर मिळेल.
8. इंटरव्ह्युला जाताना घरातून निघताना दही व साखर खाऊन मग निघावे. घरातून निघताना आपला उजवा पाय प्रथम बाहेर ठेवावा. आपले वडील धारी मनसे नेहमी असेच सांगतात.

9. ज्या दिवशी इंटरव्ह्यु आहे त्या दिवशी हनुमान चलीसा जरूर वाचावी म्हणजे आपला इंटरव्ह्यु चांगला होऊन नोकरी मिळेल.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.