Navratri Colours 2021: List of Colours for 9 Days and Their Significance in Marathi

Navratri 2021
List of 9 Colours of Navratri 2021

नवरात्री 2021 रंग नवरात्रीमद्धे कोणत्या रंगाचे कपडे कधी घालायचे त्याचे महत्व व देवीच्या कोणत्या रूपाची पूजा करायची 

हिंदू धर्मा मध्ये नवरात्रीला खूप महत्व आहे. नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करून दुर्गा माता ची भक्ति भावाने आराधना केली जाते.

The Navratri Colours 2021: List of Colours for 9 Days and Their Significance can of be seen on our YouTube Channel Navratri Colours 2021

नवरात्री मध्ये घरात घट बसवून देवीची आराधना करतात. सकाळ संध्याकाळ देवीची पूजा अर्चा करून नेवेद्य दाखवतात. रोज संध्याकाळी महिला नटून थटून महाराष्ट्रात भोंडला खेळतात फेर धरून गाणी म्हणतात. गुजरात ह्या भागात गरभा खेळतात.

नवरात्रीमध्ये प्रतेक दिवशी एक विशिष्ट रंग निर्धारित केलेला असतो. नवरात्रीमध्ये आपल्या जीवनात त्या रंगाचे खूप महत्व असते व ते शुभ मानले जाते. तसेच प्रतेक दिवशी तो विशिष्ट रंग परिधान करणे ही पद्धत लोकप्रिय झाली आहे. विशेष करून महाराष्ट व गुजरात ह्या भागात ही पद्धत लोकप्रिय आहे. जर नवरात्री मध्ये गरभा खेळायचा असेलतर त्या दिवशी त्याच रंगाचे कपडे परिधान करावे त्याचे विशिष्ट महत्व सुद्धा आहे. त्यामुळे आपला दिवसभरचा उत्साह सुद्धा वाढतो.

प्रतेक प्रांतात त्यांच्या न्यूज पेपरमध्ये नवरात्री च्या अगोदर टाइम्स ऑफ इण्डिया, मिड-डे, मुम्बई मिरर, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स ह्या सारख्या पेपरमध्ये नऊ दिवसाचे नऊ रंग प्रकाशित केले जातात. मग ऑफिस मध्ये किंवा इतर ठिकाणी त्यानुसार ते रंग असलेले कपडे परिधान केले जातात.

नवरात्री ज्या दिवशी सुरू होते तेव्हा घट बसतात तो दिवस पहिला मानला जातो. आज आपण ह्या ठिकाणी नऊ दिवसाचे रंग व त्या रंगाचे महत्व व त्या दिवशी देवीच्या कोणत्या रुपाची पूजा करायची ते पहाणार आहोत.

Navratri 2021
List of 9 Colours of Navratri 2021

1) नवरात्री पहिला दिवस ऑक्टोबर 7, 2021, गुरुवार प्रथम स्वरूप शैलपुत्री
आज नवरात्रीचा रंग – पिवळा Yellow
गुरुवार ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने नवरात्री उत्सवमध्ये मनुष्यचे प्रसन्न राहते तसेच हा रंग उष्माचा प्रतीक आहे व पूर्ण दिवस आपले मन प्रफुलीत राहते.

2) नवरात्री दूसरा दिवस ऑक्टोबर 8, 2021, शुक्रवार माता ब्रह्मचारिणी
आज नवरात्रीचा रंग – हिरवा Green
हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे. त्याच बरोबर विकास, शांती व स्थिरता उत्पन्न करतो. ह्या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवी जवळ आपल्या जीवनात शांती प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करावी. हिरवा रंग कोणत्या सुद्धा नवीन कार्य आरंभ करण्यासाठी चांगला आहे.

3) नवरात्री दिवस 3 ऑक्टोबर 9, 2021, शनिवार चंद्रघंटा स्वरूप
आज नवरात्रीचचा रंग – करडा Gray
करडा रंग संतुलित विचारधाराचे प्रतीक आहे. त्याच बरोबर व्यक्तीला व्यावहारिक जीवनात सरळ बनण्यास मदत करतो. हा रंग ज्या भक्तांना हलका म्हणजे फिकट रंग आवडतो त्यांच्यासाठी चांगला आहे.

4) नवरात्री दिवस 4 ऑक्टोबर 10, 2021, रविवार कुष्मांडा स्वरूप
आज नवरात्रीचचा रंग – नारिंगी orange
रविवारी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्याने स्फूर्ति व उल्लासचा अनुभव होतो. त्याच्या मुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याच बरोबर मन उत्साही होते.

5) नवरात्री दिवस 5 ऑक्टोबर 11, 2021, सोमवार स्कंदमाता स्वरूप
आज नवरात्रीचा रंग – पांढरा
पांढरा रंग शुद्ध व सरळताचे प्रतीक आहे. देवीची कृपा प्राप्त होण्यासाठी पांढरे वस्त्र परिधान करून पूजा करावी. त्याने आत्मशान्ति व सुरक्षाचा अनुभव येतो.

6) नवरात्री दिवस 6 ऑक्टोबर 12, 2021, मंगळवार कात्यायनी स्वरूप
आज नवरात्रीचा रंग – लाल
मंगळवार ह्या दिवशी लाल रंग परिधान करावा. लाल रंग उत्साह व प्रेमाचे प्रतीक आहे. तसेच देवी मातेला लाल रंगाची चुनरी अर्पण करण्याची फार पूर्वी पासून पद्धत आहे. हा रंग भक्ताना शक्ति देतो.

7) नवरात्री दिवस 7 ऑक्टोबर 13, 2021, बुधवार कालरात्रि स्वरूप
आज नवरात्रीचचा रंग – गडद निळा
नवरात्रीमध्ये बुधवार ह्या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यामुळे आनंद मिळतो हा रंग समृद्धी व शांतीचे प्रतिनिधित्व करतो.

8) नवरात्री दिवस 8 ऑक्टोबर 14, 2021, गुरुवार स्वरूप महागौरी
आज नवरात्रीचा रंग – गुलाबी
नवरात्रीच्या ह्यादिवशी गुलाबी रंगाची निवड करा. गुलाबी रंग सार्वभौमिक प्रेम, स्नेह व सद्भाव ह्याचे प्रतीक आहे. हा एक मनमोहक रंग आहे. त्यामध्ये व्यति आकर्षित दिसते.

9) नवरात्री दिवस 9 ऑक्टोबर 15, 2021, शुक्रवार सिद्धिदात्री स्वरूप
आज नवरात्रीचा रंग – जांभळा
जांभळा रंग भव्यता व राजसी ठाट-बाठ दर्शवतो. ह्या रंगामुळे भक्तांना समृद्धि व सम्पन्नता प्राप्त होते. त्याच बरोबर देवी माताची कृपा राहते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.