फळांच्या सालामध्ये बऱ्याच रोगांचे इलाज आहेत जाणून घ्या ते सेवन केल्याने फायदे साले फेकून देण्याच्या अगोदर नक्की पहा इन मराठी
आपण फळांची किंवा भाज्यांची साले फेकून देतो पण ती फेकून न देता त्याचे जर सेवन केले तर आपल्याला त्याचा फायदा होऊन बऱ्याच रोगान पासून मुक्तता मिळू शकते. त्यासाठी ही माहिती पहा.
The Marathi language video Fruit Peels Benefits of be seen on our YouTube Channel of Amazing Benefits of Fruit Peels
जेव्हा तुम्ही केळी खाताल तेव्हा केळ्याचे साल टाकून देऊ नका. संत्री मोसंबीची साल सुद्धा जपून ठेवा. जपान सहित बाकीच्या देशानमध्ये काही शोध लागले आहेत ते म्हणजे डिप्रेशन पासून हृदयाच्या रोग बरा करण्याचे औषधी गुणधर्म फळाच्या व भाजीच्या साला मध्ये आहेत. आपली त्वचा म्हणजेच स्कीन अगदी मुलायम डाग विरहित व चमकदार बनवण्यासाठी त्यामध्ये त्याची महत्वाची भूमिका आहेत.
आपण पाहू या कोणत्या फळापासून किंवा भाजीच्या साला पासून काय उपयोग होतो.
केळी: डिप्रेशन व मोतीबिंदू ह्यावर उपयोगी
केळ्याच्या सालामध्ये डिप्रेशन व मोतीबिंदू ह्या वर उपाय होऊ शकतो. तैवान मधील चुंग शान मेडिकल यूनिवर्सिटीमध्ये शोध लागला आहे की केळ्याच्या सालामध्ये फील गुड हार्मोन् सेरोटोनिन आहे जे बेचैन-उदासचा भाव कमी करते. तसेच त्यामध्ये ल्युटिन नावाचे एंटी ऑक्सिडेन्ट आहे ते आपल्या डोळ्याच्या कोशामधील अल्ट्रावायलेट किरणांना मोती बिंदुच्या होण्या पासून वाचवते.
त्यासाठी केळीची साल फेकून न देता त्यांना 10 मिनिट पाण्यात उकळून घ्या. मग पाणी थंड झाल्यावर ते पाणी गाळून सेवन करावे.
नाशपती (Pear): पोट व लिव्हरच्या विकारावर उपयोगी
नाशपतीच्या सालामध्ये विटमिन “सी” व फायबर असते त्यामुळे त्याच्या सेवनाने पोटाचे विकार कमी होतात. तसेच त्यामध्ये ब्रोमलेन आहे त्यामुळे पोटातील मृत पेशीना बाहेर काढण्यास मदत करून त्यातील एंजाइम लिव्हर रोगापासून दूर ठेवते.
त्यासाठी नाशपती ही फळ सालासकट खावे किंवा साळाचा मिल्क शेक करून सेवन करावे.
लसूण: हृदयरोग व स्ट्रोक
लसूणच्या सालामध्ये फिनायलप्रॉपेनॉयड नावाचे एंटीऑक्सिडेन्ट आहे त्यामुळे (led) म्हणजेच बैड कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयरोग व स्ट्रोक पासून दूर राहता येते.
त्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी 2 पाकळ्या लसूण चावून जरूर खावा तेपण सालासकट खावे.
संत्री मोसंबी: हृदयरोग व स्ट्रोक
संत्री मोसंबीच्या सालामध्ये बैड कोलेस्ट्रॉल च्या स्तर कमी करण्यास मदत होते त्यातील एंटीऑक्सिडेन्ट रक्त प्रवाहामधील अडथळे कमी करण्यास मदत करते त्यामुळे रक्त वाहिन्यावर जास्त दबाव येत नाही व हृदयरोग व स्ट्रोक पासून बचाव होतो.
त्यासाठी भाजीमध्ये किंवा सुपामद्धे संत्री मोसंबीची साले किसून टाकावी. आपण केकमध्ये किंवा मफीनमध्ये सुद्धा वापरू शकतो. किंवा ज्यूसमध्ये सुद्धा वापरू शकतो.
चिक्कू:
चिक्कू नेहमी साला सकट खावा. कारणकी त्यामध्ये विटामीन “ए” व “बी” आहे ते आपल्या डोळ्यासाठी उपयुक्त आहे तसेच तोंडाचा कॅन्सर पासून बचाव होतो. ग्लुकोज आहे त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. चिक्कू एन्टी-इंफ्लेमेटरी एजेंट आहे त्यामुळे पोटाचे विकार होत नाहीत. त्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस व आयर्न आहे त्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. चिक्कूच्या सेवनाने डोके शांत राहते व टेंशन अनिद्राचा त्रास होत नाही.
सफरचंद:
सफरचंद ही नेहमी साला सकट खाणे फायदेशीर आहे. रोज एक सफरचंद खाणे म्हणजे रोगाला आपल्या पासून दूर ठेवणे. सफरचंद नेहमी चावून खावे त्याचे ज्यूस करून पिऊ नये. सफरचंद रिकाम्या पोटी कधी खाऊ नये.
टरबूज:
टरबूजच्या सालामध्ये एंटीऑक्सीडेंट, खनिज, विटामिन भरपूर प्रमाणात असतात. कैलरी कमी प्रमाणात असतात पण विटामीन “A” विटामीन “C”, विटामीन “B 6, पोट्याशीयम, जिंक असते.
टरबूजच्या सालीचे सेवन केल्याने आपली त्वचा निरोगी राहते. कारणकी त्याच्यामध्ये विटामिन “A” भरपूर प्रमाणात आहे. टरबूजच्या सालामध्ये विटामिन “C” भरपूर आहे त्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ति वाढते. किडनी स्टोनचा ज्यांना त्रास होतो त्यांनी टरबूजच्या सालाचे सेवन करावे. टरबूजच्या सालामध्ये लाईकोपिन असते त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर च्या त्रासापासून लढन्यासाठी मदत करते. टरबूजच्या सालीचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते.